Thursday, August 9, 2018

9 ऑगस्ट आणि मराठा मोर्चा

||श्री नथुरामाय नमः ||


*तिचा तो एल्गार देशासाठी होता तो कुठल्याही एका जातीसाठी नव्हता*

आजच्याच दिवशी 9 ऑगस्ट 1942 गवालिया टॅन्क ( ऑगस्ट क्रांती मैदान) प्रचंड मोठी सभा भरली होती तेव्हाचे नामांकित काँग्रेस नेते भाषण करत होते आणि ही भाषण सुरू असतानाच एक बाई
मधूनच धावत आली ती सरळ व्यासपिठावर चढली तीच्या हाती तिरंगा होता त्या व्यासपीठावर तो झेंडा तिने रोवला आणि स्वातंत्र्याचा जयघोष सुरू केला तेव्हा अशा घोषणा देणं बेकायदा होत, पोलीस तो गोंधळ पाहून व्यासपीठाकडे धावले पण ती महिला बेधडकपणे स्वातंत्र्याच्या घोषणा देत राहिली ,,,त्या नेत्या होत्या सरोजिनी नायडू
स्वातंत्र्य चळवळीतील *नाईटिंग गेल*
*त्यांचा तो एल्गार देशासाठी होता तो कुठल्याही एका जातीसाठी नव्हता*
अर्थात त्या *काळातले नेतेही वेगळेच होते त्यांनी स्वतःचे आयुष्यच उधळले होते देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून*
*लोकमान्य टिळकांनी ही स्वातंत्र्याची उर्मी जास्तीत जास्त लोकांच्या मनात बिंबवली त्याचीच ही परिणीती होती,,,*
*सुभाष बाबूंचे शेवटचे उदगार ,*
*माझ्या देशवासियांना सांगा तुमचा सुभाष देशासाठी शेवटपर्यंत लढला बास एक धक्का और दो आणि बघा तुम्ही स्वतंत्र झालेले असाल,,,,9 ऑगस्ट ही त्याचीच परिणीती होती,,*
*परकीय सत्तेने स्वदेश स्वहित स्वातंत्र्य यावर केलेल्या अन्यायला दिलेला तो धक्का होता*
परन्तु दुर्दैवाने काल मराठा मूक क्रांती मोर्चाने बंद पुकारला जो आपल्या जातीसाठी होता
मेजर कौस्तुभ राणें सारखे जवान आज मातृभूमी साठी लढत आहे आपला प्राण पणाला लावत आहेत तो प्राण पणाला लावताना हा प्राण फक्त आणि देश देशवासी आणि राष्ट्रध्वज यासाठीच आपला प्राण आहे ही स्वच्छ भूमिका त्यांची होती,,, आपल्या सुरक्षित कोषात राहून fb व्हाट्सएपच्या दुनियेत देशप्रेमच्या गोष्टी करायच्या आणि आरक्षण द्या म्हणत रस्त्यावर उतरायचं,,,
*अरे काल क्रांती दिनी रस्त्यावर उतरायचंच होत ते आरक्षण रद्द करा या साठी का नाही उतरले*
केवळ आणि केवळ मतांच्या लाचारी साठी सरकार सुद्धा असल्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे?
त्यातही मोर्चेकऱ्यांचं भांडण सरकारशी
मग जनतेला का वेठीला धरलं जात?
लाखा लाखा चे मोर्चे काढता ना मग या लाख लोक घेऊन आणि घाला मंत्रालयाला वेढा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात गल्ली बोळात आमदार खासदार नगरसेवक याना फिरणं मुश्किल करा
जनतेची मुस्कटदाबी कशाला?
बर आरक्षण फक्त तुम्ही मागून प्रश्न सुटणार आहे का? ( मुळात सोडवायची इच्छा आहे का?) बर उद्या तुमच्या मागे इतर आरक्षण मागायला उभे आहेतच नाही तरी हळू हळू ब्राम्हण ही उचल खात आहेतच
अरे इतकीच हौस आहे आरक्षणाची तर तिकडे सीमेवरही जा आरक्षण घेऊन लढायला ??? ते नाही जमणार आम्हला
हे सगळं आरक्षण मागण्याआधी मराठा मोर्चाने हे लक्षात घ्यावे *आपण या देशावर राज्य करणाऱ्या जमातीतील आहेत,* *अटकेपार आपली विजय पताका फडकवणारे आहोत,*
*दिल्लीच तख्तसिंहासन फोडणारे मराठे आहोत,*
*बचेंगे तो और भी लढेंग म्हणारे आहोत,* *गनिमीकावा घेऊन कुणाची ही साथ नसताना सारा देश एकबाजूला आणि मराठे एका बाजूला अशा अवस्थेत ही लढत राहणारा हार न मानणारा रणमर्द मराठे आहोत*
*ज्यांच्या पराक्रमाची दहशत इतकी की ज्या खैबरखिंडीतून वारंवार शत्रू येऊन देश गिळणकृत करत होता तो मराठ्यांच्या आक्रमणा नन्तर पुन्हा त्या मार्गाने या देशावर चाल करून आला नाही आपण ते मराठे आहोत*
ज्यांचा पिंड
त्या *लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या घोषणेवर,,,*
*मेरी झाशी नही दुगी च्या अभिमानवर,,,*
आणि *देवाधिदेव छत्रपती शिवराय ज्यांनी भर दरबारात औरंगजेबाने दिलेली खिल्लत उधळत स्वाभिमानावर मराठा काय असतो ते दाखवून दिलं होतं त्यावर आमचा पिंड पोसला गेला* असताना आम्ही आज मागतो काय आहोत तर
*आरक्षण????*
आरक्षण मागण्याआधी हे पक्के लक्षात ठेवा या देशातील मग ते ख्रिश्चन असो वा मुस्लिम ते कधीही विसरलेले नाही की त्यांनी ह्या देशावर राज्य केलंय आपण राज्यकर्ती जमात आहोत आज ना उद्या आपण या देशावर पुन्हा राज्य करू ही मनीषा बाळगून ते आहेत *आणि आपण या देशाचे सार्वभौम सम्राट भाग्यविधाते* मागतो आहोत काय ते
*आरक्षण???*
मित्रहो एकच सांगतो मी नाही तुकोबाराय बोलतात
भिक्षापात्र अवलंबीने जळो जिने लाजिरवाणे ऐसीयांसी नारायने उपेक्षीजे सर्वथा
*आरक्षण रद्दच करा देश वाचवा*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक


No comments:

Post a Comment