Sunday, July 18, 2010

निदान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी,,,

प्रति,
महाराष्ट्र सरकार आणि 
अप्पल पोटे राजकारणी यांस
सप्रेम जयमहाराष्ट्र ,
खरतर येथे महार्ष्ट्राच्या फायद्यासाठी हा शब्द वापरायचा होता पण,,,
आमच्या समस्त राज्यकर्त्यांना केवळ
स्वतःचा स्वार्थच समजतो कळतो म्हणून,,,,
असो ,कालच बाभळीच्या बंधार्यात,
चंद्राबाबू शिरले त्यांनी स्वतःला त्यांच्या ६०\७०
आमदार खासदार कार्यकर्त्यांसह अटक करवून घेतली.
आणि सर्वच थरातून त्यांच्यावर टीका झाली ,
"धर्माबाद येथील बाभळीच्या बंधार्याचे पाणी तापवत 

त्यावर आपली राजकीय पोळी भाजली "
असा एकंदर सूर होता ,
मा.मु.ख्यमंत्री मग मागे कसे राहतील ?
त्यांनीही हे सारे प्रकरण म्हणजे एक ,
स्टंटबाजी होती असे म्हणून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला
आणि आपले तथाकथित पाठीराखे ही
बरोबर गप्प बसले त्यांना माहित आहे आपल्याला
तुरुंगात जाण परवडणार नाही,,,
पण सीमाभागाची दुसरी बाजू तपासली तर
असे लक्षात येईल कि हा लढा दिला तर
सीमाभाग महाराष्ट्रात तर येइलच,
त्यांचे आशीर्वाद तर मिळतीलच,
पण त्याही पेक्षा ह्या लढ्यामुळे त्याचं नाव
महाराष्ट्राच्या ईतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल

आणि त्यांची कारकीर्दही वाढेल,,,
याचा त्याना आयुष्यभरासाठी फायदाच फायदा होईल,,,,
पुढच्या सात पिढ्या बसून खातील
महाराष्ट्रात हि राजशेखर रेड्डी तयार होतील,,,
त्यांच्या साठी जीव देणारे तयार होतील,,
आणि स्वार्थातून परमार्थ साधला जाईल.
तर,,,,दुसरी बाजूशी कि ,,
बेळगाव आणि कोल्हापूर यांच्या दरम्यानच्या गावागावातून होणारा
मिरची आणि तंबाखूचा नगदी व्यापार ,,,,
यांच्या मधून मिळणारा महसूल,,
आज कर्नाटकला मिळत आहे
हा सीमाभाग जर महाराष्ट्रात आला तर,
येणारा सर्व महसूल महाष्ट्राला मिळेल,
महाराष्ट्राचे ओलिताखाली क्षेत्र वाढेल,
पर्यायाने पाणी वाटपात कर्नाटकाचा तोटा होईल,
आणि ह्याच स्वार्थ पाई कर्नाटक सरकार
कर नाटक कर नाटक खेळत आहे.
तिथे कानडी सक्तीची आणि जोरजबरदस्ती
हे सार किती हि खर असल तरी तरी त्यांना विनासायास 
मिळणारा महसूल हि बुडवायचा नाही ,,
म्हणूनच ,,,
मराठी भाषिकांनी जरा जरी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला
तरी कन्नड वेदिकेचे गुंड आणि
पोलीस ,सरकार हि त्यांच्यावर तुटून पडतात,
त्यासाठी त्यांना कुणाच्या हि आदेशाची
गरज नसते,,,,,,,,,,,
तेव्हा महाराष्ट्रावर उपकार आणि 

स्वतःचा आजन्म स्वार्थ साधायचा असेल ,
तर निदान
महाराष्ट्राला महसूल आणि
सिमाबंधावना महाराष्ट्र मिळवून द्या
बघा तुमच्या साठी
आजन्म सत्ता नारायण आणि सत्ता सुंदरी पायघडया घालेल.
आज पावेतो तुमच्या हातून नकळत
सीमाप्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवले गेले
त्यातून उतराई होण्याची हि नामी संधी आहे.
आज ६० वर्षे झाली या लढ्याला त्यांची तिसरी पिढीही त्याच
तडफेने सीमाभागाचा किल्ला लढवत आहे ,
प्रत्यक्ष भाग घेतलेले आज एकतर पार थकलेत 
किवा स्वर्गस्थ हि झालेत ,,
सध्यस्थितीत  तुमच सरकार राज्यात आणि केंद्रात आहे
बघा एका प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या
आणि स्वतः बरोबर सिमाबांधावंचहि भल करा


  
    

No comments:

Post a Comment