Wednesday, June 6, 2018

शेतकरी संपावर

||श्री नथुरामाय नमः ||
*ज्यांना 'बांध' म्हणजे माहित नाही*
*नांगराचा 'फाळ' कसा धरायचा माहित नाही ...*
*शेणाच्या 'गोवऱ्या' कश्या थापतात माहित नाही ...*
*भुईमूग वर उगतो कि खाली माहित नाही ...*
*दुधाची 'धार' कशी धरत्यात माहित नाही ..*

त्यांनी थोबाड उचकटून शेतकऱ्याला करबुडव्या किंवा फुकट्या अश्या उपमा देण्याच्या भानगडीत पडू नये ..
*AC ची हवा खात ५ रुपड्याच्या मक्याच्या दाण्याला 'पॉपकॉर्न' म्हणून २०० रुपया ला विकत घेणाऱ्यांनी शेतकऱ्याला अक्कल शिकवू नये*😡😡
तुमचा धंदा असेल तर तुम्ही ठरवतात ना तुमचे रेट ❓
*मग शेतकऱ्याला ठरवू द्या त्याच्या पिकाची किंमत ... मग बघुयात कोणाची किती औकात आहे गोष्टी विकत घ्यायची...?*

शेतकऱ्याच्या पोराला नसतात का जीन्स घालण्याची इच्छा ?
शेतकऱ्याच्या पोरीला नसतात का हिल्स घालून फिरण्याची हौस?

डॉक्टर ला हाथ लावला म्हणून अख्खी संघटना जाते संपावर....
इथे तर हजारो शेतकरी मेलेत... त्यांची संघटना नाही म्हणून त्यांना संपावर जाण्याचा हक्क नाही ?

आणि पुढाऱ्यांनी उगाच मेल्याच्या मढ्यावरच लोणी खायला येऊ नये ... आणि कोणी आलात तर शेतकऱ्यांनी आसूड उगारावा किंवा उसाच्या टिपऱ्यांनी टाळकी सडकावी ...
*आम्ही शेतकञाची पोरं 2019 ची वाट बघतोय नाय या सरकारला गाडलं तर शेतकरी नाव लावणार नाही...*

No comments:

Post a Comment