Monday, December 31, 2012

३१ डिसेंबर साजरा का करू नये?

||श्री नथुरामाय नमः ||

खरतर अस विचारलं पाहिजे कि अस एक कारण सांगा
कि त्यासाठी ३१ डिसेंबर साजरा करावा ?
काही लोक विचारतात कि तुम्ही ईतकेच
स्वतःला हिंदुत्ववादी समजता तर घरातील दिनदर्शिका
फेकून का नाही देत ?
प्रश्न तसा गोंधळात टाकणारा आहे पण
गंमत अशी आहे की
आज घरातील दिनदर्शिका आज वापरण अपिरीहार्य आहे
कारण सगळी कडे निदान तीच आज वापरली जाते
परंतु
आम्ही आजही दिनदर्शिका वापरत असलो तरी आमचे सण सारे तीथीनुसारच साजरे करत असतो
३१ डिसेंबर प्रमाणे नाही आपल्या सणांच्या तारखा ठरलेल्या नाहीत
आणि त्या प्रमाणेच ते सण साजरे होतात
जरी दिनदर्शिका इंग्रजी कालगणनेनुसार असली तरीही,,
आणि आता फर्स्ट बद्दल ,,,,
नेमका कशासाठी साजरा करावा?
दारू पिण्यासाठी?
बेधुंद होवून नाचण्यासाठी?
गांजा चरस पिण्यासाठी?
लोकांच्या मुलीबाळी घेवून रात्रभर रस्त्यावर
धिंगाणा घालण्यासाठी?
नक्की कशासाठी
आणि त्यातही आज ज्या परिस्थितीतून देश चालला आहे
अशा वेळी जेव्हा दिल्ली बलात्कारानंतर दिल्ली आजही
शांत झाली नसेल तेव्हा?
आणि दिल्लीच का देशभरातील एकंदर सार्या माता भगिनींना
आज आता घरातून बाहेर पडल्यावर
सुरक्षित घरी जावू कि नाही याची चिंता असताना?
नक्की का कशासाठी ?
ईतका आटा-पिटा?
आणि तोही हिंदूंनी करावा ?
अरे त्या पेक्षा सरळ किरीस्ताव व्हाकी ,,
ख्रिश्चनांनी तो त्यांचा सण आहे त्यांनी जरूर साजरा करावा
आमची काहीच ना नाही
पण ज्याला कुणालाही मग तो हिंदू असो व मुसलमान ख्रिश्चन
ज्या कुणालाही थोडी फार चाड असेल तो हा दिवस साजरा करणार नाही.

2 comments: