Sunday, May 20, 2012

बदतमिझ बादशाही क्रिकेट आणि समाज सुधारक,,,?

||श्री नथू रामाय नमः||
काय तर म्हणे सभ्य लोकांचा खेळ,,?
अरे आम्ही ईतके निलाजरे कसे झालो ?
ज्या लोकांनी आपल्या देशाला गुलामीतून सोडवण्यासाठी रक्ताच पाणी केल त्यांना विसरतो तरी कसे ?
ज्या लोकांनी ईथे आमच्यावर १५० वर्षे राज्य केले ज्यांनी
आम्हाला गुलाम केले त्यांना त्यांच्या खेळला सभ्य
म्हणताना आमची जीभ झडत कशी नाही?
ह्या देशासाठी कित्येकजण फाशी गेले ,,
लाखो लोक परागंदा झाले,
आणि हे कमी कि काय म्हणून जाता जाता त्यांनी
ह्या देशाचे दोन तुकडे केले,,
हा सारा सभ्यपणा काय?
आणि हा सारा सभ्यपणा नसेल तर ईंग्रज आणि त्यांचा
खेळ हा सभ्य माणसांचा खेळ कसा?
जो खेळ ईथल्या माणसाला पैश्याच्या धुंदीत उर्मट वागायला प्रवृत्त करतो तो खेळ सभ्य लोकांचा खेळ कसा ?
आणि त्यातही शहारूक खान सभ्य?
ज्याच्या उर्मटपणाचे किस्से जगजाहीर आहेत ,,
जो एका कर्तव्य दक्ष सुरक्षा रक्षकाला अत्यंत उर्मटपणे बोलतो
"तुम मुझसे ऐसे बात नाही कर सकते माय नेम ईज खान?
(म्हणजे बाकीचे सारे कस्पटा समान,,,?)
त्यामुळे आता शहारूक वर आता ५ वर्षाची बंदी आली आहे
पण यात एक बदल असा करावासा वाटतो कि
शहारूक वर ५ वर्षे बंदी जरूर घाला पण,
त्याच बरोबर आता देशातही किमान ५ वर्षे क्रिकेट बंदी करावी,
आणि मग मंडल आयोगाची जशी गेल्या
५० वर्षात मुदत वाढवली गेली तसेच ह्या क्रिकेट बंदीचा हि विचार करावा,
तर आणि तरच हा देश सुधरेल असे वाटू लागले आहे,
खरतर आयपियल मध्ये नवोदित लोकांना खेळायला मिळेल,
आणि त्या निमित्ताने त्यांना आपली गुणवत्ता दाखवता येईल ,
निवड समितीला आपल पाणी दाखवता येईल,
त्यामुळे मग त्यांना आधी वन-डे ,मग कसोटी मध्ये संधी असा ह्या
आयपियलचा उद्देश होता ,,
पण प्रत्यक्षात ह्या खेळाडूंना मिळणारी रक्कमच कळीचा मुद्दा ठरली,
आणि भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू ठरली,
आयपियलच्या निमित्ताने जो क्रिकेटचा नंगा-नाच देशात चालू आहे,
तो पहिला कि आणि त्याला समर्थन देणारे लोक पहिले
कि वाटत देश गुलाम होता तेच बरे होते
त्यावेळी निदान आपल्याला आपल्या गुलामीची निदान लाज तरी वाटत होती,
राजकार्नापेक्षाही जिथे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने पैशाची
उलाढाल चालते ते पाहिल्यावर सचिन सारखे लोकही निलाजरे का
होतात ते समजते,,आयपियलचा सामना खेळायला मिळण म्हणजे काय हव तर सचिनला विचारा,,त्याच १०० व शतक झाल्यावर पत्रकारांनी विचारलं आता निवृत्त
होणार का? तर महाशय म्हणाले ,
"मी आता निवृत्ती घेतली तर लोक मला स्वार्थी म्हणतील,,"
पण खरी ग्यानबाची मेख होती आयपियलची संधी हातून घालवायची नव्हती,,
त्यातून मिळणारा रग्गड पैसा "निवृत्ती म्हणजे पाप"
असच सांगत होते म्हणून तर,
"द्रविडच्या
निवृत्ती जाहीर कार्यक्रमाला तो हजर राहिला नाही",
का कबुल करत नाही आधी आयपियाल खेळतो रग्गड पैसा कमावतो,,,हे म्हणजे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक सारख झाल,,,
शहारूकच वर्तन ,सचिनची चालूगिरी,आणि तिकडे
जया बच्चन च रेखाच्या विरुध्द कोत्या मनोवृत्तीच वर्तन पाहिल्यावर
आणि आमीर सारखे लोक समाजावर कोरडे ओढताना
अधिकार वाणीने बोलू लागले आहेत
त्यामुळे अस वाटू लागल आहे कि ,लोकांनी आता
"क्रिकेटर्स मध्ये देव आणि आणि हिरो मध्ये समाज सुधारक
पाहण्याचे सोडून द्यावे"
तेव्हा ईश्वराच अस्तित्व मानणाऱ्या लोकांनो ,
देवाने चार युग दिली आहेत मानवाला त्या पैकी एक
आता शेवटच कलियुग चालू आहे,
जंटलमन्स क्रिकेटवर भक्ती असणार्यांनी आणि क्रिकेटर्सना देव मानन्यार्यांनी
आयपियल हा कलियुगी करिष्मा आहे हे लक्षात घेवून वर्तन करावे हे उत्तम,,,,,
जाता जाता काही प्रश्न,,
क्रिकेट हा खेळ नसून मनोरंजन आहे का?
क्रिकेट पाहण आपल्या भावनांशी खेळ आहे का?
हा खेळ आहे कि भ्रष्टाचाराची जननी आहे?
मग तुम्हाला नक्की काय हव ?
उर्मट लोक,कि खेळ?
चीयर लीडर हव्यात कि खेळ?
क्रिकेटर्सना विकत घेणारे हवेत कि मन लावून खेळणारे खेळाडू?
खरच मग क्रिकेटने शांतता नांदते?
दोन देशांचे संबंध सुधारता?
त्यातही भारत पाकिस्तानचे?
आणि तस असेल आधी सीमेवरचे सैनिक हटवावेत
का उगाच देशाच्या संरक्षणावर खर्च करावा ?
आणि ह्या सार्या प्रश्नानाची उत्तर हो असतील तर ह्या देशाच काही खर नाही,,आणि उत्तर नाही असेल तर,,
या देशात क्रिकेटला खतपाणी घालणे या सारख दुसर पाप नाही,,,,





3 comments:

  1. Mahesh Kulkarni mast
    May 21 at 12:32am · Unlike · 1

    ReplyDelete
  2. Aditya Borde khup chhan
    May 21 at 11:06am · Like

    ReplyDelete
  3. Aditya Dixit agdi barobar bolalat aapn sunil sir. cricket ha khel, ata khel rahila nasun tyacha tamasha zala ahe, jugaracha adda banala ahe. ajchi bhawi tarun pidhi hyamage bharkatate he aplya deshache durdaiw ch mhnaw lagel. politisions cha black money white karnyasathi tyani IPL, lawasa ase suru kele. je aapn chwine pahto. aplya bhartiyanchi mansiktach khalawleli ahe hech khar...
    8 hours ago · Unlike · 1

    ReplyDelete