Wednesday, February 15, 2012

वैचारिक गोंधळ असणार्यांनी गाढवाला शेपूट लावू नये,,,,

||श्री नथुरामाय नमः।।
काही दिवसापासून बघतोय फेसबुक वर आजकाल हिंदुत्ववादी
मराठीच्या विरोधात बोलू लागले आहेत काय नक्की झालाय नक्की कळत नाही .
पण माझ्या मते या सार्यांनी
स्वतःच मराठीपण किंवा ईतरांनी मिरवलेल मराठीपण मिरवण
खरच ईतका लाजीरवाण आहे?
तस असेल तर या सर्वांनी स्वतःची सुंता करवून घेण हे जास्त बर,,,
काय आहे त्यामुळे मराठीच्या विरोधात गरळ ओकायला बर पडेल,,,
खरतर मराठी हा श्वास आहे हिंदुत्वाचा तरीही हे सार का ?
मराठीपण जपण म्हणजे हिंदुत्व नाकारण अस त्याचा अर्थ होतो का?
माझे एक मित्र सध्या भारतचा(हिंदुस्थानचा नव्हे) दौरा करत आहेत ,,
त्यांच्याच भाषेत ,,,
" खरच आपला देश किती वेगळ्या संस्कृती,जाती आणि भाषेने नटलेला आहे हे बघितले
आणि खरच अभिमान वाटला भारतीय/हिंदुस्तानी होण्याचा..."
---येथे नेमकी त्यांना भूमिका घेता येत नाही ते भारतीय कि हिंदुस्थानी,,,,
"हे बघून वाटले कि का काही मोजकी राजकारणी,
ह्या देशामध्ये भाषेचे,जातीचे राजकारण करून काय साध्य करणार आहेत....?
इतिहासापासून आपण काही शिकणार आहे का नाही आपण..?"

----एकीकडे त्यांना अभिमान वाटावा असा देश वाटतो आणि
काहीही कारण नसताना ते भाषेच्या राजकारणाचे दाखले देतात.
---त्यांना नक्की कुठला भाषिक वाद नकोय ते सांगत नाहीत,

---माझ्या मते ते स्वतः मराठी आणि राहतात महाराष्ट्रात

म्हणजे येथे जो वाद आहे तो मराठी परप्रांतीयांचा,,,
---त्या विषयी स्पष्टपणे ते बोलत नाहीत,,,
वर ते असही म्हणतात
"पण एक मात्र खरे,
पाहुण्यांनी घराचा "ताबा" घेण्याचा प्रयत्न करू नये.... "
-
--म्हणजे काय बुवा?

याचा अर्थ असा का कि हे परप्रांति प्रकरण दुसरी कडे

चालू आहे तो पर्यंत ठीक मी त्यांची बाजू घेणार
पण त्यांनी माझ्या घरात घाण करू नये.,,," हे हे नाही चालायचं ,,,
म्हणजे स्वतःवर शेकत नाही तोपर्यंत हे हिंदुत्ववादी आणि वेळ आली कि मराठी,,,,?

सकाळ हिंदू बंधू बंधू अस असताना तो मालक झाला काय आणि तुम्ही मालक झाला काय?
काय फरक पडतो?
काल सुद्धा एका मित्राने अचानक काही एक कारण नसताना
म्हणाला "हिंदुत्व किंवा मराठी यात नक्की कुणाची बाजू घ्यावी काही कळत नाही?"
मी म्हंटले कि जी वेळ जशी असेल तसे त्या प्रमाणे वागावे ,,,
म्हणजे जे योग्य आहे त्याची बाजू घावी ,,,

पण खरा प्रश्न आत पोटात होता मग

"बिहार्यांना मारहाण झाली त्याच
समर्थन तुम्ही कस करणार,,,?"
मी सांगितलं आधी मारहाण का होते ते समजून घ्या
उगाच तिथे मराठी आणि हिंदू यात वाद नको ,,

असच असेल तर "गांधींना मारल्याचा हि कळवला आला पाहिजे "
कारण मारणारा मराठी आणि मारणारा हिंदू बरोबर ना?
पण तरीही श्री. नथुरामाजींनी हे का केल त्याच समर्थन करतोच ना?
त्यांची बाजू सावरायचा प्रयत्न करतोच ना ?
खर्याची पाठराखण करतोच ना?
कि खेद मानतो  ?आणि खेद मानणार्यांना आपण  हिंदू समजतो  का?

