Sunday, June 13, 2010

ही यांची मुजोरी नाही का?

बिपिन सर ,
गुरूवारच्या लेखाला मी उत्तर दिले आहेच
मी त्यानंतर आपणास फोन ही करायचा प्रयत्न केला परन्तु
आपण कामात असाल म्हणून तो उचलला नाहीत
नंतर फोन करतो म्हणालात पण कामाच्या बोज्यामुळे असेल आपणास ते ही जमल नाही
 किंवा कोण हा टिकोजी राव मला शाहणपणा शिकवणार? 
असे वाटले असेल,
किंवा काय हा कारण नसताना चावातोय असेही वाटले असेल
असो,,,,
तरीही वेताळ आणि राजा विक्रम आपल काम सोडत नाहीत तसच काहीस माझ आहे
म्हंटल दादर स्टेशन वरील माझ्या बाबतीत घडलेली घटना सांगावी
पण त्याही आधी आजच
http://72.78.249.107/Sakal/13Jun2010/Normal/Mumbai/page9.htm 
१३.६.२०१० रविवार सकाळ मध्ये वाचलेली गोष्ट सांगतो ,,
कारण लिहिणारे साधे सुधे नाहीत
राष्ट्रिय प्रवचनकार डॉ.सच्चिदानंद शेवड़े आहेत
त्यानी मॉरिशस  चा वेध घेताना त्या पिटुकल्या देशाची
गोष्ट सांगताना आवर्जुन त्यानी एक गोष्ट नमूद केली
ती अत्यंत महत्वाची  ,,,,,,,,,
ती अशी की ,
मॉरिशस  ची लोकसंख्या जवळ पास बारा लक्ष आहे आणि
५२ \५५ % लोक हिन्दू, त्यात ही बिहारी जास्त आहेत
पण,,,,
तेथे समुद्र किनारी
"छट पूजेचा" आग्रह धरला जात नाही ,,,,,
याचा अर्थ काय मयेकर साहेब मला सांगाल का?
माझा अभ्यास थोडा कच्चा आहे.....
काही वर्षा पूर्वीची घटना आठवत असेल त्यावेळी तर
आजच्या ईतक भैया हटाव किंवा हिंदीला विरोध अस वातावरण
नव्हत ही गोष्ट आहे केरळात घडलेली ,,,
एक दिवस केरळात पाच मिनट मुसलमानां साठी
उर्दू बातम्या दाखवल्या गेल्या आणि ,,,
तब्बल ३ दिवस केरळ जळत होत
त्यानातर पुन्हा अशी घटना घडल्याचे ऐकिवात नाही 
याचा अर्थ काय मयेकर साहेब मला सांगा
माझा अभ्यास थोडा कच्चा आहे.........
आणि
रजनीकांत कधी म्हणालाका कि चेन्नई सर्वांचीआहे?, 

नारायणमूर्ती म्हणाले काकि बेंगलोर सर्वांचेआहे?,   

चिरंजीवी म्हणालाका कि हैद्राबाद सर्वांचे आहे?,   

ममता ब्यानार्जी म्हणाल्याकि कोलकत्ता सर्वांचा आहे. 

गाव जरी सर्वांचे असले तरी घर सार्वजनिक नसते. 

