Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्य दि न आणि प्रजासत्तक दिन

त्यावेळी म्हणजे 
मी २ री ,३ रीत होतो उल्हास नगरला माझ्या आत्याकडे ,,
तस गावठाणच त्यामुळे प्रार्थमिक ईस्त्रीवाला हि नसायचा.
तसे ईस्त्रिचे कपडे घालून फिरायची पद्धत हि नव्हती,
घरी मोठा कार्यक्रम असेल तर तीही तांब्याची ईस्त्री
म्हणजे तांब्यात कोळसा घालून  ,,,
किंवा सरळ घडी घालून गादी खाली ठेवणे पण
त्याला तो ईस्त्रिचा सुगंध येत नसे ,,
काय पण आमची आवड,,,?
आत्ताच्या मुलांना हे कळत असेल काहो?.......
यात तेही आनद मनात असतील काहो?....
असो तर आमच्या सारखेच आमचे मास्तर हि असेच
ईस्त्रिचि चैन त्यांना हि परवडत नसे,,,,,,,,,?
मोठ्या मुश्किलीने १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी
याच दिवशी ती ईस्त्री असे,,
आज हे नेमक आठवायचं कारण ,,,,
आज हि १५ ऑगस्ट ,,,,
माझ्या मुलाला उठवलं आणि शाळेत जायचा हुकुम दिला
रावसाहेब उठायला तयारच नव्हते
त्यांच्या म्हणण्यानुसार आज रविवार आणि मी शाळेत 

जावून काय करणार ?
आणि मी पुन्हा ,,,
माझ्या वर्गात गेलो काय ते दिवस होते..?
 मी आम्ही सारे सक्काळी सक्काळी वर्गात जमत असू ,
झाडून पुसून घेत असू ,वर्ग सजवत असू,
फळ्यावर सुविचार लिहित असू
थोरा मोठ्यांची वाक्य लिही असू,

प्रभात फेरी मारत असू,त्यावेळी खरोखर काही तरी भव्य करीत           आहोत असे वाटे,
स्वातंत्र्य कशाशी खातात
हे त्या वयात ते कळत नव्हत.
पण देशाभिमानाच शाळ्करू का होईना पण प्रेम होत,,,,
वयानुसार वाचनानुसार हे प्रेम नात्र नंतर वाळत गेल ,
पण माझ्या मुलाला हि अक्कल ईतक्या लावकर येईल असे वाटले नव्हते ,
पण त्याच्याशी बोललो तेव्हा त्याच वागण पटलही,,,,,
त्याला विचारलं काय मग या केलस आज वर्गात जावून,,,,?
मी आपला माझ्या भाबड्या विश्वात रमलेला ,,,,?
माझ उत्तर देईल अस वाटल पण कसलं काय ,
अगदी सहज बोलला काही नाही
गप्पाटप्पा केल्या थोड खेळलो
मग,,,?
तुला एव्हडा  उशीर का झाला?
मग आम्हाला एके ठिकाणी नेत्यांच भाषण होत
तिथे आम्हाला उभ केल,,त्यातच वेळ गेला .
त्यापेक्षा गेलो नसतो तर बर झाल असत,,
असाच त्याचा सूर होता
आणि हा सारा प्रकार आज मीही अनुभवला होता
आज माझ्या दुकानं शेजारी चौकात सारे कोन्ग्रेसी जमले होते
स्वातंत्र्य दिनाच्या नावाखाली राजरोस त्यांचा
कोन्ग्रेसचा प्रचार चालला होता 

एका महाभागने तर आज ,,,,,,,,
प्रजासत्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या 
त्या महाभागाच नाव संजय निरुपम
ज्यांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्तक दिन यांच्यातला
फरक कळत नाही ते आमचे नेते,,,,?
या महा देशाचे चालक,,,,,,,?
या महादशेला नक्की कोण जबाबदार  ,,,,,,,,?
ज्या आमच्या बाप लोकांनी
स्वातंत्र्यच रोप लावलं त्याला ह्या
उंदीर घुशींनी आज पोखरून ठेवलं आहे.
बर गमत अशी कुठल्या हि कंपनीकडे ह्या उंदीर घुशींचा
बंदोबस्त करायची ताकद नाही.
कुठल पेस्ट कंट्रोल नाही
सगळ बीओंड कंट्रोल गेल्यावर,,,,,,,,
आता स्वातंत्र्याला तरी तरी कुठल पेस्ट लावणार?
हि निराशा नाही पण
आकाशच फाटलं तर ठिगळ तरी कुठवर लावणार,,,,?
आणि आम्हाला पथदर्शक होतील असे नेते तरी कुठे आहेत?
स्वात्नत्र्यानानातर एकेवर्षी दुष्काळ पडला
त्यावेळी लाल बहादुर शास्त्री पंत प्रधान होते
लाल किल्यावरुन त्यांनी सांगितलं
देशात दुष्काळ पडला आहे आजपासून मी सायंकाळ च जेवण बंद करणार आहे
त्यानंतर जनतेला त्यांना आवाहन करायची गरज पडली नाही
जनतेने स्वताहून सायंकाळचे जेवण सोडून दिले होते
कारण आमच्या बापझाद्यांची जशी लायकी होती
तसाच त्यांना सरकार मिळाल होत
आणि आज आमची जशी लायकी,,,,,,,,,?
जाता जाता गदिमांच्या चार ओळी आठवल्या ,,,
त्या अशा,
"कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची
रामायणे येथे घडावी येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे,
आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे,
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे "
सध्या तरी हे राष्ट्र नक्की कुणाचे आहे ?
माहित असल्यास कळ्वा मी पुढे जावून
गदिमांना सांगेन,,,

1 comment:

  1. Omкαr™..:
    दा एक्झाटली हेच बोलायचे आहे मल.... परीणामांची पर्वा करत राहीलो तर निदान आज जे काही घडतेय त्यापेक्षा भयानक घडण्याची वाट पाहावी लागेल.... भारतात राहुन पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन... की प्रजासत्ताक दिन हे समजत नसेल तर अश्या नेत्यांना खासदार ... आमदार किंवा सामान्य माणसाला प्रजासत्ताक भारताचे आपण नागरीक आहोत हे बोलायला लाज वाटली पाहीजे....

    ReplyDelete