सकाळ मुंबई टुडे दिनांक ३.६.२०१०
तुमचा मोडेन पण वाकणार नाही ,,,,वाचला तितका रुचाला नाही म्हणून ,,,,
खरच नाही आवडला अगदी थोडक्यात कुणाची तरी सुपारी घेवुन लिहिल्या सारखा वाटला
याचा अर्थ तो मराठीच्या बाजूने लिहिला असता तर मी पाठ थोपटली असती अस नाही,
पण टिका करायच्या आधी मराठीची मानसिकता महत्वाची अस मला वाटत ,,,
अगदी साध माझ उदा. दिला तर ,
ज्या भागात मी राहतो जिथे माझ दुकान आहे
तेथे आजू बाजुस सर्व मराठी वस्ती आहे .
अत्यंत गरीब पण तितकेच प्रमाणिक ,
गेल्या ३५ वर्षा पासून माझ्या दुकानाला टाळ नाही .
जो कुणी माझ्या दुकानात येतो तो ते बघताच मला विचारतो हे बंद कसे करता ?
आजही मी कित्येकदा अगदी दुकानातील वास्तु विसरून जातो त्या तशाच
बाहेर पडलेल्या असतात कुणीही त्याना हात लावत नाही
केवळ मराठी लोक वस्तीत राहतो म्हणून हे शक्य आहे
अर्थात नुसत्या प्रमाणिक पणावर पोट नाही भरत हे मी जाणतो
पण खोट काम नाही जमत मराठी माणसाला
(अपवाद असेल ही पण मेंदू दुसर्याचाच असतो)
अगदी रस्त्यावरचा सरबतवालाही सरबातासाठी शवागरातला बर्फ वापरतो
मराठी माणुस हे करेल काय?
सैंडविच वाला ही भोपळ्याचा सॉस आणि हलक्या प्रतीचा बटर वापरतो .
मुळात यांची रहायची व्यवस्था नसते,
आंघोळीची व्यवस्था नसते ,
कपडे धुवायाची नसते ,
हे आपल्यासाठी कुठल्या पाण्यात पाणी पूरी बनवणार ?
आणि ही सर्व उपलब्धता मराठी माणसा कड़े असते
पण तो हे करायला लागला की नेमका त्याचा भाव जास्त असतो माल चांगला असतो
स्वछता असते आणि मग त्याची तुलना भैयाच्या माला बरोबर कुणी केली
की तो अरेरावी करतो आणि याला
मराठी माणसाचा उद्दाम पणा आहे असे बोलले जाते
मराठी माणसाला परवडत नाही कारण तो रस्त्यावर राहत नाही
त्याला इथे रितसर सर्व टैक्स ,लाईट बिल ,घरपट्टी ,
आणि इतर सार भराव लागत
मग ईतक सार व्यवस्थित करून त्याने का कुणाचे हात पाय धरावे?,
का कुणाची हाजी हाजी करावी? ,
का उगाचच जी साब जी साब करत जगाव?
भैया यापैकी काय भरतो ?
लाईट बिल? पाण्याचे बिल?
इनकम ट्याक्स?
मुळात धंदा करतो कोण ?
ज्याच ८ तासांच्या नोकरीत पोट भरत नाही
जो मिळालेल्या पगारात समाधानी राहत नाही ,
किंवा ज्याला दुसर्यांच्या मुंडक्यावर पाय ठेवून पुढे जायचे आहे
उदा. अम्बानी बंधु,,,
प्रमाणिक पणे धंदा कारण किती अवघड आहे हे मला विचारा,,,,
आणि त्यात ही
आमच भांडन भैयंशी नाही त्यांच्यातील मुजोर पणाशी आहे
आज जो मार खातोय तो खुप गरीब आहे अस चित्र रंगवल जातय,पण खर तर हे सारे खरे मुजोर झालेत ,
आम्हाला घाबरून रहाव ही इच्छा नाही ,
पण आमच्याशी दादागिरिची भाषा करू नए ही प्रमाणिक इच्छा जरुर आहे
पर्वाची गोष्ट मी सिन्दुर्गाहून येत होतो (मालवण)
लाल डब्यात बसलो होतो सारा डब्बा मराठी माणसांनी खच्चून भरला होता
इतक्यात एक भैया जोडप शिरल आणि बसायच्या जागेवरून भांडू लागले
तिथल्या लोकानी अर्थातच त्याला नाही बसु दिल. पण लक्षात घ्या
इतक्य लोकां समोरही तो घाबरला नाही ही हिम्मत कुठून आली ?
आपण यूपी बिहारता जावून असे करू शकतो का?
