Thursday, November 29, 2012

केवळ सीमा प्रश्न साठी चाळीस वर्षे अनवाणी


बेळ्गाव दि २५ ओक्टोबर सगळीकडे दिवाळी सुरु आहे मात्र बेळ्गाव मधील एक सीमावासीय आज आपला वाढ दिवस असतानाही उपोषणाला बसला आहे कारण गेल्या ४६ वर्षा पासून बेळ्गाव सह संपूर्ण  सीमा भाग महाराष्ट्रात  विलीन व्हावा या साठी पायात चप्पल न घालता  प्रवास करताहेत तरीही  त्यांच्या आणि सीमा बांधवांच्या प्रयत्नांना आज पर्यंत यश आलेले नाही आहे म्हणून आत्म क्लेश करत आज वाढ दिवसाच्या दिवशी  आणि दिवाळीचा उजाळा सोडून आणि वाढ दिवसाच्या आनंदाला विरझान घालून हुतात्मा  स्मारका समोर  उपोषणाला बसला आहे 
 मधु कणबर्गी त्याचं वय आहे  ६१ वर्ष गेल्या ४६ वर्षा पासून पायात चप्पल न घालता भटकतोय .. जो पर्यंत बेळ्गाव सह संपूर्ण  सीमा भाग महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत आपण पायात चप्पल न घालण्याचा "पण" त्याने केलाय  त्यामुळे उन वारा पावसाची तमा न बाळगता तो अनवाणी पाय पीठ करतोय . 
आज एकीकडे  त्याचा वाढ दिवस अनेक  एकीकरण समितीच्या नेत्याने त्याने तो साजरा न करण्याचे  आवाहन केलेच  आणि दुसरी कडे  त्यातच दिवाळीचा उत्साह अस असतानाही त्याने कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आणि कर्नाटक सरकारच्या  दडपशाही धोरणांच्या विरोधात आज  हिंडलगा येथील हुतात्मास्मारका समोर उपोषण करत आत्म क्लेश सुरु केलाय .
अण्णा नी कित्येक आंदोलने आपल्या डोळ्याने केवळ बघितलीच नाहीत तर पोलीसांच्या लाठ्या देखील खाल्या आहेत .
इंदिरा गांधी , राजीव गांधी सारख्या  लोकांच्या  बेळगावातील सभा त्यांनी उधळून लावल्या आहेत 
blog  शी बोलताना  मधु कणबर्गी नी सांगितले की आज योग योगाने माझा  वाढदिवस एकसष्ठी आंणी दिवाळी असा सण एकाच दिवशी आलाय .केंद्र महाराष्ट्र आणि सीमा भागातील नेत्यांचे दिवाळीचे  दिवे पेटत आहेत मात्र माझी सारख्या कित्येक  सीमा वासीय आंदोलकांचे  दिवे  अंधकार मय झालेत याचा या  नेत्यांना काही एक शाली नाही आहे माझा बेळ्गाव महाराष्ट्रात सामील व्हान  या साठी एक शाली म्हणून मी उपोषण करत आहेत , विष्णू पाटील सारखे माझे साथी अंगवार कपडे न घालता  मरून गेले माझी आज ४० वर्षे पायात चप्पल ना घालता मरण्याची वेळ आली असली तरी आमचा प्रश्न अजून सुटलेला नाही . बेळ्गाव मधील सगळे  सीमा वासीय  एकीकरण समिती; नेते स्वार्थाने  पछाडलेले आहेत आता झालेली  दुही दूर व्हावी आणि   एकीकरण समिती मध्ये एकोपा व्हावा आशी  माझी तीव्र  इच्छा  आहे . पाय्यात चप्पल ना घालण्याच्या निर्णयाने मधु अण्णांना सीमा तपस्वी म्हणतात मधु कणबर्गी प्रमाणे बेळ्गाव मधील अनेक जणांनी मधु सारखाच वेगवेगळ्या प्रकारे पण करून हा सीमा लढा जिवंत सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मृत्यू आला तरीही हा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे  सीमा वासीय तून नाराजी व्यक्त होत आहे .बेळ्गाव सीमा लढ्यात बेळगावातील मराठी माणसाच्या दोन पिढ्या संपल्या असून आज तिसरी पिढी लढत आहे मात्र गेल्या ४६ वर्ष पासून बेळ्गाव प्रश सुटे पर्यंत अनवाणी पायांनी फिरण्याची भीष्म प्रतिज्ञा घेणाऱ्या मधु कणबर्गी चा हा आत्म क्लेश पाहून आता तरी कर्नाटक , केंद्र  आणि महाराष्ट्र सरकारला जाग येते का हा महत्वाचा प्रश्न आहे

No comments:

Post a Comment