Saturday, May 1, 2010

"हुतात्मा स्मारकावर फूल वाहून,,,,,,,,,,

 साहेब,
१ मे महाराष्ट्र दिन जोरात साजरा झाला ,,,,,
अगदी जोशात आणि साहेब तुम्ही बोललात 
"हुतात्मा स्मारकावर फूल वाहून लढ्याचा  इतिहास कळणार नाही"
अगदी बरोबर होत ते ,,,,,,,,
पण वागन तितकाच चुकिच होत 
कोंग्रेस्स्वाले वागले असते तर ठीक पण आपण ही?
सीमा वासियांच्या जखमांवर मीठ चोलायाचा प्रयत्न आपण का  केलात ?
राम राज्यात नसताना ज्या देशात भरताने राज्य केल नाही तो हाच देश होता की काय ?
असा प्रश्न आज पडलाय ,, 
तसाच आपला एक भाऊ अक्षरशः कर्नाटकात डांबला गेलाय 
१ में रोजी भारताच्या नकाशावर महाराष्ट्र राज्य ठोकल गेल 
इकडे आपण महाराष्ट्र राज्य दिन साजरा करतो 
आणि त्याना १ नोव्हेम्बर कर्नाटक राज्य दिन ,,,,
ते नाही साजरा करत म्हणा,,,
पण कर्नाटक आज पर्यंत हे मीठ चोळत होत तेच आज आपणही?,,,
थोड़ी थोडकी नाहीत ८३५  गाव,,,?
आज ही महाराष्ट्रात यायची इच्छा बाळगुण आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टी 
ज्यांच्याशी रोजचा संबंध येतो 
त्या सर्व मग ते 
जातीचा दाखला असो,
उत्त्पन्नाचा असो, जन्म मृत्यूचा असो, शेत जमिनीचा असो,
नोकरीचा प्रश्न असो, कानडी शिवाय पर्याय नाही आणि 
आता तर १९८६ पासून मराठी शालां मधून   
कानडी विषय सक्तिचा झाला आहे
त्यात पास तर पास नाहीतर ,,,?
आणि त्या भर ,,,वधु पिता सुद्धा 
मुलाला कानडी येत असेल छोकरी देतो 
कारण रोजी रोटीचा प्रश्न असतो  
  
त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येड्डीयुरप्पा यांनी  
  
'  
बेळगाव हे कर्नाटकचे असून येथे काय करायचे ,  

काय नाही याबाबत आम्हाला महाराष्ट्राची परवानगी घेण्याची गरज नाही 

असे  बरळत आहेत

महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवाची तयारी करत असताना बेळगाव

कारवार , निपाणीसह 

सा-या सीमाभागात कानडी अत्याचाराचा वरवंटा फिरतो आहे. 

मराठी युवकांना ठरवून मागे ठेवले जात आहे ,  

कानडीची सक्ती केली जात आहे एवढेच नव्हे तर बेळगाव महापालिकेत 

लोकशाहीला हरताळ फासून कानडी महापौर लादला जातोय. 

या सा-या विरोधाला आपन प्रत्युतर नाही दिल तर सीमा वासी आपल्याला 

कदापि माफ करनार नाही

वास्तविक  दोनच दिवसांपूर्वी मा. कार्याध्यकशांनी रक्ताचा महायदन्य  

घातला होता आणि  गिनीज बुकात त्याची नोंदही झाली

असो पण त्याही पेक्षा हे जमा झालेले २५\३० हजार लोक (शिवसैनिक) 

घेवुन बेळगाववर चालुन गेले असते तर ,,,,

भारताच्या इतिहासात नाव सुवर्ण क्षरान्नी लिहिल गेल असत 

जमा केलेल रक्त तिथे सांडल असत तर फार बरे झाले असते

निदान सिमावासियांचे कामी आल असत 


मला माहित आहे एव्हड सोप्प नाही पण सैनिकाना ते कठिन ही नव्हत 

या आधी ही शिवसैनिकानी साहेबांच्या शब्दा खातर धड़का दिल्या आहेत 
 
अगदी कर्नाटकात पोलिसांचा मार ही खाल्लाय  ,,,

काल परवा बाबरी वरही धड़क दिली आहे

तुमच्याच शब्दा खातर मुम्बैत हिर्व्यांची मस्ती उतरवली आहे ,,

अस हे सार असताना साहेब आपण हे  

सुवर्णमहोत्सव सारखे सण साजरे करून 

सीमा वासियांच्या जखमांवर मीठ का चोळत आहात ?

हे कमी म्हणून की काय तो 

"एक सुर हृदयाचा" हा ही कार्यक्रम केलात 

तुमच्या ह्रुदयात आता सीमा वासियांचा सुर राहिला नाही का?

साहेब ह्रदय सुद्धा दोन असतात आणि एकच शरीरात असतात

त्याशिवाय शरीराला अर्थ ही नसतो 

एक उजव एक डाव,,,,,

इकडे महाराष्ट्र उजव्या ह्रुदयात आहे

तर डाव्यात सीमा बांधव ,,,,, 

हे उजव ह्रदय मुंबई मीळवुन 

आपल्या कार्याची इतिश्री असे समजू लागले आहे 

मराठे लढाया जिंकतात आणि तहात हारतात हेच खर ,,,,,,,

१०६ हौतात्म्य पत्करून मुंबई मीळवुन दिली 

खरी

मंगल कलश आणला म्हणतात पण त्या 

कलशावर 

सीमा भागाच श्रीफळ कुठे होत ?

विना श्रीफळ तो मंगल कलश कसा काय?

 तो तर निव्वळ तांब्या  ,,,,,,,,,आणि

तांब्याच  कसल आलय सुवर्णमहोत्सव?

मग 

सीमा भागातल्या मराठी बांधवांच काय ?

अत्यंत सनद शिर मार्गाने ते लढा देत आहेत ही चुक आहे का त्यांची?

साहेब कृपया असेल सण निदान आपण तरी साजरे न करावे 

पुन्हा एकदा हाक द्या आम्हाला आम्ही तुमच्या आवाजाची वाट पाहत 

आहोत 

साहेब आम्ही आहोत पुन्हा एकदा बेळगावावर धड़क देवू 

सीमा भाग महाराष्ट्रात आणू खुप कठिन नाही .

अवघड तर मुलीच नाही 

गेली सहा दशके कर्नाटकी जुलुमाला कंटाळलेल्या सीमावासीयांचे 

आपण एकमेव आधार आहात 

आपल राज्य आणि केंद्रात ही आपल सरकार असताना

जे केल नाही ते निदान आता तरी करू या 

सीमाभागाच्या व्यथेची ही भळभळती जखम घेऊनच महाराष्ट्रत  

आपण आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणे चुकीचे 

साहेब हात जोडून पुन्हा एकदा नम्र विनंती

एक आवाज द्या 

खर्या अर्थाने 

"गर्जा जयजयकार करू तेव्हाच जेव्हा सीमा 

 भाग महाराष्ट्रात  येईल  "

बघा तुमचा सैनिक आजही काय करतो ते 

आपला 

कडवट शिवसैनिक सुनील भुमकर

No comments:

Post a Comment