Saturday, October 30, 2010

हवा बहोत तेज ही नार्या,,,,,,,,

वसूल मंत्री
आज सकाळ मध्ये आपले
शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले
हा सेनेवर प्रहार करणारा प्रश्न वाचला आणि,,,
अचानक मी मागे गेलो ,,,
आणि आठवलं तो पोरसवदा नार्या
कोंबडीचोर नार्या असाच एक दिवस साहेबांच्या पाया पडला
आणि नराचा नारायण व्हावा तसा नार्याचा नारायणराव झाला
शाखाप्रमुख, नगरसेवक,आमदार आणि मग
डायरेक्ट मुख्यमंत्री,,,,,,,?
नक्की किती दिलेत साहेबाना ?
तुम्हाला मुख्यमंत्री केल्याबद्दल ?
आमदार केल्या बद्दल?
काय हो  नारायणराव?
आजच सेनेत सेतीन बेटिंग होते शिवसेनेत याचा
अचानक साक्षात्कार कसाकाय झाला बुवा?
तुम्ही सेनेत होता तेव्हा सर्व आलबेल होत का?
अहो भ्रष्टाचार तुमच्या नसानसात भिनलेला आज तुमच्या 

"आदर्श मुख्यमंत्र्यांचे" प्रताप वाचलेत का?
अहो अशोकाच्या झाडाचे हो,
त्यांचे ते कारगिलच्या शहिदांचे जागा हडपण्याचा प्रकार माहित 

असेलच ना?
बर तुम्ही हि काही मागे नाहीत काय?
तुमच्या म्हणजे तुम्हीच हो
महाबळेश्‍वर येथील एका देवस्थानची जमीन
आठवलं कहो तुमच्या पत्नीला दिली म्हणे ?

तिच्या नावावर कशी झाली ती जमीन?
‘श्री क्षेत्र महाबळेश्‍वर ट्रस्ट’ ही छत्रपती शिवरायांच्या काळातील संस्कृती आणि ऐतिहासिक ठेव्याचे जतन करते.
त्या ट्रस्टची तब्बल 20 हजार चौ. फूट ती जागा,,,
आठवलं ना?
आणखी एक हि रुपाली रावराणे कोण बर जरा सांगाल का?
तिलाही म्हणे आदर्श मध्ये एक फ्ल्याट मिळाला आहे ?

विचार नाही, दिशा नाही, आचार नाही.उचलली जीभ की लावली टाळ्याला.
आणि एन्काऊंटर तर तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, 

असे लोक बोलतात.
कारण ‘शिवसेना नसती तर मी कधीच मुख्यमंत्री झालो नसतो.
उलट आमच्यासारख्यांचे एन्काऊंटर झाले असते
असे तुम्ही यांनीच अनेकदा जाहीरपणे कबूल केले आहे.
हे सार कबुल असेल तर खरच सेनेच चुकल नारोबा
त्यांना राजकारण कधी कळलच नाही.
नाही तर तुमच्या सारख्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल नसता
तेव्हा सेनेने मराठी माणसाला काय दिल,
ते प्रत्येक मराठी माणसाला माहित आहे,
जमलच कधी तर अंगावरची आमदार खासदाराची वस्त्र उतरवून
महाराष्ट्र बाहेर फिरा आपोआप कळेल
सेनेन मराठी माणसाची मान भारतात उंचवली आहे

आजही रस्त्यावर जेव्हा जेव्हा आणीबाणीची
परिस्थिती येते तेव्हा सर्वांना मराठी माणूसच आठवतो
आणि मराठी माणूस म्हणजे सेना बरका !
आणि लक्षात ठेवा लाचार होवून जगण्यापेक्षा
निष्टावंत म्हणून जगायला शिका ,,
शेळी होवून १०० दिवस जाण्यापेक्षा सिंह होवून जगा
आता त्याचा काय उपयोग म्हणा
कारण शेळीची शंभरी वेळ नाही लागत
आज अशोक रावांची भरेल उद्या
जातभाई म्हणून तुमचीहि,,,
हवा बहोत तेज ही नार्या अपनी टोपी संभालो .  
हो हे माहित नव्हत कि
सेनेन आणखी एक गद्दार महाराष्ट्राला दिला हे मात्र खर.

No comments:

Post a Comment