Wednesday, February 27, 2013

राग का येत नाही आलाच पाहिजे नाहीतर ,,,,



राग का येत नाही आलाच पाहिजे
नाहीतर ,,,,
परवाच मी एके ठिकाणी वाचल
आर्य चाणक्यास राग आला नसता तर चंद्रगुप्त मौर्य बिहारच्या एका रस्त्यावर
कोपर्यात कुठे तरी उभा असता मग सम्राट झाला असता काय?
आणि अचानक मनात आपली शिकवण मनात घुमू लागली
रागावू नका ,राग हाच तुमचा खरा एक नंबरचा शत्रू आहे ,,,
प्रेमाने बोला प्रेमाने जग जिंकता येत जे काम बंदुकीची गोळी नाही करू शकत
ते काम तुमच्या गोड बोलण्याने होत वैगेरे वैगेरे ,,,,
आणि मग विचार करू लागलो,,,
--मारुतीरायास राग आला नसता तर लंकेला आग लागली असती का?
--रामाला राग आला नसता तर सीतामाई परत आली असती का?
--द्रौपदीला राग आला नसता तर महाभारत घडल असता का?
--कर्णाला राग आला नसता तर दुर्योधनाला साथ दिली असती का?
--शल्याने कर्णाचा पान उतारा केलाच नसता तर?
--शिखंडीला राग आलाच नसता तर ?
-- भगवान पर्शुरामांना राग आला नसता तर?
--छत्रपती श्री.शिवरायांना राग आला नसता तर?
--छत्रपती श्री.शंभूराजांना राग आला नसता तर ?
अशी हि सारी रागाची परंपरा असताना रागावर नियंत्रण ठेवा का सांगितलं जात ?
कारण हे सारे राग विधायक काम करण्यासाठी राबवले गेले वापरले गेले.
संत सज्जनांच रक्षण करण्यासाठी ,गायीगुर लेकीवासर सारे अबाधित राहावेत म्हणून
म्हणून राग हा आलच पाहिजे पण हितकारक असेल तरच
कारण राग आल्याने ,,
जसे आजूबाजूचे लोक आपल्याला दचकून वचकून असतात
अगदी त्याच प्रमाणे रंगीत माणसाच्या शरीरात रोग हि दचकून राहतात ,,,
आपले ऋषीमुनीच घ्याना हजारो वर्षे जगत असत,,,
राग राग केल्याने आयुष्य वाढते आणि राग दाबून ठेवल्याने ,,,?
ब्लडप्रेशर ,,,,
राग राग केल्याने आयुष्य वाढते आणि दाबून ठेवल्याने ,,?
किडनी खराब होते,,,
म्हणून आज या मराठी दिनाच्या दिवशी एकच सांगणे आहे
--मराठी माणसांनो रागवायला शिका तरच,, बाहेरचे लोंढे येणार नाहीत ,,,
--मराठी माणसांनो रागवायला शिका तरच,, हे परप्रांति मुजोर होणार नाहीत ,,,
--मराठी माणसांनो रागवायला शिका तरच,, त्यांची ताकद येथे संघटीत होणार नाही ,,
--मराठी माणसांनो रागवायला शिका तरच,, वाचाल ,,,
अन्यथा शेवटचा मराठा शिवतीर्थावर वडापाव खात खात मेला अशी,,,
पाटी वाचायलाही कुणी शिल्लक राहणार नाही
जमेल तितक नव्हे मराठीच बोला ,,
नव्हे तसा आग्रही धरा ,,
जय हिंद जय महाराष्ट्र 




 

2 comments:


  1. सुनील तुझ्या " राग आला नसता तर " मध्ये आणखीन एंक वाढ करावीशी वाटते , ती म्हंजी जर नथुरामला राग आला नसता तर ?

    ReplyDelete

  2. सुनील तुझ्या " राग आला नसता तर " मध्ये आणखीन एंक वाढ करावीशी वाटते , ती म्हंजी जर नथुरामला राग आला नसता तर ?

    ReplyDelete