मी फिरलो आहे त्या भागात तिथल्या मराठी बांधवांना भेटलो ही आहे
देशपांडे केव्हाच पाण्डे झाले आहेत ,
म्हणजे काय ते लक्षात आल का?
रहायचा असेल तर आमच्या सारख रहा हे सांगव लागत नाही त्यासाठी मारझोड करावी लागत नाही ,दंगा करावा लागत नाही
हिंदीची पीछेहाट होते अस कंठ शोष करावा लागत नाही
आणि गंभीरपणे विचार करण्याची बाब म्हणजे
जो इथे हिंदीचा नारा घुमवला जातो आहे त्या भैयांना विचारा
किती भैये शुध्ह हिंदी बोलतात?
एक ही नाही ,,,,,,,,
हा मात्र इथे येणार्या प्रत्येकाला मराठी यावीच लागेल हा आग्रह जरुर राहिल कारण गरज त्याला आहे ,
इथली काही ही माहिती नाही तरी तो ट्याक्सी चालवतो,
मार्केटिंगला बाहेर पडतो,
आज प्रत्येक गल्ली फुटपाथ भैया आड़वुन बसलाय
कारण त्याला इथे यूपी बिहार पेक्षा सुरक्षित वाटत
विचारा हवतर ,,,
त्याला आपल्याच गावात मोह्ल्यात असल्या सारख वाटत
का,,,,? केवळ मराठी माणसात महाराष्ट्रात रहातात म्हणून,
त्याना मराठी येवो न येवो त्याना माहित आहे
मराठी माणुस त्यांच्याशी हिंदीत बोलणार,,,,,,,
अस असताना कुठे दोन चार फूटकळ घटना घडलय मारामारीच्या तर त्याच भांडवल करून मराठी माणसाला झोड़पनार आहात का?
आणि हिंदी सिनेमात ,जाहिराती मध्ये मराठी नायिका
द ग्रेट वंदना गुप्ते असते कोण तर शांताबाई झाड़ू वाली ,,,
सुपरस्टार लक्मिकांत बेर्डे कोण तर रामा गडी ,,,
मलिकात नटया दिसतात केवळ हिंदी स्टार तुलनेत त्या स्वस्तात मिळतात म्हणूनआणि आम्ही सिनेमा काढतो तेव्हा पडेल हीरो घेतो
राहुल रॉय सिनेमाच नाव काय तर छावा ,,,?
अरे मराठी छावा नाही काय?
शक्ति कपूर हीरो पेक्षा जास्त जागा त्याला असते
ज्याला आज हिंदी सिनेमात हिंग लावून ही विचारत नाही
इथे कुठे दिसतो हिंदी द्वेष?
रहता राहिली विकासाची गोष्ट
विकास म्हणजे नेमक काय रे भाऊ?
इथल्या माणसाला इथल्या संस्कृतीला
इथल्या बोलिला
इथल्या मराठी मुलींनी भैया मुलांशी लग्न करण म्हणजे विकास काय?
मराठीं अस्मितेला बाद ठरवण म्हणजे विकास का?
आमचा पुण्याचा एक्सप्रेस हायवे झाला आणि इथला भैया इथे जेवून
तिथे हात धुवायला पुण्यात जावू लागला त्यामुळे ,,,,
पुण्याचे शेती करणारे आमचे नातेवाईक आज शेती करतात पण,,,,
घरांची ,,,,,,,,
सगळ्यात जास्त वाईट घटना आज आमच्या पुण्यात घडत आहेत
हा विकास म्हणावा का?
आज आमच्या गावच्या रस्त्यावर माझ्या बरोबर चला
एक मराठी माणुस दाखवा १०० रु. बक्षिस घ्या ,,,
हा विकास झाला का?
विकास करायचा असेल तो शेतीवर आधारित असावा
पण शेतकरी म्हणतो सरकार जर १०० रु. धान्य देत आसेल तर आम्ही शेती तरी का करावी?
आणि या शेती ना करण्या मुले आज किती प्रश्न निर्माण झालेत याची
यादी न वाचणे बरे याला विकास म्हणावा का?
पाण्याची बाटली विकत घेण म्हणजे विकास का?
असो आता मी चाललो आहे रायगडावर
६ जून ला राजाभिषेक आहे महाराजांचा
लिहिताना काही चुकीचे लिहिले असेल तर माफी असावी
ता.क.... महाराजानी सांगीतल आहे आम्हाला
कुठे वाकयच आणि कुणाला मोडायच
कुणासाठी मोडायच नाही तर ,,,
मिर्झा राजां समोर झुकले नसते आणि
पापी औरंग्याला भर दबारत खड़े बोल सुनावाले नसते सुनील भुमकर ९८७०८४९०६३ ९८६९८४९०६३
No comments:
Post a Comment