Tuesday, December 20, 2011

डर्टी "राज"-का-रण,,,

||श्री नथुरामाय नमः||
हे आहे राज ठाकरेंनी जी काल मुक्ताफळ उधळी त्याला चोख उत्तर,,
काल जी बकबक केली राज ठाकरेंनी ती अजूनही डोक्यातून जात नाही .काय तर म्हणे,,,

"एनडीए चे सरकार होते तेव्हा काय केल सेनेने"?
एक तर स्वतः तुम्ही त्यावेळी सेनेत होता ,,,
एनडीए च सरकार म्हणजे १३ पक्षाचं कडबोळ होत हे तुम्ही जाणता?
एकट्या सेना-भाजपाचा एकछत्री कारभार नव्हता..
आणि त्यांनी काही केल नाही तर आज तुमच्या मागे महाराष्ट्रतील  तमाम तरुण आणि मराठी प्रेमी वर्ग आहे तुम्ही करा काही तुम्हाला कुणी अडवलय ? हो पण

त्यासाठी कधी जमलंच तर गुजरातला जाण्यापेक्षा बेळगावात या जरा तुमच्या अलिशान गाडीच्या काचा खाली करा ,जरा पाय उतार व्हा ,त्या राहुल बाबा सारखी शोबाजी करा,
तुम्हला कळेल तिथल्या मराठी लोकांना किती कानडी येत ते,
तिथल्या मराठी माणसांनी कानडीचा आदर केला पाहिजे कानडी आल पाहिजे हे तुम्ही सांगायची गरज नाही मला तिथला एक मराठी माणूस दाखवा ज्याला कानडी येत नाही मी एका माणसा मागे १००० रु. द्यायला तयार आहे.
कुठल्याही कम-अस्सल कानड्या पेक्षा चांगल कानडी येत.हे कळेल,,

(लक्षात घ्या सगळ्या भाषा येतील पण कानडी येन कठीण पण सीमावासियांना ते जमत)
तेव्हा कानडी वरवंट्यावर आता तुमचा बोजा नको,,,,
अरे हो बोजा नाही का? काय म्हणालात,
"ईथे आम्हाला आमची धुनी धुता येत नाही आणखी २५ लाख लोकांचा या महाराष्ट्रावर बोजा  नको",,,
तुमच्या माहिती साठी सांगतो राज ठाकरे
हा बोजा तुमच्या महाराष्ट्राला महसूल मिळवून देणारा आहे ,,,,
आज सिमाभागातला प्रत्येक मराठी माणूस हा यशस्वी उद्योगक आहे,,,
त्याचे तिथे ट्रकचे कारखाने आहेत ,,
मिरची मसाल्याचा व्यापार आहे.,,
तंबाखूचे उत्पादन आहे ,,,आणि बेळगाव ,,,?
नितांत सुंदर कधी जमल तर बघा ,,,
आणि तुम्हाला ते बोजा (भिकारी) वाटतात?
सिमाभागाच्या महसुलावर कर्नाटकच राज्य चालत हव तर माहिती काढा.कर्नाटक ची हीच खरी ग्यानबाची मेख आहे सीमाभाग महाराष्ट्राला न देण्यामागे हे प्रमुख कारण आहे ,,,,
आणि तुम्ही हा सारा महसूल केराच्या टोपलीत टाकायला तयार झालात ?अरे निदान सीमावासीयांच्या हिताचा निर्णय घेतला असता तर ,,तुमची मत २५लाखांनी वाढली असती

निदान हा तरी विचार करायचा ?
आणि म्हणे चालले महाराष्ट्राचे नवनिर्माण करायला?
आणखी काय,,

तरुण पिढीला काय वाटत सीमाभागातल्या ,,,?
मग खरच या राज ठाकरे बेळगावात त्यासाठी खरच याव लागेल,,,
"रहेंगे तो जेल मी नाही तो महारष्ट्र में"

हि त्या तिसऱ्या पिढीचीहि घोषणा आहे...
गेली ५६ वर्षे हा लढा देत होते त्यांचे आई बाप आज ते रस्त्यावर उतरले आहेत,,
त्यातले काही खपले काही जिवंत आहे महाराष्ट्रात येणे हि त्यांची मागणी नाही तर निर्धार आहे,,,
आणि त्यासाठी कुणी कुणी काय काय शपथ घेतल्या आहेत
ते ऐकल तर त्यातली तीव्रता कळेल,,,
कुणी आजन्म लग्नच करणार नाही,,कुणी चप्पल घालणार नाही,,
कुणी टक्कल कायम ठेवणार ,, कोण एकच वेळ जेवणार किती आणि काय काय सांगू त्यांच्या त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञा,,?
आणि तुम्ही त्यांना येथे किती खड्डे आणि कसे भारनियमन आहे ते सांगता ?
तुमचे हे सारे विचार पाहिल्यावर आम्हाला असे वाटू लागले आहे
"झक मारली आणि तुम्हाला नेता मानले ",,,,
सीमावासियांना महाराष्ट्र नाकारणारे तुम्ही कोण ?
हा महाराष्ट्र तुम्हाला कुणी आंदण दिला?
वाटल होत मनसे स्टाईल तुम्ही या आंदोलनाला पाठींबा द्याल ,,
वाटल होत पुन्हा एकदा "महाराष्ट्र हटाव लुंगीच नारा घुमेल,,,"
पण महाराष्ट्राला तुमच्या सारख फुटक्या नशिबाच नेतृत्व मिळाल यासारख दुसर दुर्दैव नाही,,,

4 comments:

  1. Sagar Bhunje
    माझे या बाबतीतले ज्ञान कमीच आहे
    पण मला एक प्रश्न पडतो..
    गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून महाराष्ट्रातच आहे ना?
    त्या जिल्ह्याचे तरी काय केले आहे आपल्या सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी?
    बेळगाव ची तुलना गडचिरोली शी होऊ शकणार नाही ...असे काही दिवटे म्हणतील.
    पण बेळगाव काही पाकीस्तान किंवा चीन मधे जात नाहीये ना?
    आमचा जिल्हा अर्ध्या च्या वर कन्नड बोलतो. अक्कलकोटला गेलो तर
    कर्नाटकमधे असल्यासारखेच वाटते.
    काय फरक पडतो नेमका बेळगाव महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात राहिल्याने किंवा न राहिल्याने??See More
    7 hours ago · Like

    ReplyDelete
  2. Sanket Kulkarni काय मुस्काडात दिली Bhumkar saheb!

    ReplyDelete
  3. Sunil Bhumkar सागर खरच तू स्वतः कबूल केली प्रमणे तुझे ज्ञान यातील ज्ञान कमीच आहे .बाकी हा नियम गाड्चीरोलीलाही लागू पडतो बाकी बेळगाव पाकिस्तांत असते तर नक्कीच तुम्हा सर्वंच राष्ट्र प्रेम जागृत झाले असते. मग ते कितीही मजेत असते तरीही...
    3 minutes ago · Like

    ReplyDelete
  4. नित्यानंद भद्र amchi akkhi 3 pidhi gelyat seemabhagat ashanna samajavanyaamdeh Sunil Bhumkar

    ReplyDelete