भारत सर्वांचा असलातरी मुंबई सर्वांची नाही.
हे बरोबर ना?
मला जरा सांगा माझा अभ्यास थोडा कच्चा आहे  ......
आणि काल ची दादर स्टेशनवर घडलेली घटना  ,,,
मी उल्हासनगर हुन संध्याकाळी ७.३०\८ च्या दरम्यान 
दादरला उतरलो बरोबर थोड सामान आणि लहान मुलगी असल्यामुळे  मी ठरवल ट्याक्सी करावी म्हणून रांगेत उभा राहिलो 
त्या रांगेत मी एकटाच ,
कारण प्रत्येक ट्याक्सी कोपर्या वरून  भरून यायची किंवा 
रिकामी आलीच व तिला अडवलीच तो ट्याक्सी वाला म्हणायचा  
साब ट्याक्सी बुक है 
आगे प्यासेंजर खड़ा है 
असे अर्धा तास चालले होते 
हा काय चावट पणा म्हणून मी पोलिसकडे गेलो 
मी त्याला सांगीतल की इथे हा काय प्रकार चालला आहे 
मी इथे रांग लावून उभा आहे बरोबरीचे लोक कंटाळून  
चालत गेले आहेत 
आणि ट्याक्सी आधीच कशी भरून येते ?
अर्थातच त्याला हप्ता असणार त्याला लक्ष द्यायला वेळ नव्हता 
मी परत रांगेत आलो तितक्यात परत एक रिकामी ट्याक्सी आली 
मला परत तेच उत्तर मिळाले 
"साब ट्याक्सी बुक है"
आता मात्र माझ डोक फिरल मी त्याला रागावून 
ट्याक्सित बसलो इतक्यात ज्याने ती बुक केली 
होती तो सदगृहस्थ,,,? (भैया)
आपल सामान आणि बायका पोरांना घेवुन आला 
आणि वर मला बाहेर ये म्हणून दम देवू लागला 
आणि त्याच्या बायकोने तर ,,,,वा काय शब्द सम्पदा होती तिची 
तिचे शब्द ऐकून माझे कान अगदी तृप्त झाले
कृत्य कृत्य वाटल,,,
मला म्हणाला 
"ये ट्याक्सी हमने बुक किया है तुम निचे उतरो"
आता मी हट्टाला पेटलो मी म्हणालो 
"तुम ट्याक्सी बुक किया वांदा नाय  सामने पोलिस खड़ा है 
बुलावो मै पूछता हु ट्याक्सी कैसे बुक होता है "
अर्थातच तो काही गेला नाही 
आणि १५\२० मिनिटाच्या  हुज्जती नंतर त्याने आपल जबरदस्ती 
चढवलेल सामान मला शिव्या शाप देत खाली उतरवल .
या  गडबडीत तो त्या ट्याक्सी वाल्याला सारख सांगत होता 
"हम पोलिस को बुलाता है तुम बोलना ये ट्याक्सी हमने बुक किया है "
परन्तु ट्याक्सी वाला हे जाणून होता की अशी ट्याक्सी बुक करता येत नाही 
इतर भैये त्याला साथ देत होते आणि दादर स्टेशनवर 
माझ्या बाजूने बोलणारा कुणीही मराठी नव्हता 
पण मी बरोबर आणि ठाम असल्यामुले शेवटी  ट्याक्सी निघाली मला घेवुन ,
आणि पुढेच तो पोलिस उभा होता 
मग मी जो राशन पाणी घेवुन चढलोय त्याच्यावर विचारू नका 
अशी सर्व परिस्थित आज का झाली याचा कधी गांभीर्य पूर्वक विचार करणार की नाही ?
ही यांची  मुजोरी नाही का?
मला  जरा सांगा मयेकर साहेब  माझा अभ्यास थोडा कच्चा आहे .
मयेकर साहेब हिंदीची भैयांची बाजु घेवुन आज,
सारेच मराठीला झोडपू पाहत आहेत 
सारेच लोक भैया किती चांगला 
किती कामसू याच गुणगान करत आहेत 
आणि आम्ही सारे मराठी कसा कामचुकार याचे पोवाडे गात आहोत
पण हे विसरतो की इथे येणारा प्रत्येक पर प्रान्ती 
आपल्या बांधावाला हात देतो
आज वेटर असनारा उद्या लगेच गल्ल्यावर
आणि दुसर्याच वर्षी तो एखाद्या होटेलचा मालक होतो 
मी जीथे सामान आणायला जातो तिथे काळबादेवी ला
आपल्या  नोकरा कडून आजच्या घडीला 
दोन वेळ जेवण चहा नाश्ता राहण्याची सोय 
आंघोळीची  सोय म्हणून केवळ १२५ रु.घेतो 
आपली मराठी आमदर खासदार 
इथले कारखानदार मोठाले व्यावसाइक किती एकमेकांना
मराठी माणसाला मदत करतात ?
कधीतरी चोव्कशी करा पुर्वीचा दुकानदार तो मराठी माणसाला च 
कामावर ठेवत असे कारण तो प्रमाणिक होता आहे
पण कालांतराने त्यांचे विचार बदलू लागले आणि आज ते फक्त 
त्यांच्याच जातीच्या माणसाला कामाला लवतात
आणि ह्या प्रमाणिकपणा च फळ काय तर 
इथे  त्याला एक साधी ट्याक्सी मीळवन्यासाठी  
मारामार करावी लागावी?
अगदी  म्हाडाच घर घेताना ही दहादा विचार करावा लागतो ?
अगदी  मी गेली ३५ वर्षे फुटपाथवर  धंदा करत आहे 
मी आज माझी मोटर सायकल चालवताना विचार करतो 
का उगाच पेट्रोल जाळा ?
आणि हे राज रोस मुम्बईत येतात 
याना कुणीही आड़वत  नाही ,
याना अगदी सहज राशन कार्ड मीळत,
लाईट मीळते
पाणी पाईप फोडून मीळते 
इथे  त्यांचे मोहल्ले आहेत 
त्यांचे आमदर आहेत 
त्यांचे खासदार आहेत
त्यांचे नगरसेवक आहेत 
गेला बाजार अगदी 
सेनेची बिहारी सेना ही आहे
मनसे ची रिटा गुप्ता ही आहे
अहो त्यांच्य साठी हा आता महाराष्ट्र नाही 
हा बिहाराष्ट्र आहे
याचा अर्थ काय मयेकर साहेब 
मला सांगा माझा अभ्यास थोडा कच्चा आहे............

No comments:

Post a Comment