||नथूरामाय नमः:||
सपने में देखा सपना.....
सपने में देखा सपना.....
काल रातच्याला आमस्नी बी...
याक सपान पडल...
हनी त्यास्नी कारण हुता
"अमोल पालेकर चा
"गोलमाल " शिनुमा"
त्यातल,
"गोलमाल हाय भाय सब गोलमाल हाय"...
गुनगुनात च झोपलो हुतो पण अचानक
"सपने में देखा ....
गान हे अस समोर आल
हिचार करत हुतो तोवर माया
डोल्या समोर
"जिन्नाच "हुबा रायला
आता का ?म्हाया सप्नत न्हाई ईऊ
शकत व्हय वो?
आवो म्या बी
हिंदुत्ववादी राष्ट्रवादी इचार सरनिचा हाय
फकस्त भाजपा च्याच लोकास्नी,
"लाय"सन दिल्याल हाय का?
"जिन्ना" बद्ल बोलाया ?
"जिन्ना"म्हंजी त्यों जीना न्हाई
त्यों पापस्तांचा त्यों आवो त्यों न्हाई का?
त्यों पापस्तांचा त्यों आवो त्यों न्हाई का?
"फालनी फेम " आवो त्यों वो /\ /\
हा आत्ता समजलाव त्योच तो ...
ज्यच्याव चढायच्या प्रयत्नात
ज्यच्याव चढायच्या प्रयत्नात
इथले राजकारणी पिकक्ल्या
जाम्भलावणी टपाटप पड़त्याती.
जाम्भलावणी टपाटप पड़त्याती.
तर असा त्यों जिन्ना म्हाया समूर
हुबा राहून श्यान म्हंतु कसा,
हुबा राहून श्यान म्हंतु कसा,
सुनीला आर मलाबी याक,
सपान पडल आता आल का नुसत झेगाट
सपान पडल आता आल का नुसत झेगाट
सपने में देखा सपना....
आन फुड म्हान्त्यो कसा,
आर सुनीला मला तुमच्या राज्यात
लैच मला डिमांड हाय की आर,
आर सुनीला मला तुमच्या राज्यात
लैच मला डिमांड हाय की आर,
पप्स्तानत घित न्हैत त्याव्हड
माज नाव हित घ्यतात
माज नाव हित घ्यतात
मी लेच खुशीत गाजर खातुया....
पहिलेझुट त्यों तुमचा
"लोहप्रुष की काय अडवाणी र "
आला नि मह्यावर फुल
आला नि मह्यावर फुल
उधलुन ग्येला,
त्यों "सुधीन्द्र कुलकर्णी न्हैका"?
त्यों आधीच कमुनिष्ट आणि आता तर परत
"ममता की छाव में " हायेच.आणि
त्यों "जसवंत सिंग " त्योतर,
लई डयाम्बीस त्याला तर
लई डयाम्बीस त्याला तर
२६\११ च काय बी मोल न्हाई.
त्ये "सुदर्शन" की काय त्ये बी फिरल की राव ?
सुनीला ह्ये समदे म्हाया सपनात आल
"आडवानिजी" परधान मंत्री झाल्याती ,,,
"जसवंत सिंग" परराष्ट्रमंत्री झाल्याती,,,,
आणि,
राष्ट्रपति पदी,साक्षात् "सुदर्शनजी",,,
"कराची" "हिन्दुस्तांची" राजधानी झाल्याली हाय,,
समदी कड आमच "पाकिस्तानी झेंड" फडक्त्याती,,,
"अतिरेकी" नावाचा आता राक्षसच न्हाई,,,
काश्मीरचा आता वाद न्हाई,,,,
उलट तिथले "पंडित",,
स्वतःला "मौलवी "म्हणवुन घेत्यती,,,
आई वडिल कुणी म्हणतच न्हाई,
सार ,"अम्मीजान-अब्बुजन" म्हान्त्यती,,,
कळस म्हंजी,
समदी हिन्दू मूल आपापल्या मिश्या काढून दाडह्या कोरु लागलित,,,
३७० कलम काय त्येच इसरुन ग्येली हायेत,,,
"बाबरी " सुध्हा परत बांधून देणार हायेत,,,
मफिनाम्यसः,,,
अस सगळ आलबेल हाय बघ म्या तर मजीत हाय,
जातो आता म्हणत "जिन्ना" गेला वेताल अदृश्य व्हावा तसाच "जिन्ना"ग्येला जागा झालू त्येच ,,,
"पाकिस्तान झिंदाबाद"च्या घोषणा देत.
पर म्या कसला ,त्या संपनातुन,
भायेर याया तयार न्हवतु ,,
कारण हिन्दू -मुस्लिम झगडा न्हाई आन त्या "जय श्री राम "च्या घोषणा बी न्हैत आणि अशातच ,
मला एका टार्गटान मला इचारल,
आपला "स्वातंत्र्य दिन" कोणता?
म्याबी त्येला सांगितल "१४ अगस्त",,,आणि,
डोक्यात कुणीतरी जोरदार फटका मरला ,
डोळ उघाडल आणि लक्षात आल म्या ,,,
"हास्पीटलात " हाय आन समदे डाक्टर ,,
इचार करत हुते ह्याला ,
"येड्याच्या" इस्पीतलात न्ह्यायचा का न्हाई?
म्हया ध्यानात आल माझ डोस्क तपासणार हायेत .
तापसन्या झाल्या आन एकमुखी ठरल की म्या
चांगला हाय पण म्या असच वागणार हाय
म्हाया घरातले समदे चिंतातुर झाल ,
दागतरास्नी हिचारल यावर हुपाय काय हाय का न्हाई?
तवा दागतर म्हणाल उपाय हाय पण,,,,त्यासाठी,
"आडवानीजी,जसवत सिंगजी,सुदर्शनजी,डोकी तपासली पाहिजेत ,कारण,,,,
"जिन्ना ची भलामन" जर राष्ट्रवादी विचारांचे लोक
करू लागले तर सामान्य जनतेने काय करव?
"रामरथा वर आरूढ़ होवून सत्तेचा सोपान भाजपा
चढू लागला
आणि रथाचा चाक "जिन्ना" मागे ओढू लागला.
No comments:
Post a Comment