Saturday, August 20, 2016

फुकट टाळ्या पिटायला काय जात??

*फुकट टाळ्या पिटायला काय जात???*

*आणि आमच्या देशप्रेमा ला उधाण आलं*
आधी दीपा ने पाया रचला आणि साक्षी सिंधूने कळस चढवला
पण ,,,
*साक्षी सिंधू दीपा यांचं कौतुक करणारे किती जण आपल्या मुलांना या खेळाकडे वळवणार आहेत??*
 मला वाटत
*अभ्यास एके अभ्यास अस आपल्या मुलां मागे लागणाऱ्या आईवडिलांनी तर बिलकुल कौतुक करू नये*
किंवा ज्यांना जागेपणीही माझा मुलगा सचिन तेंडुलकर होणार अस वाटत त्यांनी तर बिलकुल करी नये
ती *शोभा डे चुकीचं चुकीच्या पद्धतीने बोलली* पण बाकीच्या भारतीय जनतेला अगदी सर्वानाच त्यांचा कौतुक करायचा अधिकार आहे का??
*त्यांच्या या यशात त्यांचे प्रशिक्षक आईवडील आणि स्वतः त्यांची प्रचन्नन्ड मेहनत याचा मोठा वाटा आहे*
क्रिकेटला सार मोफत पुरवणारे
यांनी या खेळांना किती मदत केलीय
आले लगेच एखादी मुलगी मी पहिलवान होणार अस जेव्हा आईवडिलांना सांगत असेल तेव्हा काय विचार येतील तुमच्या मनात जरा विचार करून पहा
*फुकट टाळ्या पिटायला काय जातंय???*
जिचे पाय जन्मतः अगदी सरळ आहेत ती दीपा मी जिमन्यास्ट होणार
त्या दिपला आणि तिच्या प्रशिक्षकाला किती मेहनत घ्यावी लागली असेल???
आणि सिंधू ती तर अशा प्रशिक्षकाच्या हाताखाली शिकली
ज्याला साईना ने नाकारलं,,
आज ते दोघही सोन्यासारखे
झळाळून उठले आहेत मग ते
मिल्खासिंग असतील
*पानसिंग तोमर सारखे तर सरकारी अनास्थे मुळे डाकू बनले देशोधडीला लागले काय चीज झालं देशसाठी खेळून??*
खाशाबा जाधव यांच नाव किती जणांना ठाऊक असेल????
आज कौतुक करणारे सारेच
जागेपणी माझा माझी मुलगा मुलगी क्रिकेट खेळणार अभ्यास करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी कसे करणार हेच पाहत असतात या देशात क्रिकेट शिवाय अन्य खेळ आहेत हे आमच्या आजही गावी नाही
तेव्हा या साऱ्या लोकांचं कौतुक करायचं असेल तर क्रिकेट आणि अभ्यास या व्यतिरिक्त आपली मुलं काही करू शकतात बनू शकतात का
ते ठरवा याचा विचार करा
आणि मगच या साऱ्यांचं कौतुक करा
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:

Post a Comment