Tuesday, August 10, 2010

स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवा नंतर ,,,,




स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवा  नंतर ,,,,
मला वाटे ,,,,,,,,?
मला वाटे,,,,,,, नेता व्हावे
पैसे लुटुनी बंगले बांधावे,,,,
देशसेवेच्या नावाखाली आपल्याच पिढ्यांचे कल्याण करावे |
कधी कधी मला वाटे ,,,
गरिबांचे गळे कापून
स्वतःचे मात्र रत्नांनी सजवावे ||
आज मात्र मला वाटते
भ्रष्टाचार दाबण्यासाठी पोलीस अधिकार्यांनाहि खुश ठेवावे ,
जगाला सांगावे
मुलगा असो व मुलगी एकातच समाधान मानावे,
स्वतःचे मात्र ४\४ वंशाचे दिवे असावेत
मला वाटते,
महात्मा बाजूला ठेवून  गांधीचे?
आदर्श लोकांना सांगावेत
स्वतः मात्र हर्षद मेहता सारखे वागावे ||
देशातील युवकांनी शेतीतच राबावे
शेती विकासावर भर द्यावा
आणि माझ्या मुलांनी डॉक्टर ईन्जिनियर पदवीसाठी
विदेशात शिक्षण घ्यावे ||
मग काय तुम्हालाही वाटते न नेता व्हावे ?
मखमली खुर्चीवर बसून
भ्रष्टाचाराचे धागे दोरे विनावे ,
मला वाटे,,
अपक्ष उमेदवार म्हणून सर्वांनी
निवडणुकीला उभे राहावे
सर्वांनाच वाव आणि भाव असताना गरिबांनी दूर का राहावे?
कधी कधी मला वाटते
सर्वानीच नेता व्हावे
भारताला
भ्रष्टाचारात कोट्याधीश बनवावे 

No comments:

Post a Comment