Thursday, September 8, 2016

शिवकालीन गणेशोत्सव

श्री. सदगुरू समर्थ रामदास स्वामींनी 
सुंदर मठ शिवथरघळ येथे सुखकर्ता दुःखहर्ता हि प्रार्थना लिहली ..
व 300 वर्ष पूर्वी श्री गणेश स्थापना केली ...
त्या सुदंर माठातील शिवथर येथील 
श्री.गणेश दर्शन ... 
व दुर्मिळ श्री.समर्थरामदास स्वामी यांचे श्रीगणेश आरती करतानाचे तैल चित्र..

शिवकालीन गणेशोत्सव,,,,


इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, 
तसेच लोक एकत्र येत नव्हते. 
लोकमान्य टिळकांना वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी 
एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला
आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. 
परंतु आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्य लक्ष्यात येते.

सुखकर्ता दुःखहर्ता......
ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते. 
हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. 
गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. 
देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे. 
भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. 
प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी 
श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! 
सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!

समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता 
शिवथरच्या घळीत आले. दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले 
तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता 
शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली. त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली. तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.

वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे. याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो. त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो. तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक 
छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली. त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो. 

समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!! ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे. पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वावे रक्षावे सुर्वरवंदना !!

शिवरायांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला. गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर
छ.* *शिवाजी राजे आणिसमर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला. आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. 

वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले आहे .


No comments:

Post a Comment