Tuesday, December 11, 2012

होय शिवतीर्थच,,,

होय शिवतीर्थच,,,
स्मारकाचा वाद मिटला नाही तर आता शिवतीर्थाचा वाद निर्माण केला जातोय,
खरतर गेली ५० वर्षे हिंदुहृदय सम्राट शिवाजीपार्कला शिव्तीर्थ्च
संबोधत आले आहेत आम्ही सारे शिवसैनिक हि त्या जागेला शिवतीर्थच म्हणत आलो आहोत,
आज मोठा साळसूदपणाचा आव आणून एकदा नाव बदलल कि पुन्हा
बदलता येत नाही अस म्हणत शिवाजीपार्क हे ईंग्रजांनी बदलेल नाव म्हणे आता बदलता येत नाही ,,,?
महाराष्ट्राच्या मराठी मानसाला खिजवण्यासाठी इंग्रजांनी शिवरायांचे
नाव एकरी शब्दात"शिवाजी"ठेवले व आपले हुकुमत कायमची ठेवण्यासाठी"पार्क"हा शब्द इंग्रजीत जोडले.
शिवाजी पार्क हा शब्द पुसुन काढण्यासाठीच शिवसेना प्रमुखांनी सभा
घेऊन"शिवतिर्थाचा"उच्चार करीत राहीले. शिवसेनी प्रमुखांच्या भाषणाची सुरुवातही"
शिवतिर्थावर जमलेल्या तमाम शिवसैनिक बंधु,भगीनी आणि मातांनो"असेच
होत आले आहे. शिवसैनिकांच्या ध्यानी मनी शिवसेना प्रमुखांनी"शिवाजी पार्क"पुसुन
आदरनीय शिवरायांचे"शिवतिर्थ"नांव कोरले आहे. म्हणुन दसराच्या मेळाव्याला"शिवसेना प्रमुखांच्या भाषणात विचार
ऐकण्यासाठी,, चला"शिवतिर्थावर"अशीच घोषणा होत आली आहे.
१९ जून १९६६ रोजी स्थपना आणि ३० ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा,,
कोण जमणार ,,?प्रश्न तर मोठा होता ?
पण ते बाळासाहेब होते
आणि तीच आजही मराठी जनता आहे
जीने आपल्या "ठाकरे कुटुंबाचा हा बाळ आज पासून महाराष्ट्राला अर्पण केला
आहे "हि घोषणा कानात साठवून आहे,
मार्मिक मध्ये सीमा प्रश्नावर जळजळीत लेख लिहिला
यशवंतराव आणि मोरार्जीची गाडी अडवायचा प्रयत्न केला
मोठ्ठी दंगल उसळी मुंबईत ५०\६० माणस मृत्युमुखी पडली,
आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक करण्यात आली
आणि मुंबई बंद पडली,,,,,,
मग आल भूमिपुत्रच आंदोलन,
हटाव लुंगी ,,,
बाबरी पडल्याच समर्थन ,,
युतीच्या आमदारांचा शपथविधी,,
अशा अनेक घटनांच साक्षीदार आहे ते शिवतीर्थ ,,,
अनेको चेहरा नसलेल्या लोकांना साहेबांच्या आशीर्वादाने चेहरा मिळाला
याच शिवतीरथावर,,
आई भवानी माता आणि शिवरायांच्याच आशिर्वादाने पवित्र भगवा ध्वज
फडकवत राहाण्याचे भाग्य  शिवसेनेला शिवसेना प्रमुखांच्या क्रुपेने लाभला म्हणुन महाराष्ट्रात
मराठी अस्मिता जिवंत आहे. साहेब गेल्यापासून बऱ्याच पोटावल्यांनी मगरीचे खोटे अश्रू ढाळत
एक पर्व संपले अस म्हणत मानभावी पणाचा आव आणला पण
लक्षात ठेवा पर्व संपले ?
अरे साहेबांनी आमचा गर्व वाढवला "गर्व से कहो ,,,हि ऐतिहासिक
घोषणा ईथे याच शिवतीर्थावर साहेबांनी दिली
आणि भलेभले सपाट झाले ,
"मी म्हातारा झालो तरी माझे विचार म्हात्रे झाले नाहीत "
हे याच शिवतीर्थावर साहेबांनी ठणकावून सांगितलं होत,,
आणि आता तर शिवाजी पार्क खऱ्या अर्थाने आम्हा शिवसैनिकांसाठी
ते शिवतीर्थच झाल आहे कारण ईथेच या शिवतीर्थावर त्याचं दहन झाल आहे
आता ते आम्ही मिळवणारच कारण
आम्हा संगे लढण्या सांगा व्याली मे कुणाची ?
अरे पहा चालुनी पाने पाने आमच्या ईतिहासाची ..
कारण ईथेच साहेबांनी शमीच्या झाडावरची शस्त्र परजून दरवर्षी
आमच्या हातात दिली आहेत.हे लक्षात ठेवा .
कार्यकर्त्यांना कवचकुंडल आणि आपला श्वास आणि ध्यास मानणारे
साहेब गेल्या नंतर कुणी तरी एक एसेमेस केला होता,,,
"२०१२ ला जग संपणार अस लोक का म्हणत होते ते मला आज समजल"
म्हणू साऱ्या आजी माजी सैनिकांनी आणि समस्त
मराठी जनतेला आवाहन आहे २०१२ नंतरच्या जगात जगायचे असेल
तर शिवतीर्थ,शिवतीर्थ,केवळ शिवतीर्थच,
जय हिंद जय महाराष्ट्र. 

8 comments:

  1. मराठ मोळा सचिन औरंगाबाद
    अहमद नगर
    ईस्लामपुर
    ईब्राहिम मोहल्ला
    मोहम्मद मोहल्ला

    हि नावे चालतात....
    मग "शिवतिर्थ" का नाही....?

    शिव सकाळ
    शिव दुपार
    शिव संध्याकाळ
    शिव रात्री
    हे म्हटलेलं चालतं....
    मग "शिवतिर्थ" का नाही.....?

    जय भवाणी
    जय शिवाजी
    या घोषणेला शिवरायांचं
    ऐकेरी नाव घेऊ नकोस
    म्हणुन विरोध करता...
    आणि
    स्वतः "शिवाजी पार्क"
    म्हणता
    तेंव्हा शिवरायांचा ऐकेरी उल्लेख नाही
    येत का......?

    ऐरवी मराठी मराठी करता
    मग "शिवाजी पार्क" हा इंग्रजी
    शब्दासाठी "शिवतिर्थ"
    या मराठी शब्दाविरुध्द लढता....?

    एवढी वर्षे शिवसेना प्रमुख
    "शिवतिर्थ" म्हणायचे तेँव्हा
    विरोध का नाही केलात....?

    मग आजच "शिव तिर्थ" या
    नावाला विरोध
    का......?

    ।। जय महाराष्ट्र ।।

    --- मराठ मोळा सचिन
    .
    .
    December 11 at 12:41pm via mobile · Unlike · 3

    ReplyDelete
  2. शिव-दुर्गप्रेमी वांद्रे सचिन विचार आवडले
    December 11 at 1:26pm · Like · 1

    ReplyDelete
  3. मराठ मोळा सचिन धन्यवाद...!

    जे खरं आहे ते मांडले...
    December 11 at 1:27pm via mobile · Like

    ReplyDelete
  4. Makarand Mahadik होय शिवतिर्थच योग्य आहे.....कारण ह्याच ठिकाणावरून माननिय शिवसेनाप्रमुख हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गेली ५० वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे तिर्थ मराठी जनतेला पाजून त्यांना देशाभिमानी बनविण्यात यश मिळविले....आणि म्हणूनच आज आपण देशात ताठ मानेने जगतो आहे. (जय हिंद ! जय महाराष्ट्र !!)
    December 11 at 1:32pm · Like · 1

    ReplyDelete
  5. Shripad S. Kulkarni balasahebanitake shivtirthache pavitrya koni japale nahi. maidane vikun building construction karnare aaj goshti kart ahet.
    December 12 at 8:18am · Like

    ReplyDelete
  6. कट्टर शिवसैनिक शिव-सकाळ ..!

    शिवसेना गीत...!

    आम्हीं शिवाचे सैनिक वेडे करू जिवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान।।
    अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। जात गोत अन् र्धम आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।धृ।।

    वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हांस खड्ग घउनि हाती भरली हिंदुत्वाची कास। लालकिल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास। बस पुरे आता ना होउनि देऊ माणुसकिची दैना जात गोत अन् र्धम आमुचा शिवसेना...शिवसेना...शिवसेना।।१।।

    धगधगता अग्नि चहूकडे अन् मार्ग निखार्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा।
    अरे हिशेब आम्हीं ठेवत नसतो अशा भेकडांचा वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा।
    अरे घडवून दावू आम्हीं जे कोणास कधी जमले ना जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना...शिवसेना...शिवसेना।।२।।

    कायापालट कोंकणचा ह्या आम्हीं करुनि दावू मराठवाण्या हिरवा शालू आम्हीं नेसवुनि दावू। अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी ....... धूळ चारुनि पुन्हा त्यांना सोने पिकवुनि दावू। विदर्भ आमुचि शान असे अन् मान असे हो आमुची कशी छाटुनि देऊ आम्हीं प्राण पणाला लावू।
    जळगाव आसे हो आमुचे जितके बेळगावही तितके एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ। अरे आठवा Bombayचे ह्या मुंबई आम्हींच हो केलेना जात गोत अन् र्धम आमुचा शिवसेना...शिवसेना...शिवसेना।।३।।

    साहेब, शपथ आहे आम्हाला आम्ही तुमचे स्वप्न पुन्हा एकदा खरे करून दाखवू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रच काय तर संपूर्ण हिंदुस्थानात आपला स्वाभिमानी हक्क असलेला "भगवा" अभिमानाने फडकऊ.

    "साहेब"...नुसती शपथच नायतर तुमच्या "पवित्र अस्थींची" स्मृती ठेवून सांगतो आहोत कि, येत्या निवडणुकीत आम्ही फक्त आणि फक्त "भगवाच" फडकऊ.

    जय भवानी...जय शिवराय...जय महाराष्ट्र...!

    --- कट्टर "शिवसैनिक".
    December 11 at 5:17pm · Like · 1
    Write a comment...

    ReplyDelete
  7. HEY MITRA, MI ABHAY ANGCHEKAR, KAKSH KARYALAY PRAMUKH, SHIVSENA GRAHAK SARANKSHAN KAKSH, BORIVALI VIDHANSABHA. MAZE WAY 51 PURN. MAZYA VICHARANCHI ARTHAT KADVAT ANI NISHTHAVANT SAINIK BHETALE KI MALA ATYANT ANAND HOTO. AAJ SURFING KARTAN TUZYA RAMPRAHAR.BLOGSPOT WAR BHETNYACHA YOG ALA. ANAND ZALA. MAZE FB ACCOUNT 'ABHAY ANGCHEKAR' NAVANE AHE. BHETU. JAY MAHARASHTRA.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच अभय साहे आपण भेटू मी नायगाव दादर येथे राहतो

      Delete