Thursday, May 24, 2018

*गिव्ह इट अप,,,*

|| श्रीनथुरामाय नमः ||

*नेताजी आणि नेताजी आधी तुम्ही गिव्ह इट अप करा,,*
*तुम मुझे खून दो ते बोलणारे सुभाषजी कुठे आणि त्या नन्तर देशासाठी खून देणारे शेकडो लाखो करोडो सारा देश कुठे????*

हि सारीच 56 इंच का सीना असणारी
*कबुतर,,,,*
*शांती ची कबुतर*

प्रधान सेवक पदी रुजू झाल्याबरोबर
मोदीजींनी भावनिक साद घातली
तुम्हाला मिळणारी सबसिडी परत करा त्यातून आपल्याच देशातील
एका गरीब कुटुंबात तुमच्याच पैशातून गैस जाईल घर धुरमुक्त
होईल ,,,
झालं सारे लोक भावनिक झाले कि
*बऱ्याच लोकांनी गिव्ह इट अप केलं,,*
पण अपेक्षित परिणाम जाणवला नाही
*सुरवातीला मिळालेला प्रतिसाद नन्तर थंड झाला*
कारण कालांतराने लोकांच्या लक्षात आलं हे काही खर प्रकरण दिसत नाही
*यांचे हि पाय मतीचेच,,,*
फक्त घोषणा आणि घोषणा त्यातही
तुम्ही अमुक करा मग मी तमुक करेन,,,
मान्य कि जनतेचा सहभाग असल्या शिवाय बर्याच योजना राबवता नाही येत
पण मोदी सरकार जरा अतीच करतय या बाबतीत साऱ्याच
बाबतीत जनतेकडून अपेक्षा ठेवून
कस चालेल??

*आणि त्यामुळे मोदीजींनी ठरवलं*
मागून मिळत नाही ना आता
जबरदस्ती घ्यायचं
*त्यासाठी फतवा काढला*
10 लाख पेक्षा जास्त वार्षिक उत्त्पन्न
असलेल्यांना सबसिडी मिळणार नाही अस ठरवलं
*हे हि उत्तम का द्यावी असल्या लोकांना सबसिडी???*
पण मग नैतिकतेच्या प्रश्नावर
आधी सरकारने????
ठरवावं खरच आपल्याला हा अधिकार आहे का??
ज्यांचा कोट 10 लाखाचा त्या नन्तर कित्येत कोटीला तो विकला गेला
तो विकत घेणारा कोण?? आधी त्याच्या कडून काही मिळत का पहा
ज्यांनी प्रधान सेवकांच्या नावावर पृथ्वी प्रदक्षिणा करायची तेव्हडी बाकी ठेवली कदाचित पुढे मागे पूर्ण हि होईल असो,,,

बाकी सारे आमदार खासदार नामदार
नगरसेवक  यांना किति सोई सुविधा
मिळतात अस ऐकलय कि त्या राजभवनात संसदेत अस जेवण मिळत कि
सारी पृथ्वी पालथी घातली तरी इतकं चविष्ठ चमचमीत आणि ते हि *कवडीमोल* किमतीत कि विचारू नका त्याला मिळणारी सबसिडी
मग अर्थातच
रेल्वे विमान बंगले फ्लॅट इथं मिळणार *आरक्षण अधिकार सोडा???*
*जनतेचे नोकर ना तुम्ही???*
*कि राज्यकर्ते????*
आधी ते ठरवा तरी,,
सार काही जनतेने करायचं
भावनिक साद घालायची कि देशाप्रती
तुम्ही हि काही देणं लागता,,
सामाजिक बांधिलकी जपा वैगेरे वैगेरे,,,
*तुमची काहीच नैतिक जबाबदारी नाही का???*
ज्या गांधींच्या आदर्शाचा सारेच झेंडा मिरवतात त्या गांधीने गर्भश्रीमंत
वकील ब्यारिस्टर फॉरिन रिटर्न गांधींनी इथे आल्यावर पुन्हा कधी हि
अंगावर पूर्ण कपडे चढवले नाहीत
आता आधी तुमची वेळ आहे जनतेसमोर एक आदर्श निर्माण करायची तो आदर्श करा
*अहो ग्यास सबसिडी काय घेऊन बसलात पूर्वी सारा देश नेत्यांच्या म्हणण्यावर देशासाठी जान कुर्बान करताना पुढे मागे पहात नसत माग ते लहानंगे बाबू गेनू असतील मिसरुड न फुटलेले भगतसिंग असतील आम्ही त्यांच्याच औलादीचे आहोत*
फक्त गाव गप्पा नको
त्यामुळे ज्या देशातील नेते तुपाशी असतात आधी त्यांना जनतेला उपाशी ठेवून
नैतिकतेचा टेभा मिरवरयांनी आधी याची जमली तर उत्तर द्यावीत
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
🚩कडवट शिवसैनिक🚩

No comments:

Post a Comment