हे हे जे प्रकार हल्ली हिंदूंच्या रक्तात शिरलेत ते अनाकलनीय आहेत ,

असो सांगायचं ईतकच

ईतकच जर आपल्या मराठीच ओझ होत असेल आणि हिंदुत्व सांभाळता सांभाळता

त्याच जड ओझ वाटत असेल
आणि त्यासाठी भाषिक वाद प्रांतीय वाद नको तर मला सांगा हा हिंदुत्ववाद तरी का हवा? कारण जसे मराठी भाषिक त्यांच्यावर दोन हजार मैलावरून येवून
खाल्या घराचे वासे मोजून त्यांच्यावर अन्याय करत येथे कब्जा
करत असतील मुजोरी करत असतील म्हणनू जर कुणी
त्या विरोधात आवाज उठवण हे त्यांना चुकीच वाटत असेल तर
हा नियम त्यांच्या तथाकथिक बेगडी हिंदुत्व वादाला हि लावून बघावा
हिंदू हि येथे राहून माजलेल्या मुस्लीम विरुध्द बोलतोच कि ?
कोन्ग्रेस मुस्लीम धार्जिणी आहे म्हणू गळे काढतोच कि?
या देशात हिंदुंवर अन्याय होतो अस बोलतोच कि?
अरे मग कशाला हे सार ज्या सावरकरान च  नाव घेता त्यांना हिंदुहृदय सम्राट म्हणता
त्यांची हिंदुत्वाची व्याख्या आता बरे सोयीस्कर विसरता?
सावरकर म्हणतात या देशात राहणारा मग तो कुणी का असेना
कुठला जाती धर्मच असेना तो हिंदू,,,,मग ?
आणि यांना केरळात सगळीकडे हिरवा रंग दिसला कि यांनी बोलवे काय ?
या भगवा कधी होणार ? याचा अर्थ काय?
आणि अस जर आहे तर हिंदुत्वाद तर कशाला हवा?
चला सारे आपण त्या परमेश्वराची लेकर सारे माणूस म्हणून पुढे येवू
करा जवळ सार्या हिंदू विरोधकांना ते हिंदूच आहेत न?
दलित हिंदूच,,,
मुसलमान हिंदूच,,,
ख्रिश्चन हिंदूच,,,,
अरे तुम्हा सर्वांचे लाडके ब्रिगेडी ते हि हिंदूची कि वो ?
का या सार्यांच्या विरोधात गरळ ओकता ?
घ्या समजून त्यांना चुकलेली आहेत माफ करा 
या आखिल मानव जात तुम्हाला साद देतेय या या सारे या
या भारताला तंटा मुक्त करा जातिभेदाच उच्चाटन करा
ईतिहासा  कडून धडा घ्या पुन्हा एकदा ती नोहाची नौका तयार करा ,,,
पण तुम्ही नका विचार करू जावूद्या हे अवघड शिवधनुष्य आहे ते पेलायची ताकद आपल्यात नाही

पण एक नक्की आपल्या घरातील एखदा चुकला तरी

आपण त्याला बोलतो प्रसंगी रागावतो खूपच राग आला तर त्याच जेवण बंद करतो

म्हणजे आपण त्याच्याशी असलेली नाळ तोडतो असा त्या अर्थ होत नाही
ती त्या वेलची योग्य प्रतिक्रिया असते आणि त्या साठी आधी
त्या घरातील नाठाळा कडून ती क्रिया घडावी लागते
आधी एक्शन मगच उमटते रिएक्शन तेव्हा कृपया या वैचारिक
गोंधळातून बाहेर या आणि उगाच वाद घालत बसू नका
कारण हा सारा प्रकार म्हणजे
"
वैचारिक गोंधळ असणार्यांनी गाढवाला शेपूट लावण्या सारखा आहे,," आणि म्हणून मराठीला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये
कारण एक द्रष्टे सावरकरच होते ज्यांनी ओळखल होत
हा महाराष्ट्रच हिंदुस्थानचा खड्गहस्त बनू शकतो नव्हे तो आहेच
आणि म्हणूनच
शिवराय लढले हिंदू म्हणून,,,
संभाजी राजांनी बलिदान दिल हिंदू म्हणून ,,
आणि पानिपतावर मराठा गेला हिंदू म्हणून ,,,
शेवटी मराठे लढले आपली जात विसरून हिंदू या नात्याने
देशासाठी हिंदुत्वासाठी तेव्हा मराठी माणसाला
हिंदुत्व काय ते शिकवू नये आणि संकुचित तर मुळीच ठरवू नये
आजही मराठी माणूस आधी जय हिंद आणि मग जय महाराष्ट्र बोलतो
आणि हिंदुत्व वादी ? फक्त "जयतु हिंदुराष्ट्र"

1 comment:

  1. शेवटी मराठे लढले आपली जात विसरून हिंदू या नात्याने
    देशासाठी हिंदुत्वासाठी तेव्हा मराठी माणसाला
    हिंदुत्व काय ते शिकवू नये आणि संकुचित तर मुळीच ठरवू नये
    आजही मराठी माणूस आधी जय हिंद आणि मग जय महाराष्ट्र बोलतो
    आणि हिंदुत्व वादी ? फक्त "जयतु हिंदुराष्ट्र"

    ReplyDelete