Tuesday, May 1, 2018

*आजी,हॉर्लीक्स,आणि सीमाप्रश्न*

|| श्री नथुरामाय नमः||

रोज सकाळी आजतक तेज 306 वर संजय सिन्हा रिश्तों की कहाणी सांगतो मी रोजच ऐकत असतो
आजची गोष्ट आहे *त्या आज्जीची जिला फक्त हवं असत आपलं माणूस* संजय सिन्हा सांगतात त्यांची आई शेजारच्या बाईला आई म्हणायची या नात्याने ती माझी आजी झाली, तर या आजीला दोन मुलं होती
त्यातल्या मोठ्या मुलावर तिचा खूप जीव सारख हवं नको बघत असे आमचे देखील लाड करतच असे
पण मोठ्या मुलावर विशेष जीव तिला कुणी तरी सांगितलं की मुलांना होर्लीक्स द्यावं ताकद येते ,, मग ते दुधातून पाण्यातून कधी असच त्याला भरवत असे
कालांतराने मुलं मोठी झाली आम्ही कामा निमित्त बाहेर पडलो तसा तिचा मोठा मुलगा नवीन त्याच नाव (नानु) देखील बाहेर पडला
मी अधून मधून गावाला जात असे पण नानु जो कामा निमित्त मुंबईला आला तो परत गावी गेलाच नाही
एकदा खूप आठवण आली म्हणून त्या आज्जीला भेटायला गेलो तर आज्जी आता खूप म्हातारी झाली होती बरीच आठवण करून देऊन सुद्धा तिला नीटस आठवेना मग माझ्या आईच नाव सांगितल्या बरोबर तिच्या आठवणी जाग्या झाल्या आणि रडत रडत ती बोलली *सोन्या मला घेऊन चल तुझ्या घरी इथे नाही करमत हवं तर बस रिक्षाचा खर्च मी करते पण घेऊन चल* मी हसत बोललो अग मी जवळ नाही लांब दिल्लीला राहतो आधी ट्रेनच तिकीट काढावं लागत,,
तशी रागावून नाराजीने म्हणाली तुला देखील न्यावस वाटत नाही ना? या म्हातारीला?* ते ऐकून काळजात चर्रर्र झालं मला काय ते लक्षात आलं पण लगेच दिल्लीला नेण  शक्य नव्हतं माझं ही काम निघालं तस अचानक मी ही निघालो पण मन मात्र आज्जीपाशीच अडकलं होत पण नाईलाज होता
दोन तीन महिन्यांनी थोडं स्थिर झाल्यावर पुन्हा आजीची चौकशी केली तर शेजारचे म्हणाले की तिचा मुलगा येऊन तिला घेऊन गेला,,, ते ऐकून माझ्या अपराधी मनाला थोडं बर वाटल चला काळजी मिटली, मी शेजारी सांगून ठेवलं की काही असलं तर कळवत जा, तिला नाही तरी तिच्या मुलांकडे जायचंच होतं
असेच वर्ष 6 महिने गेले असतील काय चालले असेल आजीचं गावी फोन केला तर कळल *आज्जी वारली* चौकशी केली त्यावेळी कळलं की मुलगा इथून घेऊन तर गेला पण *आज्जीला घरी नेलं नव्हतं तर तिची रवानगी वृद्धाश्रमात केली होती* कारण बायको तर तिला डोळयांसमोर धरत नव्हती आणि अशा गावंढळ बाईला सोसायटीत कस ठेवायचं?
मात्र या दरम्यान आणखी एक घटना घडली होती
*त्याच मुलाचा कुत्रा हरवला होता आणि वृत्तपत्रात त्याने ती मिसिंग तक्रार नोंदवली होती आणि नेमका त्याच वृद्धाश्रमातुन फोन गेला की तुम्ही टाकलेल्या फोटो तील कुत्रा आमच्या वृद्धाश्रमात आहे एका आज्जी बरोबर खेळतो तेव्हा तुमचा कुत्रा येऊन घेऊन जा*,,,,,,, पुढे काय घडलं असेल ते सांगत नाही समजून जा,,,,😔
*नेमकी ही आज्जी मला आज मला सिमाबांधवांच्या रुपात दिसतेय ह्या आज्जीची देखील खूप मोठी इच्छा नाही, देशाचे तुकडे करून मला स्वातंत्र्य द्या अशी तिची मागणी नाही,, तर ज्या संयुक्त महाराष्ट्रच होर्लीक्स पाजून महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली तिला ताकदवान बनवलं तिच्यात विलीन करा एव्हडीच एक इच्छा मनात धरून सीमाबंधव गेली 70 वर्ष सनदशीर मार्गाने सरकारशी लढा देत आहे पण यश नाही आणि महाराष्ट्रात मराठीचा माज दाखवत तिची मुलं ऐशोरामात जगत आहेत वर निलाजरेपणे आता तुम्ही तिथेच रहा हा श-हा जोगी सल्ला देत आहेत काही जण तर रहा ना तिथेच काय जात कन्नड बोललं तर? असे सल्ले ही देत आहेत*
पण ,,,,
*कुत्रा हरवल्याची तक्रार देणाऱ्या लोकांना आज्जीला काय नेमकं हवं ते कसं कळणार?*
*माझ्या सर्व मराठीचा माज असणाऱ्या मित्रांना आवर्जून आग्रहाची विनंती आहे सीमाबंधव स्वतःच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रात येऊ पहात आहेत तुम्हला मदत करता येत नसेल तर किमान विरोध तरी करू नका?*
*ह्या कॉस्मोपोलिटीन मुंबईत भैया बिहऱ्यां पासून बंगाली गुजराती मारवाडी भटके चालतात पण अतिशहण्या मराठी बांधला नेमकी आपल्याच मराठी बांधवांची अडचण होते ज्यांच्या जोरावर आज मुंबई आमची म्हणता तेच नकोसे झालेत?🤔😳*
आज *महाराष्ट्र् दिन साजरा करताना विचार करा की महाराष्ट्र् दिन साजरा करायची आपली लायकी आहे का?त्यावेळी काँग्रेस वाल्यांनी फसवलं आज भजपवाले चुना लावत आहेत कृपया मूर्खांच्या भूलथापांना बळी पडू नका*👏👏👏👏
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment