Wednesday, July 14, 2010

समस्त निर्लज्ज राजकारण्यांना ,,,,

सप्रेम जय महाराष्ट्र ,
वादग्रस्त सीमा भाग ८३५ गाव जो पर्यंत महाराष्ट्रात
येत नाहीत तो पर्यंत हा लढा चालूच राहील,,,
मु,मुख्यमंत्री,,,,,,,महाराष्ट्र राज्य.
,,,,,
कानडी लांडग्यांच्या गळ्यात पट्टा बांधा,,
उ,ठाकरे,,,,,
,,,,
nda चे सरकार होते काय केले सेनेने?
रा,ठाकरे,,,
,,,,
बेळगाव भारतातच आहे पाकिस्तानात नाही,,
पी,चिदम्बरम,,,
,,,,
हे सारे नेते महाराष्ट्राच्या आणि सीमाभागाच्या गप्पा मारतात
सीमाभाग महारष्ट्रात आणण्याच्या ह्या असल्या गप्पा
आता बस्स झाल्या
जरा तुमच्या
टिनोपोली कपड्यातून
भारी गाड्यातून
मोबाईली प्रस्थातून
बाहेर या आणि आधी पी.चीदाम्बारामच्या कानाखाली वाजवून विचारा
"बेळगाव जर भारतात आहे तर बाबा,,,
कर्नाटक तामिळनाडू च्या पाणी प्रश्नात
हे पाणी भारतातच आहे ना? अस जरा
कर्नाटक तमिळनाडूच्या लोकांना साग कि,,,,?"
कुणीही ऐर्यागैर्यान उठाव आणि महाष्ट्राला उल्लू बनवावा काय ?
आपणा सर्वात जरा जरी लाज शिल्लक असेल असेल तर ,,,
उठा पुन्हा एकदा आपण सारे
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढू
आम्ही सारी मराठी जनता
आपल्या मागे ठाम उभी राहील ,,,
पुन्हा एकदा सीमा भागात धडक देवू
,,,,,,साध दोन ओळींचं निवेदन देण्यास निघालेल्या
सीमा बांधवांवर कर्नाटकी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला .
त्यांची डोकी फोडली.
गेली ६० वर्षे हा नित्याचाच प्रकार आहे.
जरा कुठे मराठी माणूस रस्त्यावर उतरला कि
काढा झोडपून ,,,,
त्यांनी मार तरी किती खावा ,,,?
तिसर्या पिढीने हि,,, ?
सीमा वासी नक्की राहतात कुठे ?
भारतात कि पाकिस्तानात?
आज तर वरताण केली त्यांनी या मोर्चेकार्यांवर
कलम ३०२ खाली सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
का तर ,,,
"केंद्राने मराठी भाषिकांवर, महार्ष्ट्रावर, अन्याय करू नये.
हे दोन ओळींचं निवेदन दिले ,,,, "
खुलेआम भारतीय घटनेला पायदळी तुडवून हे सारे नेते वर नैतिकतेचा
टेंभा मिरवत मिठाची गुळणी घेवून गप्प बसलेत.
अहिंसावादी भारतात अहिंसेच्या मार्गाने गेले तर ,,,
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो,,,,?
ज्यानि कुणीही खून केला नाही ,,,
त्या निष्पाप लोकांची डोकी फोड्नार्यांच्या,
छाताडावर उद्या कर्नाटक सरकार मर्दानगीचे बिल्ले हि लावेल,,,
गांधी बाबा बघतोयस ना?
तुझ्या अहिंसेची अशी खिल्ली श्री.नथूरामजीन हि उडवली नसेल,,,,
एव्हडी कर्नाटक सरकारने उडवली आहे ,,,
याबद्दल आता तूच वरून काँग्रेस दरबारी किंवा ,,,
न्यायालयात खटला दाखल कर आणि
असल्या बेजाबदारी बद्दल जबर दंड
ठोठवावा असे निवेदन दे ,,,
पण सांभाळून रे बाबा हे ईन्ग्रज सरकार नाही
हे काँग्रेस सरकार आहे. 
ज्या काँग्रेसला बरखास्त करायचा आदेश दिला होतास ,,,
पण त्यांनी तुला आणि तुझ्या तत्वांना बरखास्त करणे
पसंद केले,,,, असो जावू दे तू नको विचार करू
आणि परत यायचा तर बिलकुल विचार नको करू,,,
तेव्हा ,,,
मरहटयांनो,,,
येथे बसून कागदी घोडे नाचण्यात काहीच अर्थ नाही ,
बस्स झाले आता बस्स ,,,,
संयुक्त महार्ष्ट्राच्या वेळी "आधी लगीन कोंढाण्याचे म्हणत
सीमा भागाला उल्लू बनवलं बिचारा रायबा आता कोंढाण्याचे
लगीन होईल मग आपले नक्की या आशेवर आजही तो
गुढग्याला बाशिंग बांधून उभा आहे कधी तरी मी महाराष्ट्रात जाईल,,,
ह्या आशेवर,,,ईकडे कोंढाणा खावून पिवून माजला,
सत्ता भोगून उताणा हि झाला आणि महार्ष्ट्राच्या त्या मंगल
कलशावर ,,महारार्ष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा देखील केला.
आणि रायबा तिकडे म्हाताराही झला पण,,,
आज हि त्यांची तिसरी पिढी त्याच जोमाने
लढा देतेय महारष्ट्रात येण्यासाठी .आपण आज काही हालचाल नाही केली तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही रे,,,,,
माझे वडील सांगतात
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या
वेळेस कानडी जर माणूस सीमा भागात आला
तर मराठीत बोलत असे,,
मग नेमकी ही आज ताकद गेली कुठे ?
आणि घालवली कुणी,,,,?

1 comment:

  1. Rahul Taigade commented on your link:

    "Great......"

    Reply to this email to comment on this link.

    To see the comment thread, follow the link below:
    http://www.facebook.com/n/?profile.php&id=100001161010917&v=wall&story_fbid=133262580047733&mid=2ab4cf6G5af3422096d9G22892bGe&n_m=suprabhu12%40gmail.com

    ReplyDelete