Tuesday, August 30, 2016

गणेश आगमन आणि ना हरकत प्रमाण पत्र

|| श्री गणेशाय नमः||

प्रती सर्वोच न्यायालय
मुख्य न्यायाधीश साहेब

विषय :- गणेश आगमन होणार आहे ते आगमन आणि विसर्जन निर्विघ्न व्हावं
कुठल्याही प्रकारची सरकारी आडकाठी होऊ नये या साठी ना हरकत प्रमाण पत्र मिळावे
त्यासाठी विंनती अर्ज ,
महोदय
सध्या सरकारच धोरण आहे
अंगावर आलं की न्यायालयावर टोलवायच आणि मग न्यायालय हि हस्तक्षेप करून निर्णय देत
त्यामुळे आता न्यायालयाला विचारूनच सण आणि इतर करावे लागणार आहेत
आणि काहीच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे
त्यामुळे ,,,,
माननीय सुप्रीम कोर्ट. सप्रेम नमस्कार पत्र लिहण्याचे कारण
गणपती दीड दिवस आणू कि 7 दिवस. 😡?
गणपती आणताना किती माणसं नेऊ,,,?
रोजच्या आरतीला किती जमाव असला पाहिजे,,,?
आरतीचा आवाज किती डेंसीबल
ठेवावा लागेल त्याची मर्यादा किती असावी,,?
गणपती घरी आणल्यावर आम्ही कपडे कुठले घालावेत,,?
प्रसाद कुठला द्यावा,,,?
कुठली आरती कम्पलसरी असेल?
विसर्जन नक्की कधी करायचं?
किती मिनिटात ते झालं पाहिजे?
विर्सजन वाजत गाजत गुलाल उधळत केलं तर चालेल का?
हो गुलाल कुठल्या रंगाचा असावा ते हि आधीच सांगा?
मिरवणूक अर्थातच मशिदीवरून नेण्यास परवानगी नसेलच पण
मी आपलं अजाणतेपणाने विचारलं
कारण मिरवणूक नेण्याचा मार्ग तुम्ही
ठरवला असेलच आपलं माहीत असलेलं बर म्हणून आगाऊ विचारत आहे
न्यायाधीश महोदय हे विचारलं अशासाठी कि सरकार उद्या येईलच
न्यायालयात श्री गणेश उत्सवासाठी आमच्या कडे तुमची
एनोसी असलेली बरी
बाकी आज काल तुंमच काम बरच वाढलं असेल ना??
काँग्रेस राज्य बर होत का हो??
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
गणेश भक्त

No comments:

Post a Comment