||श्री नथू रामाय नमः||
काल रातच्याला म्या उठलो आण निगलो समशानाकड आवो घाबरताय काय अस !
मला बागा रातच्याला समशानात जावून गाडलेली मढी उकरायची सव हाय.
दिस भर येल नसतो आन माझा मैतर त्येताळ त्योबी रातच्याला गावतोया.
त्येला घीवूनश्यान म्या रातभर हिंडतो आन म्या त्याच्या पर्शानांची उत्तर दिली कि जातुया उडून ,,,
त्याची आणि माजी बागा ती ईक्रम येतालाची कहाणी सुरु झाली तावपासन
लई घट्ट मैत्री हाय बागा ,
त्यो मला पर्शन ईचरतो आन म्याबी त्येच उत्तर दितो.
तवा काल बागा मला झोप यित नव्हती तर म्या म्हटलु चला इक चक्कर मारून यीवू,,,
आन मज पाय समशानाकड वळलं.
दारात पाय टाकला तर सामुरच येताळ बाबा
हातात क्यालक्युलेटर घिवून बसलेला
त्याच ते मढ उचलून घ्येणार त्योच त्यो माझ्या खांद्यावर यीवून बसला .
मी म्हटलु ह्ये काय करतोस गड्या,,,,?
त्यावर त्यो म्हणला आर बर जाल बग तू आलास चल ह्ये गणित सोडव
मी- ह्ये बाबा त्ये गणित बिनीत काय नको सांगू साळत लई टाकुर्र फिरवल हाय त्यान.
त्येच्या मुळ तर मी फुढ शिकलो नाय
येताळ- आर गमत तर बग,,,
मी- ये बाबा गमत आणि ती बी गणिताची ?
टाकुर्र तळ्यावर हाय नव्ह?
येताळ - आर माज्या राजा आर माज्या सोन्या
म्या हाय तुला मदत कराया तू घाबरतो कावून ?
मी - पार गणित तरी कसलं हाय?
येताळ- आर आर दम हाय का नाय,
आर त्या तुमच्या देशात नाय का आज काल लय भर्षाटार माजलेला हाय
त्येच गणित सांगतु बग समज,
तू काय बी आन कुणाच बी वाकड न करता तुज कुणी पाकीट मारलं तर,,,,,,,,?
मी-आर मला वळखत नाय व्हय?
हात नाय तोडणार साल्याच,,,,
मज्या स्वोभावानुसार म्या बोल्लू,
येताळ- त्ये हात नंतर तोड मला बी बगायचं हाय तुज्यात किती दम हाय त्ये,
जरा थाम आदी माज गणित सोडव ,
आर म्या हाय न मदतीला मी सांगतु तस सोडव गणित ,,,,,,
मी- बर बर संग,
येताळ- तर आपली लोकसंख्या किती हाय ?
मी- मला काय ठाव म्या मोजाय गेल्तो व्हय?
हा पर कुट तरी वाचाल हुत १०० का १२५ कोटी का काय हाय लोकसंख्या भारताची.
येताळ- आन त्या ए राजा न म्हण
१ लाख ७६ हजार कोटींचा घोटाळा केला?
मी- व्हय मग म्या काय करू?
येताळ- तू फकस्त म्या सांगतु तस गणित सोडव
मी- बर,
येताळ- हि रक्कम सरकारी तिजोरीत जाया हवी होती?
ती राजानं पळवली बरुबर ?
मी- व्हय बरोबर ,
येताळ - आता मला सांग ह्यी रक्कम कोणाची ?
मी - सरकारची,
येताळ- आर ये टक्कुर्यात येतंय का?
सरकारची म्हणजी कुणाची ? तुजी आन माजी ,समद्या लोकंची,देशाची बरुबर?
मी - बरुबर हाय मग?
येताळ - आर कुठल्या मूर्खाच्या नंदनवनातून आलेला हाय का?
मी- ये बाबा नसती कोडी नाग घालू नीट काय त्ये सांग,,,
येताळ- बर बर गी कागुद घ्ये आन सांगतु तस लिव
१ लाख ७६ हजार कोटी चा घोटाळा
भागिले लोकसंख्या
बग दरडोई किती रक्कम येतेया,,,?
मी- अंदाज बग १५०० रु व्हतात दर डोई ,,,,,,,
येताळ- मंग मला सांग ह्ये पैस कुंनाच?
तुज पाकीट नाय का मारलं राजानं अन सरकरान,,,,,,,,?
बर ह्यो जाला राजाचा घोटाळा
राष्ट्रकुलच बी तसच कर हिशेब
७७ हजार कोटी भागिले लोकसंख्या कर ,,,,,,,
मी- अंदाज बग ७०० रु. दर डोई आलं ,
ह्ये बी तुज पाकीट मारलं त्या कलमाडयान आन सरकरान ,,,,,,?
म्हंजी बग ताज ताज आता
२२ शे रु.च पाकीट सरकरान मारल्याल हाय ,,,,
ह्ये परकरण उजेडात आल्याला हाय म्हणून तुला समाजतया .
केवळ २ घोटाळ्यात अंदाज २.५ लाख कोटींची रक्कम ,,,,,,,,
तर माज्या राज्या माज्या सोन्या,
देशातल्या समद्या राजकारण्यांचे ,
केंद्र सरकारचे,
मंत्रालयाचे,त्यांच्या सरकारी उपक्रमा सकट ,
महापालिका, या सार्याचं वार्षिक घोटाळ एकत्र क्येल तर ,,,,,,?
तुज कमीत कमी किती रुपयांचं सरकार पाकीट माराल सरकार ?
ठाव हाय का?
मी-अंदाज १०\१२ हजार रुपयाच,,,,,,
येताळ- मग त्येला आता ६० वर्षान गुणाकार कर ,
आन मंग परत त्येला आलेल्या संखेला लोकसंख्येने गुण
बग किती येतात ,,,,,,,,,,
आन तू आजून बी झोपल्याला हाय ,,,,,,,,
म्या चाललू अस म्हणून येताळ उडून गेला ,पर
बाबाहो आपल्या काबाड कष्टाच्या कमाईचा हिशेब कवा तरी लावून बागा
आपल्या कमाईतली आपल्या कष्टाची कर म्हणून भरण्यातच जातीया.
मंग त्यो कर प्रत्यक्ष नाय तर अप्रत्यक्ष आसल,,
त्यातूनच नेत्यांचे ,मंत्र्यांचे ,त्यांच्या संत्र्यांचे चोचले पुरवले जातात .
त्या बद्दल आपल्या हाती काय तर फुटकी करवंटी,,,,,,?
लक्षावधी ,अब्जावधी रुपयांचे घोटाळे करून सरकारी तिजोरीवर
डाका घालतात आणि आपण अशा पाकीट मारांना निवडून देतो ?
आपलच पाकीट मारण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,,,?
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Saturday, November 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
lai bhari
ReplyDeletetodlas raja ...
dhnyvad amey
ReplyDelete