Saturday, October 23, 2010

महाराष्ट्राचा विकास आणि भ्रम,,,,

व्हय ह्यो महाराष्ट्र बिहार्यानीच घडवला
प्रिय राहुल बाबा ( संजू बाबाच्य स्टाईल)
सध्या तुमची रोजच मुक्ताफळ वाचायला ऐकायला मिळतात .आन धन्य धन्य होत .
त्रिवार सलाम त्या तुमच्या ईटालीयन मातेला.
म्हंजी बगा सोताला ह्या देशाची कायबी माहिती नाय, पर पोराला आक्षी ब्यारीष्ट्रावणी बोलाया शिकवलं हाय .
आन भाषा तर आक्षी गांधीच्या मुखातून पडल्यावणी
बोलताय जणू.
स्वारी स्वारी तुमी नेहरू खानदानाचे न्हाय का?
काय नु त्या गांधी बाबांनी (ह्ये बी संजू बाबा,,,,)
तुमच्या आजीला सोताच नाव दिल आन तुमी गांधी झालात .
जावू द्या मी बी काय घिवून बसलो हाय ,,,
गांधी नावच लफड तुमास्नी कस ठाव असणार
तुमचाच काय तुमच्या बाचा बी
जलम नवता झाल्येला ,,,,
तर मुद्दा काय हे बिहारी...
तुमाला सांगतो राहुल बाबा ,,,
आवो ह्ये महाराष्ट्रातले मराठी मराठी करणारे
त्ये समदे फुढारी लई बदमाश बगा.
ह्यांना हाणामार्या करण्याबिगर काय सुदुक न्हाई येत बगा,
त्ये म्हणत्यात म्हंजी अस कि ह्यांच्या बापझाद्यानी बी हि मुंबई
हाणामारी करून मिळवली हाय . म्हंजी त्यांचा
पिढीजात धंदा हाय बगा तो,
जाऊ द्या तुमास्नी ठाव नसल
तवा तुमचा जलम बी नवता झाल्येला,,,
हव तर त्या शंकर राव नावच लुब्र कुत्र
तुमच्या घरात हुत त्याला इचारा ,,,,
कोण शंकर राव ? बरुबर हाय तुमचा
तवा जलम बी नवता झाल्येला....
त्यांनाच काय मंगल कलश का काय आणला व्हता
महाराष्ट्राचा ,,,,
आन तावपास्न बगा ह्या मराठ्यांनी काय सुदिक
बी महाराष्ट्राचा ईकास न्हाय केला.
तुमी म्हनताव ते आक्षी खर हाय ,
बिहार्यांनी ह्यास्नी कापड घालाया शिकिवल,
लिहाया वाचाया शिकवलं,
फाड-फाड विंग्रजी बोलाया शिकिवल,
राहणीमान ह्यांनीच उंचावल ,
आन ठाव हाय का ,
पहिला मराठी शिणुमा बी ह्यांनीच काडला व्हता ,
ईथल रस्ते बिहार्यांनी बांधल ,
बिल्डिंगी ईथल्या बी त्यांनीच बांधल्या,
मोठमोठ्या कंपन्या ह्यांनीच काडल्या,
५५ उड्डाणपूल बी ह्यांनीच बांदल ,
एक्ष्प्रेस्स हायवे त्यांनीच बांदला,
समद्या नद्यांवर पूल
धरण, कालाव, पोस्ट, ब्यांका ,
काय नाय केल बिहार्यांनी महाराष्ट्र साठी ?
पार आडणी वो ह्ये मराठे ?
ह्यो आडण्याचा गाडा चालवायचा काम काय सोप्प होत राव ?
पर ह्या  मराठ्यांना काय कदरच नाय त्याची,,,
येवड उपकार हायेत बिहार्यांचे
तवा एक आणखी उपकार करा ,,,?
महार्ष्ट्राचा आणखी ईकास व्हावा आस वाटत असाल तर ,,,?
त्या अशोकाच्या झाडाला हटवून (बिन कामाच बिन कण्याच)
एका बिहार्यालाच मुख्यमंत्री करा ........
नाय तर अस करा ना
सार मंत्री मंडळच बरखास्त करा ,
आन त्यांच्या जागी हरहुन्नरी बिहारींना बसावा ,
भल त्यांस्नी बिहारचा महाराष्ट्र कराया जमला नसल
पण त्ये महाराष्ट्राचा बिहार जरूर करतील ,,
तेवड कर्तबगार हायेत त्ये,
तवा बगा ह्यो लई जालीम परयोग हाय
समद्या ईरोधकाणची थोबाड बंद करा ,
आन ह्ये नसल जमत तर तुमच्या थोबाडच डबड वाजवायच बंद करा .
चांगल शिकलं सवर्ल्याल हाय तुमी थोड सुशिक्षित व्हता येतंय ते बगा ,
आवो ज्यांना सोताच्या राज्याचा ईकास न्हाय करता आला
त्ये आमच्या राज्यचा ईकास काय करणार?
जनावरांचा चारा सुदिक खानार्यांची  ह्यांची औलाद
चालू लालू ,रबडी, चारा ह्यापलीकडे ह्यास्नी काय बी ठाव न्हाय.
कधी जमल तर बिहारात जरा रपेट मारा,
जरा कळल ईकास कशाला म्हणत्यात
आन कशाशी खात्यात त्ये,
फकस्त मतांसाठी हि लाचारी बर न्हाई.
आन तुमच्या माहिती साठी आणखी येक गोष्ट सांगतो
माहित नसल
तवा तुमचा जलम बी नवता झाल्याला ....
३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला
दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडियाएक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.
याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी
महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय,
एका परीने मुंबई आम्ही विकतच घेतलीय.
भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले,
इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे.
या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून,कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी
राहतात इतकीच आमची  ओळख नाही.
मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच,
पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत!
तेव्हा  महाराष्ट्राचा विकास आम्ही  केला ह्या
भ्रमात कुणी राहू नये मराठे आहोत आम्ही.
तेव्हा बरोबरीचा करायची असेल तर ती
सिमी ची आणि बिहार्यांची करा........

2 comments:

  1. Devendra Marathe
    Devendra Marathe Priya Sunil, Tuza lihinyacha zapata khupach vilakshan aahe. Tu lihun damat nasashil pan vachun amhi damato re. Tyatach tuz lihin tikhatjaal asat tyane aciditi hote te vegalach. Asoo. asach lihit raha
    3 hours ago · Comment · LikeUnlike · See Wall-to-Wall

    ReplyDelete
  2. aapla Bhari lekh khup aavadala. saddhya kalyan_dombivali election madhye vyasta aahe, bhagwa fadaklach paahije. ek vinanti aahe ha lekh LOKADHIKAR paper madhye chaapnyachi parwangi havi aahe... RAM PRAHAR_Sunil Bhumkar ya titel sahit.
    Jai Hind! Jai Maharashtra!!

    ReplyDelete