Monday, August 30, 2010

तोडपानी ,सेटिंग, बेटिंग, बिल्डर

सत्तेचा सोपान चढता चढता
थकलेले म.चाणक्य ,
मा.श्री शरद रावजी पवारजी
साहेब, सप्रेम
अस्लाम वालेकुम (दचकू नका रोजा चालू हाय म्हणून,,)
आन महारष्ट्राला, हिंदुत्वला ईचारुन कुणाच भल हुणार हाये?
वाघांची संख्या कमी हुया लागली हाये
ह्ये बी खर हाय बाल बुद्धी असल बी पर आमाला आमच्या सायबांनी
बाळकडू पाजल्याल हाये तवा,,,
वय जास्त झाल्याला माणूस काई बाई बरळतो तस तुमच झाल्याल हाय ,,,
खाल्या मिठाला जागण खरतर आपल काम न्हाई
रोजाची बिर्याणी खाल्लीत आन हिरवी गरळ ओकलात,,,
आन अचानक त्या मंद बुद्धीच्या चिदंबरमची साथ देवून बसलात
हिरवी टोपी चढवल्यावर तुमाला भगवा दहशतवाद दिसला,,,
त्ये ठरल्याल हुतच म्हणा ह्यांच्या केसांना (दाढीच्या वो )
कुरवाळण आपल कामच हाय हिंदू जातोय कुट?
आन त्याच्या बी आदि काय ? तर ,,
मी जोतिषी न्हाई,,,
याप जास्त माज्यावर त्यो कमी कराया पायजे,,,
तरी बी आपली बुद्धी ईतकी फिर्ल्याली नसल
अस वाटल हुत पर आता तुमी शिवसेना भाजप वर,,,
बिल्डरांसाठी ह्ये लोक तोडपानी करत्यात असा आरोप केल्याला हाये
काय र माज्या कर्मा,,,,,?
आवो तोडपानी ,सेटिंग, बेटिंग, बिल्डर ह्ये समदे शब्द
आपल्या शब्द कोशातील हायेत ,,,
ईसर्लात व्हय?
थांबा समद सांगतो आवो हुत अस कवा कवा
तुमीबी काय करणार तुमच वय झाल्याल हाय ,,,
तर,,
जावा तुमी मु.मंत्री व्हता तावाची गोस्त हाय अवो तवापासून तर
मराठीत "भूखंडाच शिरीखंड "होय शब्द रूड झाल्याला हाये,
त्ये काय जणू बागा २८५ भूखंड तुमी लाट्ल्ये म्हणत्यात, 
मी म्हणतु जीब कशी झडत न्हाई या लोकांची 
एकुलती एय्क पोरगी  हाये तीचबी लगीन झाल्याल हाये
काळ कुत्र तर हाये का खाया ईस्टेट  ,,,
ह्ये कावा कळायचं वो ह्यास्नी,,,?
वर म्हणतात कस,,?
गरीब मराठी माणसाच्या गिरणीच्या जमिनी तुम्मीच घशात  घातल्या,,
घशाचा क्यांसार त्यामुळच तर न्हाई झाला नव्ह?
अन्न धन्य काय खाता त्यापरीस दारू प्या ,,
अस सांगणार तुमीच ,,,
धान्या पासून वाइन बनवू म्ह्न्नारे तुमीच ,, 
१२च ठंडा पीता नव्ह ? मग म्हागाईच्या नावान का वराडताय,,?
अस बी तुमी म्हणल व्ह्य वो?
संरक्षण मंत्री असताना लष्कराच्या जमिनी बी तुमीच ईक्ल्या व्ह्य वो,,?
आन ती बांद्र्याची शासकीय जमीन ,,,?तीबी तुमीच
बिल्डरांच्या गोठ्यात बांधली म्हणत्यात ,,,
शेतकरी आत्महत्या करत हुते तवा तुमी त्या निरो सारख,,,,
किरकेट खेळत बसता म्हणत्यात,,,

"शेती परवडत नसल तर शेतकर्यान शेतीच करू नाय " असा सल्ला 
मंत्री झाल्या झाल्या तुमी दिला व्हता

तुमास्नी शेत म्हणजी जमीन आन जमीन म्हणजी भूखंड ऐव्हडच  माहित न्हव का?,,,
तवा ह्ये समद खर असल तर जाता जाता येक सल्ला  दिवू का?
शरद रावजी तुमी यापुढ येक  कराव  ,,,,
त्ये अशोकाच मतलबी झाड पोसाव तुमच्या वाणीच हाय
त्याचा कुणालाबी उपयोग न्हाय
जसा तुमचा,,,,,,?

1 comment: