Monday, December 31, 2012

अंधेर नागरीताला विष कीटक

||श्री नथुरामाय नमः||
आज दुपार पासून खरतर कालपरवा पासून
पण आज संध्याकाळी घरी येताना
न्यू ईयर का का काय त्याचा तडका रस्त्यावर प्रकर्षाने जाणवत होता
सगळीकडे सेलिब्रेशनच्या नावावर डीजे वाजवला जात होता
मुलमुली,बेवडे ,म्हातारे कोतारे ,सारेच नटून थटून
येजा करताना दिसत होते आणि
खूप पूर्वी एक विडंबीत गोष्ट वाचलेली आठवली,,,,
हिंदुस्थानची आज अंधेरनगरी झाली आहे
तिची गोष्ट ,,
प्राचीन काळी एक व्यापारी प्रवासी या अंधेर नगरीत आला
काही दिवस या अंधेर नगरीत मुक्काम करून ईथली
प्रेक्षणीय स्थळ पाहून व्यापार उदीम करावा अशी त्याची
इच्छा होती या साठी तो आला होता.
नगराच्या वेशीपाशी एक ब्राम्हण भेटला त्याच्या कडे या नगराची
चौकशी करून काही करता येईल का ते पहावे या,
उद्देशाने त्याने त्या ब्राह्मणाकडे या नागरी विषयी विचारपूस केली
व्यापारी--हे ब्राम्हण देवा या नगरीत महान असे काय आहे?
ब्राम्हण--महान?
फक्त तड वृक्ष आहे जो सर्वाना ताडी माडी देतो.
व्यापारी--बरे दानशूर दाता कोण आहे?
ब्राम्हण--देण्याच काम फक्त धोबीच करतात जे सकाळी
कपडे घेवून जातात ते संध्याकाळी परत देतात.
व्यापारी--बर या नगरीत दक्ष असलेले तत्पर असलेले लोक कोण आहेत?
ब्राम्हण--या नगरीत सर्वच दक्ष आहेत
पण,,,,
दुसऱ्याची बायको आणि संपत्ती पळवण्याच्या बाबतीत.
ब्राम्हणाच्या या सार्या उत्तराने वैतागलेल्या आणि आश्चर्यचकित झालेल्या
त्या व्यापारी प्रवाशाने विचारले तर मग अशा या भ्रष्ट नगरीत जिवंत कसे?
ब्राम्हण-- विष कीटक या न्यायाने
प्रवासी मित्र एखादा कीटक जसा विषाच्या पत्रात जसा दुर्दैवाने अडकतो
तसाच व त्याला हळू हळू त्याची सवय होते आणि तो त्या भांड्यात राहूनही
कसाबसा जगतो,
त्याच प्रमाणे मी हि जगत आहे,,
बाकी काय बोलावे? सारेच मागील पानावरून पुढे चालले आहे
सारेच बोथट जाणिवेचे युक्तिवाद काय तर
ईंग्रजी दर्शिका चालते मग ३१ चे सेलिब्रेशन का नको ?
काय नक्की म्हणावे ह्या कर्माला ?

No comments:

Post a Comment