Friday, June 1, 2018

गारुडी आणि भीती काँग्रेसराज्याची अर्थात हिंदुखतरेमे 🤔😏😜??


||श्री नथुरामाय नमः ||
परवा अचानक माझ्या मेहुणीचा फोन आला दाजी उद्या माझं एपेंडिस्क च ऑपरेशन आहे असा असा खर्च सांगितला आहे जरा माझ्या बहिणीला पाठवा आणि जमल्यास तुम्ही पण येऊन जा मी बर ठीक पाठवतो तोच साधारण 15 वर्षपूर्वीच गोष्ट आठवली
एका गारुड्याने सहज फसवलं होत मला,,,,
लगेच मी तिला थांबवलं विचारलं नक्की काय होतंय
मेव्हणी-आता मला सहन ही होत नाही हो कुठे गप्पा मारताय ती वैतागत बोलली
मी- अरे जर थांब घाई करू नकोस फुकट खर्च कशाला करतेस डॉ देशपांडे कडे जा तिथे मी येतो आपण पुन्हा नीट चौकशी करू
हो नाही करता करता ती सोबत यायला तयार झाली
तिथे गेलो तर डॉ नी तपासले म्हणाले काही विशेष नाही खूप गेस झालाय ही गोळी घ्या बर वाटेल,,,
आणि काय आश्चर्य ती गोळी घेताच तिला बर वाटल,,
मेहुणी सारखे सारखे आभार मानत होती आणि मी मात्र 15 वर्षा पूर्वीची गोष्ट आठवत स्वतःच्याच मुर्खपणावर आज हसत होतो
तर ,, सकाळी साधारण 6 ची वेळ त्यावेळी घरोघरी दूध पोचवत असे एका बिल्डिंग मध्ये दूध देऊन खाली उतरलो बाहेर रस्त्यावर येऊन सायकलवर टांग टाकणार तोच एक आवाज आला ओ बाबूजी एक दस रुपया दो ना,,,बघितलं तर एक गारुडी त्याची टोपली हातात उचलत माझ्याकडे येत होता
कुठे सकाळी सकाळी आता हा पैसे मागतोय अस म्हणत नही नही आगे जावं म्हणत मी टांग टाकणार तोच त्या गारुड्याने टोपलीतला साप काढून माझ्या गळ्यात टाकला ,,, आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली अरे अरे काढ तो ,, तसा गारुडी आणखी भीती दाखवत बोलला साब निकालो दस रुपया नही साप काटेगा,,,, मी ही साप चावेल या भीतीने पाकीट काढल दहा द्यावे म्हणून मी बघत होतो पण गारुड्याने चपळाई करत पाकीट हिसकावून घेतलं आणि पोबारा केला
कशी बशी मी सायकलवर टांग टाकली आणि नशिबाला दोष देत घरी आलो पण ते स्वकष्टाचे 700 काही केल्या डोळ्या समोरून जाईना
खर तर गारुड्याचा साप तो त्याचे विषाचे दात काढलेले असतात याची कल्पना आणि तरीही मी घाबरलो ही खंत जास्त बोचत होती
मित्र नातेवाईक यांच्या सल्यानुसार मी पोलिसांकडे तक्रारही नोंदवायला गेलो पण पोलीस देखील हात झटकून मोकळे झाले शेवटी 700 गेले ते गेलेच पुन्हा मात्र तो गारुडी कधी दिसला नाही पाकीट गेलं आणि गारुडीही
तात्पर्य:-ते किमान 700 असलेलं ते पाकीट मात्र माझ्या कायमच लक्षात राहील आता मी उगाच भीती बाळगत नाही वास्तवीक मला माहित होतं की गारुड्याचा साप तो बिनविषारीच असणार हे कळत असतानाही कारण नसताना मी भ्यायलो आणि गारुडी मात्र 700 घेऊन पळून गेला होता
आज #भाजप_सारखे_भुरटे 2019 साठी पुन्हा तोच गारुडी खेळ खेळत आहेत
बघा ,, आमचा द्वेष कराल तर काँग्रेसचं राज्य येईल मुस्लिम माजतील हिंदू खतरमे😜😜😜😜
गेल्या चार वर्षात हिंदूत फूट पाडून आज हिंदुत्वच्या गोष्टी करता??? निलाजरे😏😏😡😡😡
पण आता आम्ही तुमच्या खोट्या बिनविषारी हिंदुत्वाला भुलणार नाही.

No comments:

Post a Comment