Tuesday, May 1, 2018

महाराष्ट्र हा भारताचा खड्‍गहस्त झाला पाहिजे !

||श्री नथुरामाय नमः||

अश्या रितीने मी संपूर्ण समाधानात आहे… अध्यक्ष वगैरे व्हायचं सुध्दा माझ्या मनात कोणत्याही प्रकारचं नाही. याच कारण विचाराल तर सांगतो. तुम्हाला वाटेल सोपे आहे, ह्यांना कोणी निवडून देत नाहीत, म्हणून हे अध्यक्ष होत नाहीत. नाही बरं ! निवडून दिलंत तर मी अध्यक्ष होईन सुध्दा. तुमचं जर मत असेल तर मी अध्यक्ष होईन आणि दोन वर्षांच्या आत मी ह देश क्रुशेव्हच्या रशियापेक्षा बलाढय करुन दाखविन… हो..हो.. दोन वर्षाच्या आत. त्याने जसा जगाला जोडा दाखविला तसा मी माझा बुट उचलून जगाला दाखविन ! अरे या गोष्टी शक्तीच्या असतात, सैन्याच्या असतात.

 उद्या संसदेत असा नियम आला की, महाराष्ट्राला भारतापासून तोडून टाकावं तर शस्त्रास्त्रे घेवून आम्ही तुमच्यावर चालून येऊ की भारत आमचा आहे ! तुमचा कोठून म्हणता? इतकं महाराष्ट्राचं स्वातंत्र्य मला क:पदार्थ वाटत की, महाराष्ट्र जर तोडला तर आम्ही भारतच मागू. मला महाराष्ट्र हाच भारत वाटतो आणि भारत हाच महाराष्ट्र !

“माझे एवढेच सांगणे आहे की, महाराष्ट्राने भारताचा खड्‍गहस्त झाले पाहिजे. तुमचे सैन्य भारताच्या सैन्यात अत्यंत पराक्रमी ठरले पाहिजे… सैन्य जर तुमचे असेल तर भारताला भीती नाही”.

 ---- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, दिनांक १५ जानेवारी १९६१

          || महाराष्ट्र गीत ||

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ.॥

गगनभेदिगिरिविण अणु नच जिथें उणें ।

आकांक्षापुढति जिथें गगन ठेंगणे ।

अटकेवरि जेथिल तुरंगि जल पिणें ।

जेथ अडे काय जलाशय नंदाविणें ?

पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा ॥१॥

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें ?
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें ।

रत्नां वा मौक्तिकांहीं मूल्य मुळिं नुरे ।

रमणीची कूस जिथें नृमणि खनि ठरे ।

शुध्द तिचें शीलहि उजळवि गृहा गृहा ॥२॥

नग्न खड्‍ग करिं, उघडें बघुनि मावळे ।

चतुरंग चमूचेंही शौर्य मावळ ।

दौडत चहुंकडुनि जवे स्वार जेथिले ।

भासत शतगुणित जरि असति एकले ।

यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥३॥

विक्रम वैराग्य एक जागिं नांदती ।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती ।
धर्म, राजकारण समवेत चालती ।
शक्तियुक्ति एकवटूनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ॥४॥

गीत मराठयांचे श्रवणीं मुखीं असो ।
स्फूर्ति दीप्ति, धृतिहि देत अंतरीं ठसो ।
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं ठसो ।
देह पडो तत्कारणिं ही असे स्पृहा ॥५॥

 ---- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

No comments:

Post a Comment