Tuesday, December 27, 2011

व्यथा आणि डागण्या

||श्री नथू रामाय नमः|| 
मी जरी सीमावासीय नसलो, तरी मी सीमालढ्याची दाहकता अनुभवलेली आहे.
ज्या उत्सुकतेने आणि प्रेमाने सीमाभागातील जनता महाराष्ट्रात जाण्याची वात पाहत आहे,
त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.आजतोगायत हि संख्या पिढ्यानुपिढ्या .
पाकव्याप्त काश्मीरचे लोक भारताला विसरले, पण सीमाभागातील लोक महाराष्ट्राला विसरले नाही,,,,
भारतातील प्रत्येक प्रश्नासारखे जरी या प्रश्नातही अमाप राजकारण होत असेल , तरी महाराष्ट्राशी एक होण्याच्या भावनेमध्ये यत्किंचित हि फरक पडलेले नाही.,,,
तेवढेच दुख होते, कि आपल्या मातृभूमीची वाट उत्सुकतेने पाहत असलेल्या या सीमावासीयांच्या गावाची नावे सामान्य मराठी माणसाला परकी वाटायला लागलेली आहेत.,,,
संयुक्त महाराष्ट्राची पहिली घोषणा बेळगावमध्ये झाली आणि दुर्दैवाने,,,,"मुंबई, बेळगाव, कारवर, निपाणी,बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालेच पाहिजे"
हि घोषणा मुंबई वगळता आजही द्यावी लागत आहे,,,,
आणि ती अरण्यरुदनाप्रमाणे वाटायला लागलेली आहे.
हुतात्मा दिन आणि काळा दिन आजही बेळगाव त्याच उत्साहाने साजरा करत आहे/दुखवटा घालत आहे,,,,,
पण याच वेळी राष्ट्राच्या सर्वात प्रगत राज्य म्हणून मिरवत जात असलेले महाराष्ट्र,,,?
आपले लहान-सहान दुखणे घेऊन रुसत बसलेला आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, नक्षलवाद आहे,
मग कुठे वेळ आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बेळगावकडे बघण्याची?
उरल्या सुरल्या वेळेत जरी घातले जाते, ते आपली अनेक अमाप स्वार्थाची गणिते सांभाळून.
आज महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावची समस्या जरी छोटी वाटत असली तरी ती बेळगावसाठी एक संकट आहे.
सेमाभागातील वनवास काढत असलेल्या मराठी जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र आहे,फक्त महाराष्ट्र,,,
त्यांच्या हक्काचे महाराष्ट्र.
सीमाप्रश्न सुटेपर्यंत अंबानी राहणाऱ्या 60 वर्षाच्या मधु कणबर्गी पासून मराठी माणूस म्हणून पदोपदी तिटकारा
झेलणाऱ्या तरुणाला हे महाराष्ट्र हवे आहे,,,,
भाऊ आणि बापाची पिळवणूक निमुटपणे पाहणाऱ्या मुलीला महाराष्ट्र हवे आह,,,
आणि कानडी विलख्यात बोगारवेसमध्ये खेट्लेल्या धर्मवीरांना हि महाराष्ट्र हवे आहे,,,,
आपल्या राहत्या घरी शेजार्याने अतिक्रमण करण्याचे दंश आज बेळगाव सोसत आहे,,,,
पण आईच्या प्रेमाची अमाप ओढ असलेल्या आणि तरी बापाने वाळीत टाकलेल्या मुलागत आज बेळगावची अवस्था आहे,,,,
बेळगाव उपेक्षिताचे जीवन जगात आहे.
आज सीमाभागाला महाराष्ट्रात त्यांचे हक्काने स्वागत करणारी जनता हवी आहे.
त्यांना पाहुणचार नको आहे, कुठे मोठी राजनैतिक प्रतिनिधित्व हि नको आहे,(राज ठाकरे हे तुमच्यासाठी)
महाराष्ट्र सरकारचे अनुदान हि नको आहेत,,,,
महाराष्ट्रात मराठी म्हणून राहायला भेटले तरी ते पुरेसे आहे.
मात्र जगभरच्या आर्थिक उलाढालींना चालना देणाऱ्या मुंबई असलेल्या आणि त्यासाठी रक्त सांडलेल्या बेळगावला
कुणीतरी ओझे म्हणून टीट्टकारल्याची बातमी आली.,,,,
तेव्ह्या त्याला परप्रांतात महाराष्ट्र राज्याची अस्मिता रक्ताच्या ओंझराने सांभाळणाऱ्या येळ्ळूरची जनता तरी आठवायला हवी होती.
काय चुकले हो या सीमावासीयांचे?????????
एक टीचभर भूमी महाराष्ट्रातला घाला म्हणून मागली केली होती.
या महाराष्ट्र सरकारने उत्तर भारतीयांना सांभाळले,,,,,
एवढेच काय देशाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या कलमाडीसारख्याला सांभाळले,,,,,
देशाच्या पाहुण्यांचे आणि सैनिकांची बळी घेणाऱ्या कासाबला पंच पक्वाने चारलीत,,,,
सीमावासीय यांना जड झाले??????
गडचिरोली महत्वाची आहे, पण तिथेही सैनिकांचे रक्त पडतच आहे आणि इथे????
सीमावासीयही अस्तित्वाचा लढा तीव्रपणे देताच आहेत.
जगातील कोणतेही सरकार आणि पक्ष त्यांच्या बाजूने नसतांना
मातृभूमीने ही जेमतेम नजर फेरली असतांना आजही पुढच्या दहा पिढ्या लढायला तयार आहेत.
साहेब, हे बेळगाव आहे आणि इथे आम्ही मुंबईसारखे वास्तववादी विचार करत नाहीत
आम्ही प्रत्येक प्रकारची लाच कर्नाटक सरकारकडून नाकारली आहे.
कर्नाटकाची दुसरी राजधानी होण्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राचा ३३वा जिल्हा होणे श्रेयस्कर आहे.
कारण तिथे स्वातंत्र्य आहे. मित्रांनो,
या शेवटच्या तीन ओळींमध्ये ही आम्ही लिहायला नको होते,
कारण मी बेळगावचा नाही, पण थोड्या वेळेसाठी मी लिहिले ते आणि नंतर खोडले नाही 
सीमावासीयांचे महाराष्ट्राबद्दल प्रेम आणि कळकळ कोणत्याही पाव पानाच्या बातमीत मांडता येणार नाही.
ते अनुभवण्यासाठी आपण कधीतरी दिवाळी साजरे करणे आवर्जून टाळावे
आणि काळ्या दिनाच्या फेरीचे  मूकदर्शक  म्हणून उभे राहावे.
राहत्या घरी कुचंबना आणि माहेरी फसवणूक झेलणाऱ्या अबोध नववधूसारखे बेळगाव
आज प्रत्येक मराठी माणसाच्या दिशेने आशेने पाहत आहे.
"कधी इथे या आणि आमचे जीवन अनुभवा.
आम्हाला महाराष्ट्रात जायचे हो. अजून किती टाहो फोडून सांगायचे?
आम्ही काय असे मोठी गोष्ट मागितली?
आम्हाला तुमचे भाषावार प्रांत रचनेचे  कायदे माहित नाही
आणि भाषिक अल्पसंख्यांक बहुसंख्यांक ची तुमची गणिते ही माहित नाहीत.
उच्चतम न्यायालय काय करून आमच्या २५ लाख जनतेचे निकाल लागणार आहे काय माहिती?
त्यांच्याकडे फक्त  चारच  निकष आहेत राज्यामध्ये सामील करण्याचे.
आमच्या मनात आम्ही जो  महाराष्ट्राची  प्रतिमा तयार केलेली आहे,
तिला किवा आमच्या हुतात्म्यांना सांडलेल्या आणि न मापलेल्या रक्ताला ते काही किंमत देऊ शकत नाहीत."
"तुम्ही मुंबई-पुण्यात राहता आणि म्हणता, का हो तुम्हाला महाराष्ट्रात यायचे आहे?
इथे पाणी नाही वीज नाही नोकऱ्या नाहीत.अहो,
आम्हाला पाणी आणि वीज नको आहे.
पण आमच्या अस्तित्वाची हत्या आम्ही रोज झेलू शकत नाही.
"अहो, बस झाले" एवढे म्हणून ही खूप काळ उलटला हो. आता सहन होत नाही."
.....................या व्यथा किंवा वेदना सांगायला जी काही साधने असतील नसतील ती सर्व अपुरेच पडतील.
तेव्हा तुम्ही कधीतरी एकदा ही लढाई बघा आणि ठरवा, यांचा हक्क आहे ना महाराष्ट्रावर?...............
खूप कळकळीची विनंती आहे माझ्या हातून बोलताना काही चूका झाल्या असतील तर माफ करू नका
पण खरच सिम्वासियांच्या दुखःवर डागण्या देवू नका.

No comments:

Post a Comment