||श्री नथू रामाय नमः||
गणरायाचे आगमन कधी झाले आणि उद्या चाललेही
म्हणून काळ लवकर झोपलो म्हंटल आजकाल
सजीव देखाव्यांची चर्चा आहे उद्या कुठल्याही परिस्थितीत
जायचे पाहून यायचे ,,, कुठे आधी जायचे याची यादी बनवता बनवता
डोळा कधी लागला ते कळलच नाही
अचानक कसल्या तरी आवाजाने जग आली
खर तर ती कुणाची तरी खुडबुड चाली होती डोळे उघडले तर,,,
साक्षात गणराय त्यांच्या वाहनावर बसून आले होते ,,,,
मी उडालोच साक्षात बाप्पा,,,?
अरे बाबा याव लागत भक्ताच्या हाकेला ओ द्यावी लागते
तू कुठ कुठ आणि कसा फिरणार ?
मी प्रत्येक गल्लीबोळात आहे
प्रत्येक खड्यात आहे
मंडळाच्या देणगीत आहे
डिजे च्या तालात आहे
रम्मी च्या पानात आहे
दारूच्या ग्लासात आहे
पण तुला दिसत नाही तसेच काही सजीव देखावे
ज्यात होणारी कुचंबना दिसत नाही ती
तुला दाखवावी म्हणतो म्हणून आलो
माझ्या भोवतीच लाईव्ह महाभारत तुला दाखवतो
कारण तू कायमच धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत आला आहेस
आणि मी कायम संजयच्या भूमिकेत ,,,,
मला डोळे उघडे ठेवावेच लागतात ,,
प्रत्येकाच्या पदरात त्याच माप टाकायचं असत ना?
देखावा क्रमांक १,
माझा हात धरून बाप्पाने मला कोन्ग्रेस कमिटी
कार्यालयापुढे उभे केले ,,,
तिथे स्टेजवर हातात माईक घेवून मनमोहन
भाषण करत होते ,,,
आणि स्टेज मागच्या अंधारात सोनिया माता हातात
सुई घेवून उभ्या होत्या,,,,कुणाला दिसत नव्हत्या पण ,,
बाप्पा मुले मला दिसत होत्या,
मी -बाप्पा सोनिया माता अशा अंधारात का?
बाप्पा-अरे आता काय झालाय कोन्ग्रेस सरकार पुन्हा स्थिर झालाय
त्या मनमोहनाला कानात वार भरल्यासारख झालाय
त्यान काहीबाही बरळू नये,
मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ,
म्हणून वेळ पडल्यास लगेच कारवाई
म्हणून त्या सुई घेवून उभ्या आहेत त्याचे कान टोचायला ,,,,
देखावा क्रमाक .२
हाताला धरून बाप्पान मग मला
एका मैद्याच्या पोत्या समोर उभा केल,,,
मी- बाप्पा हे काय ?
बाप्पा - बरोबर ह्या पोत्यात काय आहे हे मीच काय
पण ते स्वतः पोत हि सांगू शकत नाही ,,
पण आताच गुप्तचरांकडून बातमी समजली म्हणू सांगतो
ते आपले शरद पवार आहेत
मी- मग ते ईथे सडलेल्या धान्याच्या राशीवर बसून काय करत आहेत?
आणि हे काय साक्षात दरिद्री नारायण त्यांच्या समोर झोळी
धरून सडलेले धन्य तरी द्या म्हणतो त्याची दारू नका बनवू विनवतो आहे
हे त्यांना ऐकू येत नाही का?
बाप्पा- अरे माज्या सोन्या असा कसा रे तू आंधळा?
त्या पोत्या मागे हसत खिदळत असलेले
सावकार,शेठ, धनिक,बिल्डर, तुला दिसत नाही का?
बघ बघ त्यांना कशा आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत,,
आणि कोर्टाने हि बजावले आहे कुणालाही फुकट काहीही देवू नये,,,
आणि साहेबांचा तर जन्मच त्यासाठी झाला आहे
त्यांना घ्यायचं माहित आहे द्यायचं कुणास ठावूक,,,?
देखावा क्रमांक ३,
डोळे मिटले क्षणार्धात मी भाजप कार्यालय समोर ,,,
झारखंडी मुख्यमंत्री श्री.अर्जुन मुंडा
शपत घेत आहेत आणि अंधारात ,,,,
स्टेज खाली काळा चष्मा लावून,
सुषमा स्वराज ,अडवाणीजी,अरुणजी, उभे आहेत
अंधारात हि त्यांच्या चेहर्यावरची नाराजी स्पष्ट दिसत आहे .
आणि त्याच अंधारात कोपर्यात हातात करवत घेवून
शिबू सोरेन उभे आहेत,,,,
मी- बाप्पा हा साधू पुरुष कोण?
बाप्पा -मुर्खा तो साधू नाही तो "शी- बु" सोरेन आहे.
मी- हो पण हात करवत का आहे त्यांच्या ?
बाप्पा- अरे मुर्खा भाजपाने त्याच्या ,,
झारखंड मुक्ती मोर्चाला पाठींबा दिलाय
मी-मग काय झाल?
बाप्पा -आधी पूर्ण ऐक मग बोल
अरे त्यांच्या मुलालाही उपमुख्यमंत्री करायचं आश्वासन त्यांनी दिलाय
ते जर नाही पळाल तर मुंडाच्या खुर्चीचे पाय कापलेच समज,,,
तरी भाजपा पाठींबा देते ?
हे विचारू नकोस मी ईतका सर्वज्ञानी पण,,
भाजपा चे हे राजकारण मलाही
अजून कळल नाही,,,,, तर,
तुझ्या सारख्या झमप्याला काय कळणार ,,,?
देखावा क्रमांक,४.
चल पुढे चल तो बघ २५० कोटींचा बोकड
भर रस्त्यात कापत आहेत महानगर पालिके समोर
प्रत्येक जन येवून आपापला वाटा घेत होता ,,
सारेच वाटेकरी.........
कारभार्याने आधीच मुंढी पळवली होती,
कुणी कलिजा ,कुणी कातड,
कुणी पाय ,तर काहींना फक्त हाड चघळायला
मिळाली होती त्यामुळे हाडाचे नगरसेवक चवताळले होते ,
काहीजण तर आमचा वाटा द्या नाहीतर,,,ची भाषा करत होते
प्रकरण हातघाईवर आल होत.
आईचे लाचे तोडणारे लांडगे पाहून मी जाम घाबरलो
बाप्पा चल बाबा पुढे चल नको ईथे थांबायला
ट्याकसी कर आणि मला घरी सोड बस झाले
हे सजीव देखावे मी आपला धृतराष्ट्राच बरा,,,
घरी आलो जरा कुठे हाशहुश नाही करत तोच
बाप्पा परत मला म्हणाला चल उरलेले देखावे
दाखवतो पटापट उद्या मी जाणार मग कोण तुझे डोळे उघडणार ?
नकोरे बाबा हे सार नाही बघवत तू कस काय बघतोस
देव जाने तुझ्यात ईतकी ताकद कुठून आली ?
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Tuesday, September 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteतुला दाखवावी म्हणतो म्हणून आलो
ReplyDeleteमाझ्या भोवतीच लाईव्ह महाभारत तुला दाखवतो
कारण तू कायमच धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत आला आहेस
आणि मी कायम संजयच्या भूमिकेत ,,,,
मला डोळे उघडे ठेवावेच लागतात ,,
प्रत्येकाच्या पदरात त्याच माप टाकायचं असत ना?