||श्री नथुरामाय नमः ||
परवाच माझ्या मित्राने एसेमेस केला तो वाचत होतो
आणि सहजच हाताला रद्दीत काढताना धर्मभास्करचा अंक लागला जुलै १९९०
त्यात सहज चाळल तर स्वामी विवेकानंदांच एकंदरीतच भाष्य लिहल होत.आणि त्यात आणि वाचत असलेल्या एसेमेस मध्ये जरा सुध्हा फरक जाणवला नाही .
"उगवणारा सूर्य तू ,धगधगणारा अग्नी तू,
यामाहून अक्राळ तू, सागराहून विक्राळ तू,
बेभान असा वारा तू ,चैतन्याची धारा तू,
शांत असल्यास संत तू,संतापल्यावर हनुमंत तू,
स्वाभिमानाची भाषा तू,मातृभूमीची आशा तू ,
ओळखलस का कोण तू,,,,?
हिंदू आहेस हिंदू तू,,,,"
आणि स्वामी विवेकानंदांनी नेमक हेच केल निद्रिस्त आणि झोपेच सोंग
घेतलेल्या समाजाला आणि हिंदूंवर अधिसत्ता गाजवण्याची स्वप्न बाळगणाऱ्या
मूढाना नेमक हे सांगितला कि हिंदू कसा आहे,,,
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीवर्षाच्या निमित्त त्यांचे स्फूर्तीदायी विचार !
आपण हिंदू आहोत, याविषयी अभिमान बाळगा !
१. हिंदूंनो, नामर्दपणा त्यागल्या तरच सुधारणा आणि वैभव यांचे अत्युच्च गिरीशिखर गाठता येईल !
‘हे हिंदुस्थाना, परक्यांचे अर्थहीन, अंधानुकरण, परावलंबन आणि अत्यंत दौर्बल्य या प्रकारचे जड धोंडे गळ्यात बांधून सुधारणा अन् वैभव यांचे अत्युच्च गिरीशिखर गाठण्याची तुझी इच्छा कधीतरी सफल होणार आहे का ?शौर्याला आणि निधड्या छातीला जे स्थान लाभते, ते असल्या नामर्दपणाने तुझ्या हाती कधी तरी येणार आहे का ?
२. हे आर्यावर्ता, (हिंदुस्थाना), हे विसरू नकोस !
-सीता, सावित्री आणि दमयंती या तुझ्या स्त्रीत्वाचा आदर्श आहेत, हे विसरू नकोस.
-तुझा देव त्यागातला त्यागी आहे. सर्वसंगपरित्यागी,शुद्ध भस्मधारी
उमापती अन् स्मशानवासी शंकराचा तू उपासक आहेस, हे विसरू नकोस.
-विवाह, संपत्ती इत्यादी ऐहिक वस्तू केवळ आपल्या सुखासाठी नाहीत,
तर आध्यात्मिक प्रगतीसाठी आहेत, हे विसरू नकोस.
-एकाच व्यक्तीच्या सुखासाठी आपण देह धारण करत नाही, तर विश्वजननीच्या सुखाप्रीत्यर्थ तिच्याच
स्थंडिलावर स्वतःचे बलीदान देण्यासाठी आपला जन्म होतो, हे विसरू नकोस.
३. आर्यभूमीच्या शूर पुत्रांनो, हिंदु असल्याचा सदैव अभिमान बाळगा !
-आर्यभूमीच्या शूर पुत्रा, अधिक धैर्यशाली हो.आपला जन्म हिंदमातेच्या पोटी झाला आहे,
या गोष्टीचा तुला अभिमान असू द्या.
-‘मी हिंदु आहे आणि प्रत्येक हिंदु माझा भाऊ आहे’, असे सदाभिमानाने बोलण्यास कचरू नका.
-जो हिंदु आहे तो अज्ञ, कंगाल, ब्राह्मण अथवा वर्णबाह्य पंचम असला,
तरी ‘तो माझा भाऊ आहे’, असे धीटपणाने आणि स्पष्टपणे सांगण्यास भिऊ नका.
-आर्यमातेच्या दरिद्री पुत्रांनो, तुमच्या कटीभोवती गुंडाळलेल्या फाटक्या चिंधीवाचून दुसरे वस्त्रही तुम्हाजवळ नसले,
तरी ‘आम्ही हिंदू आहोत’, असे आपण म्हटले पाहिजे.
-आम्ही सारे हिंदू आहोत, आम्ही सारे हिंदू भाऊ-भाऊ आहोत, हिंदुभूमी हाच माझा जीवभाव;
हेच माझे सर्वस्व, हिंद मातेच्या पूज्य देवदेवता हाच माझा परमेश्वर; हिंदु समाज हा माझा बाल्यदेशातील पाळणा;
तीच माझी तारुण्यातील वाटिका आणि तोच माझा वृद्धावस्थेतील स्वर्ग; तीच माझी वाराणसी, असे उच्च घोषाने सर्व जगाला सांगा.
४. हिंदूंनो, ही प्रार्थना नित्य करा !
‘हे सर्वशक्तीमान परमेश्वरा, मला पौरुष दे, माझे दौर्बल्य लयास ने.
माझ्या भिरूतेचा नाश कर. मला खरा पुरुषार्थी बनव’, अशी प्रार्थना हिंदु बांधवांनो, नित्य करा !’
- स्वामी विवेकानंद (‘धर्मभास्कर’, जुलै १९९०)
अशी हि स्वाभिमानाची भाषा शिकवणारा संत त्या महापुरुषाची १५० वी जयंती निदान त्यांचे विचार आणि त्याचा प्रसार करूया जय हिंदू राष्ट्र देशाला पुन्हा एकवार ह्या अशा संताची गरज आहे

No comments:
Post a Comment