Saturday, April 6, 2013

पुन्हा एकवार चिपको आंदोलन करायच्या तयारीत राहा

||श्री नथू रामाय नमः ||
परवा माझे मित्र श्रीपाद कुलकर्णी यांनी पाण्याच्या गैर वापरा बद्दल लिहिल होत
आपला तो शाहरुख आणि दुसऱ्याचा तो भास्कर जाधव
खुपच मार्मिक होत पण मी मात्र

आमच्या शालेय जीवनातल्या आठवणीत अचानक गेलो
त्यावेळी "चिपको आंदोलनाची " जोरदार चर्चा चालत असे
आम्हाला अर्थातच काही कळत नसे (तस आज तरी कुठे काय कळतंय?)
पण एकंदरच सर्वांचा चर्चेचा विषय असे चिपको आंदोलन ,,,,
श्रीपाद रावांनी पाण्याच्या उधळपट्टी बद्दल खरच खूप पोटतिडीकेने लिहिल
पण मला मात्र अचानक
त्या काळात आम्हाला आमच्या शाळेत सांगितलेली गोष्ट आठवली
ह्या चिपको आंदोलनाचा पाया असलेली ती गोष्ट ,,,
एकदा जोधपूरच्या राजाने राजवाडा बांधायचा ठरवले
त्यासाठी चुन्याची कळी करायला खूप जळण लागणार होते
पण ते वाळवंटात कुठे मिळणार ?
मग काय करायचे ,,,
पण जोधपूर पासून जवळच बिश्नोईन्चे खेजडली गाव होते
तिथे मुबलक झाडी होती
झाल राजाचे सैनिक तिथे गेले आणि झाड कापायला सुरवात केली
सारे गावकरी विनवण्या करू लागले झाड तोडू नका
वृक्ष संपदा अशी नाश करू नका पण कुणीही ऐकायला तयार नव्हते
या विरोधामुळेसैनिकांनी लपूनछपून आणि रात्रीच्या वेळी जंगल तोडायला सुरुवात केली.
या गावात एके दिवशी गावातली पुरुषमंडळी बाहेरगावी गेलेत,
असं पाहून झाडं तोडण्यासाठी मोठय़ा संख्येनं मजूर आले आणि
ही बातमी गावात लगेच पोहचली.
गावातल्या महिलांमध्ये चर्चा झाली आणि काही महिला जंगलात घुसल्या. तोडणा:यांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही.
महिलांनी मग प्रत्येक झाडाला मिठी मारायला सुरुवात केली.
लढय़ाचा हा मार्ग खूपच नवीन आणि परिणामकारक होता.
रात्रभर या महिला झाडांच्या रक्षणासाठी जंगलात थांबून राहिल्या.
या महिलांना हात लावण्याची सैनिकांची हिम्मत झाली नाही. ते परत फिरले, महिलांनी मिळवलेल्या या विजयाची बातमी गावागावांत पोहचली
आणि इथूनच चिपको आंदोलनाने पेट घेतला.
लोकांचा प्रतिसाद झपाटय़ाने आंदोलनाला मिळत गेला.
झाडांना मिठय़ा मारूनसैनिकांना विरोध सुरू झाला. 
परिणामी त्यात अनेक गावकरी मारले गेले
मग मात्र राजा धावून आला त्याने गावकऱ्यांची माफी मागितली
निसर्ग नष्ट होण्याचा पहिला परिणाम हा त्या भागातल्या गरिबांवर होतो,
याची जाणीव जगाला या आंदोलनाने करून दिली.
पर्यावरणाबरोबर तिथले आर्थिक प्रश्नही यामुळे प्रकर्षाने मांडले गेले.
कुऱ्हाड बंदी घातली गेली या पुढे एकही झाड तुटणार नाही अशी हमी दिली
मोठय़ा संख्येने झाडं तोडल्यानं पूर येतात,
दरडी कोसळतात, आपल्याला उपयोगी अशा महत्त्वाच्या वनस्पती
आणि प्राणी नष्ट होतात
आज एकंदर ज्या पद्धतीने विकासाच्या नावावर या देशाला भकास करायला हि नेते मंडळी लागली आहेत कि पुन्हा एकदा
देशाला कॉर्पोरेट जगापासून वाचविण्यासाठी आता आणखी एका चिपको आंदोलनाची गरज आहे असू वाटू लागले आहे
आणि म्हणूनच
"सुप्रियाच्या लग्नात लोकांना मी केवळ एक पेढा तेवढा दिला होता,
उधळपट्टी केली नाही",
म्हणून स्वतःचीच पाठ थोपाटनार्या राष्ट्रवादीला ४८ लाख लिटर पाण्याची उधळपट्टी बरी चालते?
आता खर तर महाराष्ट्राच्या मातीला आणि भारतमातेला गरज आहे ती देशप्रेम्यांची क्रिकेट प्रेम्यांची नाहि…
आणि ह्याच्या मैदानासाठी ६४.८ लाख लिटर पाण्याचा वापर म्हणजेच पाण्याची नासाडी करण्यात येणार आहे
ज्यामध्ये २ लाख माणसांची तहान, पाण्याची गरज भागवता येऊ शकते….
त्याचा वापर आपल्या मनोरंजनासाठी करण्यात येणार आहे
म्हणजे आपल सरकार आपल्यासाठी आपल्या मनोरंजनाची किती काळजी घेत आहे हे तुम्हीच ठरवा…..
ह्या नालायकांना राजकारण्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलं….
मुंबईच्या जीवावर जगतायत मजा करतायत आणि महाराष्ट्रातल्या माणसांपेक्षा त्या दुष्काळातल्या माणसांच्य जिवापेक्षा ह्यांना
आयपियल मधून मिळणाऱ्या पैशाचीच तहान आहे…
असो मला आयपियल महत्वाच नाही आणि तुम्हाला ???
ह्यावर्षीच्या आयपियल मधला एकही सामना मी तर पाहणारच नाहि…
आणि कसलाही टीआरपी प्रसिद्धी देणार नाही
आपण सुद्धा दाखवून द्या ह्या आयपियल वाल्यांना…
पूर्णपणे निषेध करा….
टीआरपी दिला नाही तर ते आपोआप थांबतील…
नाहीतर …… ??? पुन्हा एकवार चिपको आंदोलन करायच्या तयारीत राहा
मोठे बदल घडवायला छोटी सुरवात करावीच लागते
आम्हीतर सुरुवात केलि आहे आणि तुम्ही ????
महारष्ट्रात जन्मलात… महाराष्ट्रासाठी जगा
आयपियल सामने भरवण्यापेक्षा त्या पैशात झाड लावा
पर्यावरण वाचवा महाराष्ट्रच नव्हे तर देश दुष्काळ मुक्त करा
प्रत्येक भारतीयाने हे केलेच पाहिजे
कारण गोष्टीतला राजा त्याला निदान ईतका तरी कळत होत
कि जनमताचा रेटा काय आहे
मात्र आजचा राजा अजूनही गहू सडवून
दारू गाळण्यातच मग्न आहे 


1 comment:

  1. chipko aandolan tar rashtravadi purvipasun karat ahe. paishala chipko, ipl la chipko, ghotalyana chipko.

    ReplyDelete