Monday, March 29, 2010

पुढच्या वर्षी साठी आजच काही बदल ,,

||श्री:||
डॉ.सतीश देसाई यांचे विचार ऐकले 
दहा बाय दहाच्या खोलीत रहावे का आणि मर्सीडिझ
की काय आणि काय ...
हो बरोबरच आहे साहित्य संमेलनाचे स्वरुप एकंदर बदलण्याची गरज आहे 
आणि पुण्यात त्यांच्या लक्षात आले हे फार बरे झाले
कारण पुणे आता स्वतःची ओळख नव्याने बनवू लागलय
सिंहगडाला देखिल आजकाल म्हणे ,,
ट्रांस मुजिक आणि चिलमीच्या झुरक्याशिवाय झोप येत नाही ,,,
आणि म्हनुनच पुढच्या वर्षी साठी आजच काही बदल 
सुचवू ईछितो ,,,
यावर्षी जसा संमेलनाला गर्दी होत नाही म्हणून जस ,,
अमिताभला नाचवलत तसेच,,,,,
पुढच्या वर्षी ,,,,?
अर्थात ही आयडिया मला 
सध्याच्या आयपीएल वरून आली आहे 
आणि मला खत्री आहे ही आयडिया 
अमिताभ पेक्षाही भन्नाट आहे ,,
पुढच्या वर्षी साहित्य संमेलनाला 
सेलेब्रेटी आणन्या पेक्षा 
"चीयर गिर्ल्स "ला आणावे 
आपोआपच गर्दी वाढेल 
खेलाडुने जसा चोवकार षटकार  किंवा एखाद्याची दांडी
गुल झाल्यावर किंवा एखाद्याचा क्याच पकडल्यावर
त्या "चीयर गिर्ल्स" जशा नाचतात तोकड्या कपड्यात ,,
तसेच एखाद्या वक्त्याने काही चांगली सूचना केली  
की किंवा एखादा चांगला ठराव पास  झाला  तर  ,,,
त्या वक्त्यास थाम्बवुन लगोलग  ,,
"चीयर गिर्ल्स"ला नाचवावे  ,,,,
बघता बघता नवी पीढ़ी या रटाळ आणि रुक्ष    
कार्यक्रमाकडे आपसुखच ओढली जाईल
तोकड्या कपडयातील चीयर गिर्ल्स पाहून त्यालाही 
चार ओळी सुचतील ,,,
त्यातूनच एखादा साहित्यिक जन्मास येईल ,,,
बघा जमल तर नाही जमल तर जमवायला आहेतच ना 
आपले डॉ.सतीश देसाई आणि सुधिरजी गाडगीळजी
काय म्हणता कुठे मिळतील ,,,?
माहित आहे की चौफुला लैई मिळत्याल
एक डाव येव्हड जमवाच राव
मॉप गर्दी जमल बगा..ईचार करा 
           
 

No comments:

Post a Comment