Wednesday, December 5, 2012

we can but we dont,,,,अर्थात दचकलो आणि रागावलो

||श्री नथुरामाय नमः।।
साधारण १६ वर्षापूर्वी मी मद्रासला गेलो होतो आधी तिरूपाती करून
मला त्यावेळी मुलगा झाला होता आणि त्याचा नवस म्हणून तिरुपती आणि मग मद्रास करत
फिरत होतो तिरुपतीत तर मी दोन दिवसात पळालो कारण
एक तर मी आणि माझ्या बायकोने टक्कल केले होते त्यामुळे दोघाही
माद्रसीच दिसत होतो त्यामुळे आणि तेथील लोकांना हिंदीची शिसारी असल्यामुळे
ते तसेही हिंदी बोलत नसत आणि माझी पंचाईत होत होती
मग फिरत फिरत आम्ही मद्रासला पोहोचलो
आता मोठी परीक्षा होती आणि त्यात मला चंगला धडा मिळाला
एके ठिकाणी मी जरा सुशिक्षित माणस पाहून पत्ता विचारला
अर्थतच हिंदीत आणि समोरच्याने अर्थातच मला त्याच्या भाषेत सांगितला,
मी म्हणालो कि बाबा हिंदीत सांग न तुला हिंदी समजते ना?
त्यावर तो वरील वाक्य बोलाला we can but we dont,,,,,,,,,,,,
मला त्यावेळी राग तर भरपूर आला होता पण हि
अस्मिता आमच्यात का नाही असा प्रश्न पडला होता ?
आणि स्वतःच्या कपाळ करंटे पणाला शिव्या देत गप्प बसलो होतो,,,
आणि काळ दोन दिवसांनी माझ्या मुलीकडे जाण्यास निघालो
आधी बदलापूर मग उल्हासनगर असा प्रवास होता
त्यासाठी खोपोलीला जाणारी गाडी पकडली,,
आणि मागे बसलेल कुटुंब आणि त्यांच्या दोन मैत्रिणी यांचा संवाद कानात शीस ओतून गेला
त्यातली एक बी मोठ्या प्रौढीन बोलत होती,
"माझी मुल एकमेकांशी ईंग्लीश मध्येच बोलतात
काय करणार ईंग्लीश मिडीयम आणि त्यातून कोंव्हेंट ना मग तेच बर पडत"
दचकून खरतर राग अनावर होवून मी मागे वळून पाहिलं
आणि मनोमन त्या मद्रासी लोकांचा आपल्या भाषेविषयीचा अभिमान
मला सुखावून गेला त्याचं कौतुक कराव तितक कमीच,
आणि त्या बाईला रागवाव कि त्यांची कीव करावी कि काय अस वाटू लागल
स्वतःच्या मातृ भाषेची ईतकी अवहेलना ?आणि कुणासाठी?
पण माझा दिवस पण मला हरवायला च बसला होता
तो असा मला सोडणार नव्हता
संध्यकाळी मी उल्हास नगरला आलो राहिलो आणि सकाळी पुन्हा
मुंबईस निघालो सकाळीच गाडीत बसलो
रविवार होता सुट्टीचा दिवस ,,,,
माझ्या समोर कल्याणला दोन मैत्रिणी आणि एकीचा नवरा तिचा
मुलगा चढले ,,,
मी आपला वृत्तपत्र वाचण्यात दंग होतो
त्यांच्या गप्पा चालू होत्या ,,
आणि त्या जोडप्याच्या मैत्रिणीने विचारले मग
"आज काय विशेष बेत असेल तुझ्या आई कडे?"
दुसरी म्हणाली मी तर आज आईला सोडणार नाही मस्त शॉपिंग करणार
मात्र त्या लहान मुलाने नेमका प्रश्न विचारला
आई "विशेष "म्हणजे काय ग?
मग त्याच्या बापाने त्याला सांगितले अरे विशेष म्हणजे काही खास वेगळा
जस आज तुझ्या आईचा वाढदिवस आहे ना?
मुलगा --"अच्छा म्हणजे विशेष म्हणजे स्पेशल डे बरोबर,,?
आणि ईकडे आई मात्र काय हा बावळट  माझ्या मुलाला मराठी सांगून बिघडवतो आहे असा भाव होता .
आणि बाप बेट्याची गप्पा सुरु झाल्या बाप अर्थातच त्याचा बाप त्याला बराच जसा जमेल तस
मराठी शिकवत होता
पण ती मड्डम मात्र रागावली होती उसळून
काय चालवलंय तुम्ही कसलं ते "अननोन मराठी" शिकवताय ?
आणि मी पुन्हा दचकलो खर तर रागावलो पण कुणावर?


5 comments:

  1. मराठी भाषेचे दुर्दैव तिच्या पोटी असले लोक जन्माला येतात :(

    ReplyDelete
  2. काळ सोकावत आहे आपण सोकाऊ देत आहोत उद्या आरसा सुद्धा आपली ओळख देणार नाही आपणास

    ReplyDelete
  3. वास्तव आहे हे.. :-(

    ReplyDelete
  4. तुम्ही लिहिले ते अगदी खरे आहे. हल्ली लोकांना आपली भाषा आपल्या मुलांना येत नाही याची काहीही लाज / खंत वाटत नाही. इंग्रजीची गरज आहेच पण आपली रक्ताची भाषा, मनाची भाषा यायलाच हवी. अन्यथा तुमच्या जगण्यालाच गुलामगिरीचा वास येईल.

    ReplyDelete
  5. वाचून मन सुन्न झाल...म्हणतात न कुर्हाडीचा दांडा गोत्रास काळ...

    ReplyDelete