Friday, June 1, 2018

दिल सच्चा हो तो दोस्त और दिमाग अच्छा हो तो दुश्मन पैदा होते है,,,,

|| श्री नथुरामाय नमः||
दोनच दिवसांपूर्वी माझ्या सातारा येथे राहणाऱ्या मित्राचा फोन आला , वयाने खूप मोठे आहेत ते बोलले सुनील फेसबुक वर तर 5000 ची  लिमिट आहे पण जेव्हा पासून तू जॉईन झालास 5002 दाखवतात, मी म्हंटल ठीक होत असे कधी कधी चुकून झालं असेल ते fb वाले करतील कमी,, त्यावर तो बोलले ते मरू दे तू परत fb मुले सापडलास बर वाटल या पेक्षा आनंदाची गोष्ट ती काय ?,,
आणि बराच वेळ गप्पा आठवणीत रमलो त्यात त्याने त्यावेळची युनायटेड वेस्टर्न दादर बॅंकेत घडलेली घटना आठवण करून देऊन पुन्हा एकदा त्याने #यार_तेरे_वझह_से_मै_बाल_बाल_बच_गया_था तेरे जैसा दोस्त मिल गया और क्या?
(त्यांना असे अधून मधून हिंदी बोलायची उचकी लागते,,)
मी ही त्या भूतकाळात रमलो
त्यावेळी 2 लाखात झोपडी वजा घर मिळत होत
एक गुंतवणूक म्हणून घ्यावं असा विचार केला
अर्थात त्यावेळी आणि आजही 2 लाख जवळ नाहीत
पण व्यवसायिक आणि बॅंकेशी असलेले व्यवहार पाहता बॅंक आजच्या सारखी आढेवेढे न घेता छोटी मोठी रक्कम मी बॅंकेतून काढत असे  पण आता दोन लाख हवेत म्हणत सोबत वडिलांना घेऊन गेलो मॅनेजर साहेबांनी दहा वेळा वर खाली सही तपासत त्यांनी पुढ्यात त्यांच्या केबिन मध्ये बसवून हाती सोपवले
आता एव्हडी मोठी रक्कम कधी न पाहिलेले आम्ही त्या सीलबंद नोटा लगेच न मोजता ब्यागेत भरून घरी आलो कडी वैगेरे लावली आता निवांत मोजू म्हणू म्हणत मोजायला बसलो तर उडालोच
आम्ही 2 लाख मागितले होते आणि आमच्या पुढ्यात तर 3 लाख होते,,,,, 4/5वेळा पुन्हा मोजून पाहिले
पण होते नक्की 3 लाखच,,,, आता मात्र वडील तसेच उठले म्हणाले चल ते पैसे भर पुन्हा आपण जाऊ बॅंकेत,, तसेच धावत पुन्हा बॅंकेत हजर झालो तोच मॅनेजरच्या केबिन मध्ये शिरलो तो ते साहेब डोक्याला हात लावून बसलेले घामाने भिजलेले पाहिले
आम्ही हातातील बॅग त्यांच्या समोर ठेवली झाला प्रकार सांगितला त्यांच्या तो लक्षात आलाच होता
पण असे पैसे मिळाले अस कोण कबूल करणार हे त्यांना माहीत होतं त्यामुळे आता गेलेले पैसे कसे वसूल करणार हा प्रश्न त्यांच्या समोर होता ,,,
आणि आम्ही तर स्वतः जास्तीचे पैसे घेऊन स्वतः हजर झालो होतो त्यामुळे त्या साहेबांचा आनंदाला पारावार राहिला नव्हता खूप खूप कौतुक केलं त्यांनी आमच्या प्रामाणिक पणाच त्यामुळे त्या साहेबांची आणि आमची चांगलीच गट्टी जमली
पुढे पुढे तर त्यामुळे बॅंकेतील इतर कर्मचारी देखील मान देऊ लागले पैशासाठी पुढे कधी रांगेत उभे रहावे लागलं नाही चेक क्लियर व्हायच्या आत सुद्धा पैस मिळू लागले काही दिवसांनी साहेब बदली होऊन गेले तरी बॅंकेत आमची बडदास्त तशीच होती त्या पुण्याईवर,,,,
आज त्या साहेबांशी बोलणं झालं आणि सगळं चित्रपटा प्रमाणे तरळून गेलं,,,फेसबुक मुळे ते साहेब पुनः भेटले होते आज आणि त्यांनीच एकदा बोललेलं वाक्य सहज आठवलं
दिल सच्चा हो तो दोस्त और दिमाग अच्छा हो तो दुश्मन पैदा होते है,,,,
आज सत्तेत राहून शिवसेना आमची कशी मानहानी करते ?,कसा विरोध करते,? आमचे उमेदवार कसे पळवते? तुम्ही विरोधात झालं तर कस पुन्हा काँग्रेसचं राज्य येईल? वैगेरे वैगेरे प्रश्नाचं उत्तर एकच
दिल सच्चा हो तो दोस्त और दिमाग अच्छा हो तो दुश्मन पैदा होते है,,,,
अजूनही स्वतःला सुधारा नैसर्गिक मित्र आहोत ती निखळ मैत्री जपण्याच्या गोष्टी करा आमची मानहानी करू नका आम्ही तुमची करणार नाही
न जाणो हा मान तुमच्या 2019 साठी जास्त हानिकारक न होवो

No comments:

Post a Comment