Thursday, January 3, 2019

आमचं पुणे आमचं डोकं आम्ही ठरवू,,,


आमचं पुणे आमचं डोकं आम्ही ठरवू,,
31 dec आणि नववर्ष साजरं करण्यासाठी कुणाच्या तरी डोक्यातून हेल्मेट सक्तीची सुपीक कल्पना निघाली आणि पुण्यात जाळ आणि धूर संगटच निघाला,,
खर तर आमचं डोकं वाचवायची आम्हला गरज वाटत नाही का?
आणि हेल्मेट घालून खरच जीव वाचणार याची कुणी तरी शास्वती देणार आहे का?
आज अपघात झाल्या नन्तर असे बरेचदा अक्षरशः हेल्मेट कापून ओळख पटवून घ्यावी लागली आहे पुणेच काय कुठलेही पोलीस यावर नक्कीच बोलतील,,
अशी अनेक कारण आहेत ज्यात मागचं पुढचं नीट दिसत नीट ऐकू येत नाही मानेवर वजन केस खराब इतर अशी बरीच,,, तरीही सरकार हेल्मेट सक्ती करते का???😏😏😠😠
मुळात आज हेल्मेट घालावी अशी सक्ती का करावी लागते???
इथेच खरी गोम आहे
सरकारने ज्यांची लायकी नाही सायकल घ्यायची अशांना आधी 1000/500 शेत मोटरसायकल देणं
O% व्याजावर गाड्या देणं बंद केलं पाहिजे,,
जो एकरकमी पैसे भरेल त्यालाच गाडी,,
ज्याच्याकडे स्वतःच पार्किंग घराच्या आजूबाजूस असेल त्यालाच गाडी द्यावी,,
पंपावर किमान 100 रु पेट्रोल मिळेल अशीच व्यवस्था करावी,,,
अगदी हेच चार चाकी गाड्यां बाबत ही करावं
कशाला एका माणसाकडे चार गाड्या?
माझ्या स्वतः कडे 6 हेल्मेट आहेत पण मी स्वतः हेल्मेट विरोधी आहे
आम्हला कळत नाही का गाडी कशी चालवावी?
स्वतःचा जीव कसा वाचवावा?
त्या पेक्षा रस्ते सुंदर करायचं काम करा फक्त उड्डाणपूल बांधून वाहतुकीची समस्या अपघाताची समस्या सुटणार आहे का????😏😏😠😠
आशा तर्हेने लोकांकडे मुळात गाड्याच कमी असतील तर लोक सार्वजनिक वाहन जास्त वापरतील त्यातून सारकरचाच महसूल वाढेल ,,
*महसूल वाढला तर अर्थातच सरकार आणि पर्यायाने जनतेलाच फायदा होईल*
त्यामुळे Gst सारखे टॅक्स न लावून लोकांच्या मनात सरकार विरोधी असंतोष ही कमीच होईल,,,
परंतु सरकार काम अस करत कीआधी ते
*जनतेला व्यसन लावत आणि मग औषध घ्या म्हणून जबरदस्ती करत* जे अत्यन्त चूक आहे
कुणा शेटजींच्या तिजोर्या भरण्या ऐवजी जनतेचा दुवा घ्यावा सरकारचा फायदा हा ठरलेला
*उगाच शिस्तीच्या नावाखाली शेटजींच्या तिजोर्या भरायचं पापकर्म करू नका*
*स्वाअनुभव हाच सगळ्यात मोठा गुरू आहे*
*आम्ही पुणेकर अस कुणालाही डोक्यावर बसवून घेत नाही आणि हेल्मेट तर नाहीच नाही*

No comments:

Post a Comment