Wednesday, November 3, 2010

डोंबिवली फास्ट

||श्री नथू रामय नमः||
थोरली आणि धाकटी पातीअर्थात 

उद्धव साहेब आणि राज साहेब
सप्रेम जय महाराष्ट्र.
कल्याण डोबीवली चा निकाल लागला आणि ,
सार्या पोपटरावांनी भविष्य वर्तवायाला सुरवात केली .
राज साहेब हेच कल्याणचे सुभेदार ,,
सेनेने त्याचा गड राखला ,
अपक्षांची मदत सेनेला,
राज साहेब महापौर ठरवणार,
कोन्ग्रेस राष्ट्र्वाची मोट बांधून मनसेचा महापौर,
सेना पुणे प्याटर्न राबणार ,
अमुक होणार आणि तमुक होणार ,,,,,,
एकसोएक  बातम्या,,,
पण आपण सर्वांनी जर निट लक्षपूर्वक हा निकाल पहिला तर काही
लक्षात येईल ते असे,
शिवसेना ३२-३१
मनसे ००-२७
भाजप १७-९
कोन्ग्रेस २१-१५
राष्ट्रवादी २३-१४
अन्य १४-११
या सर्व निकालांकडे पाहिल्यावर अस लक्षात येईल
कि अजूनही मराठी हिंदुत्ववादी मतदार
सेने कडे आणि मनसे कडे ओढ घेतो.
आणि त्या सर्वांनी मिळून असा संदेश दिला आहे
कि आमच ठाकरे घराण्यावर च प्रेम आहे आणि
आमच्या निष्टा आम्ही ठाकरे घराण्याच्या पायी ठेवल्या आहेत.
आम्हा सर्वांच अशी ईच्छा आहे कि
दोघांनीही गुण्यागोविंदाने कल्याण डोम्बिवली पालिकेवर राज्य करावे .
हेच जणू त्यांनी मतपेटीतून सांगितलय.
तेव्हा उद्धव साहेब आणि राज साहेब
आपणा दोघास विनंती आहे
आपणा दोघासही महाराष्ट्रच भलच करायचं आहे.
आपणा दोघांच प्रश्न सारखेच आहेत .
आणि सत्ते साठी तडजोड करून
लांडग्यांच्या हाती महाराष्ट्र सोपवण्या पेक्षा
तुम्ही दोघांनीहि आपापले व्यक्तिगत रागलोभ
बाजूला सारून पुन्हा एकत्र या .लोकांचीही तशीच इच्छा आहे.
मतपेटीतून त्यांनी हा संदेश दिला आहेच.
त्याचा आदर राखावा आणि एकत्र येवून राज्य कराव
ईतरांशी चुम्बा चुंबी करण्यापेक्षा हे केव्ही चांगल .
सेना आणि मनसेची युती झाली तर ईतर कुणाची
मदत घ्यायची गरज भासणार नाही आणि,
आपल्याच विचारांच्या माणसांबरोबर
चालयच समाधानही मिळेल.

कारण यातच भल आहे
पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांना हिणवण्यासाठी कौरव आपली
सर्व सेना घेवून वनविहारासाठी वनात आले होते आणि त्यांची गाठ
यक्षांशी गंधर्वांशी पडते घनघोर युद्ध होत आता कौरव शरण जाणार
अशी परिस्थिती निर्माण होते तोच अर्जुन आपल गांडीव घेवून येतो
आणि यक्षाना गंधर्वांना परतवून लावतो आणि तिकडे कौरव लज्जित होवून निघून जातात
धर्माने सांगितलेलं असत अर्जुनाला आज जरी आपण पाच आणि ते शंभर असले
जरी आपल त्याचं आज भांडण असल आज ते संकटात आहेत  आज त्यांना मदत करणे आपल
कर्तव्य आहे आपल्यासाठी जरी आपण १०० आणि ५ असलो तरी
इतरां साठी आपण १०५ आहोत .

आणि आजच्या या महाभारताच्या लढाईत धर्माच काम भूमिका
कल्याण डोंबीबीवली करांनी  बजावली  आहे
आता त्यांचा रंनागणातील भामभावलेला अर्जुन करू नका हि अपेक्षा


मग बघा हि डोंबिवली कशी फास्ट होते ते
बाणाला घेवून ईंजीन निघाल सुसाट
ईतर सर्व पक्षांना डोंबिवली करांनी ठरवले पुचाट 

हो मात्र त्यासाठी मनाची पाटी कोरी कारण महत्वाच
कारण भगवान श्री कृष्णाऩे सांगीतलय
"जिथे मी आहे तिथे मी नाही आणि '
जिथे मी नाही तिथे मी आहे"
हा मी तेव्ह्डा हटवा साहेब सारा महाराष्ट्र 
मा. श्री. बाळासाहेबांच्या  या दोन्ही 
वाराश्यांकडे  ऐका विश्वासाने पाहतोय .
त्याच्या विश्वासाला तडा जावू देवू नका
बघा पटतंय का .
जय महाराष्ट्र
कडवट शिव सैनिक
सुनील भूमकर .


2 comments:

  1. jabardast ! भगव्या चा च विजय होवो ...........

    ReplyDelete
  2. या निकालाने सेना मनसेने एकत्र राहणे अपरिहार्य आहे असा कौल मराठी मतदारांचा आहे हे सिद्ध होतय आता यापुढे या दोन्ही सेना मराठी जनांच्या मनाचा विचार करत योग्य निर्णय घेतील अशी निदान आपण फक्त अपेक्षाच करु शकतो...
    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!

    ReplyDelete