Tuesday, January 1, 2013

बच्चन साहेब नाहीतर हे तुमचे मगरीचे अश्रू आहेत असे वाटेल.

मा.महानायक श्री.बच्चन साहेब
"मेरी छोडो अपनी माता कि पहचान बनो"
हि आपली कविता वाचली खरच खूप सुंदर आहे
आणि जे काम कवितेने केले म्हणजे शब्दांनी ते ती कविता करतेही
अर्थात आपल्या सारख्या मोठ्या विद्वान आणि उत्तुंग व्यक्तीमत्वाची
मी तारीफ करावी ईतका काहिमी मोठा नाही पण,,
आपणा सारख्या नटांना हि कविता लिहायची पाळी का
आली ते जरा कविता लिहिण्या आधी शोधाल असतत
तर फार बार झाल असत ,,
कारण तुम्ही हि कविता लिहिलीत आणि
मला आठवला तुमचा "निशब्द",
अहो तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबरोबर तुम्ही काम केलत
विसरलो नाहीत आम्ही
स्वतःच्या नियोजीत सुनेबर काय नाचलात
विसरलो नाही आम्ही
हो आता मारे तुम्ही आणि समर्थक त्याच समर्थन करतील
पण ज्या पद्धतीने ती जिया खान समोर आली
आज त्याच पद्धतीने सर्व स्तरावरच्या मुली
समाजात उघडपणे अगदी त्याच पद्धतीचे कपडे
घालत ,आणि त्याच पद्धतीचे हाव भाव करत
बाहेर फिरत आहेत ना जनाची ना मनाची लाज ,,,
आणि ती जिया खानच का ? राखी सावंत ,मलायका अरोरा ,,,,,
आज हिंदी चित्रपट सृष्टीतील आजच्या घडीला सर्व आघाडीच्या नायिका
पूर्वी जे काम हेलन पूर्ण कपडे घालून करत होत्या (होत्या-आदराने)
तसे काम आजच्या घडीला कुठली हिरीईन काम करते
चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब आहे कि
समाज चित्रपटाचे प्रतिबिंब आहे तेच कळेनासे झाले आहे
अगदी काल परवा मी काय सारेच लोक सध्या टीव्ही वर
"मटरु कि बबली का मंडोला"नामक चित्रपटाची जाहिरात पाहत असतील
अहो अक्षरशः लाज वाटते हो
आणि त्यातील हिरोईन अत्यंत निर्लज्जपणे
त्या हिरो म्हणते कि,"कुठले कपडे काढून नदीत जावू?"
आणि तो शहीद कपूरचा बाप पंकज कपूर अत्यंत हिडीस पद्धतीने
वावरताना दिसतो एका थियेटर कलाकाराकडून हि अपेक्षा नव्हती,,
आणि सहायक नाचणाऱ्या नट्या त्याविषयी काय बोलाव,,?
कुणी नक्की लाज बाळगायची ?
बच्चन साहेब सांगा नक्की कुणी लाज बाळगायची?
आणि हेच तुमची हिंदी सिनेमाच प्रतिबिंब समाजात पडताना
दिसत आहे कदाचित तुम्हाला
हे माहित नसाव नाही तर "मेरी छोडो अपनी माता कि पहचान बानो ",,,
हि कविता करताना लिहिताना तुमचे हात धजावले नसते ,,
कि माहित असूनही फक्त स्वतःची "कॉलर टाईत" करायच्या नादात हे लिहिले?
आणि तसे नसेल तर बच्चन साहेब आपणास हात जोडून नम्र
विनंती आहे
आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीने मांडलेला हा बाई बाजार थांबवा,
हे आपणास सहज शक्य आहे आपण महानायक आहत,
--"बाई हि दाखवायची नाही असायची गरज आहे" हे तुम्ही सांगा
तुमच लोक ऐकतील अहो खूप चांगले चित्रपट आहेत
ज्यात कुठल्याही प्रकारे बायकांच्या देहाचे प्रदर्शन मांडलेल नाही
आणि तरीही त्या चित्रपटांनी चांगला गल्ला भरला आहे
चित्रपट चालवा या साठी बायकांच्या अर्धनग्न देहाचे प्रदर्शन थांबवा
हे काही उपाय आहेत ज्याने खरच खूप फरक पडेल
मुख्य म्हणजे ज्या आगतीक्तेने हि कविता लिहावीशी वाटली
ती पाळी महिलांवर खूप कमी येईल
त्यांच्यावरील अत्याचालाराला थोडा तरी लगाम बसेल
बाकी सरकार आहेच हतबल त्याला सबल करण हे आपलच काम आहे.
बघा देवा तुम्हाला कविता लिहिताना जे विचार मनात आले
ते खरच प्रत्यक्षात उतरावे अस वाटत असेल तर
ईतक कराच लई मागण न्हाई देवा लई महान न्हाई,,,
ईतके पैसे घेताना चित्रपटात काम करायचे?
त्या पैशात या देशातील सर्वच्या सर्व महिलांना पुरतील
ईतके
कपडे येतील बच्चन साहेब कराच
नाहीतर हे तुमचे मगरीचे अश्रू आहेत असे वाटेल.


1 comment:

  1. ईतक कराच लई मागण न्हाई देवा लई महान न्हाई,,,
    ईतके पैसे घेताना चित्रपटात काम करायचे?
    त्या पैशात या देशातील सर्वच्या सर्व महिलांना पुरतील
    ईतके कपडे येतील बच्चन साहेब कराच
    नाहीतर हे तुमचे मगरीचे अश्रू आहेत असे वाटेल.

    ReplyDelete